रश्मिका मंदानाचा 'डीपफेक' Video व्हायरल, अमिताभ बच्चन यांनीही व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 11:12 AM2023-11-06T11:12:59+5:302023-11-06T11:13:31+5:30
हा व्हिडिओ बघून चाहत्यांनीही चिंता व्यक्त केली आहे.
सध्या सोशल मीडियावर मॉर्फ फोटो, व्हिडिओ बनवण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. सेलिब्रिटीच नाही कर सामान्य लोकंही या प्रकाराला सामोरे जात आहेत. नुकतंच 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ फेक असून ओरिजिनल व्हिडिओ पोस्ट करत एकाने ट्विचरवरुन याबाबत वाच्यता केली आहे. तसंच महानायक अमिताभ बच्चन यांनीही अशा फेक व्हिडिओबाबतीत चिंता व्यक्त केली आहे.
रिसर्चर अभिषेकने X वर एक व्हिडिओ शेअर केलाय. हा रश्मिकाचा व्हिडिओ असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं. यामध्ये ती आनंदाने उड्या मारत लिफ्टमध्ये जाते. त्यात तिला विचित्र पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. या व्हिडिओसोबत अभिषेकने लिहिले, 'डीपफेक विरोधात कायदेशीर कारवाई आणि नियम बनवण्याची तात्काळ गरज आहे. तुम्ही रश्मिका मंदानाचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिला असेल. पण थांबा, ही रश्मिका नाही तर हा झारा पटेल नावाच्या महिलेचा डीपफेक व्हिडिओ आहे. झारा पटेल ही ब्रिटीश-भारतीय मुलगी आहे जिचे इन्स्टाग्रामवर ४ लाख फॉलोअर्स आहेत. तिने ९ ऑक्टोबरला हा व्हिडिओ अपलोड केला आहे.'
🚨 There is an urgent need for a legal and regulatory framework to deal with deepfake in India.
— Abhishek (@AbhishekSay) November 5, 2023
You might have seen this viral video of actress Rashmika Mandanna on Instagram. But wait, this is a deepfake video of Zara Patel.
This thread contains the actual video. (1/3) pic.twitter.com/SidP1Xa4sT
अभिषेकच्या या व्हिडिओवर अमिताभ बच्चन यांनीही कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे. ते लिहितात,'खरंच यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.''
yes this is a strong case for legal https://t.co/wHJl7PSYPN
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 5, 2023
हा व्हिडिओ बघून चाहत्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. रश्मिकाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ती लवकरच रणबीर कपूरसोबत आगामी 'अॅनिमल' सिनेमात दिसणार आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी सिनेमा दिग्दर्शित केला असून १ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.