लंकेश रावणासाठी खऱ्या सोन्याची वस्त्र अन् अलंकार, नितेश तिवारींच्या 'रामायण'साठी जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 03:35 PM2024-05-19T15:35:14+5:302024-05-19T15:38:11+5:30
नितेश तिवारींच्या रामायणमधील रावणसाठी यश खऱ्या सोन्याची वस्त्रं परिधान करताना दिसणार आहे. (ramayan)
सध्या सर्वांना नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची उत्सुकता आहे. 'रामायण'साठी दिग्दर्शक नितेश तिवारी चांगलीच तयारी करत आहेत. 'रामायण' सिनेमात कलाकारांची मोठी फौज बघायला मिळतेय. रणबीर कपूर प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय केजीएफ स्टार यश रावणाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार 'रामायण'मधील रावणासाठी खरीखुरी सोन्याची वस्त्रं तयार करण्यात येणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रावणाने सोन्याची नगरी लंकेवर राज्य केले. त्यामुळे सिनेमात सुद्धा 'रामायण'मधील रावणाच्या पात्रासाठी खऱ्या सोन्याचा पोशाख तयार करण्यात येत आहे. अहवालात असे म्हटले आहे की, रावणासाठी बनवले जाणारे कपडे खरे सोन्याचे असतील. रावणाची लंका सोन्याची होती. त्यामुळे रावणाच्या भूमिकेतील कलाकाराचे सर्व कपडे, दागिने आणि इतर आभूषणं सोन्याची असतील, अशी चर्चा आहे.
RAMAYAN STARS #Ramayana#RanbirKapoor#Yash#saiPallavipic.twitter.com/fupolJMopT
— FilmyWorld (@filmyWorld_offi) April 12, 2024
दरम्यान यशच्या नकारानंतरही तो या चित्रपटात 'रावणाची' भूमिका साकारणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर कायम आहे. यासोबतच ताज्या अहवालानुसार यशला 'रामायण'च्या 20 ते 30 टक्के नफा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला यशने पुष्टी केली होती की तो 'रामायण'साठी सह-निर्माता म्हणून सामील होणार आहे. त्यामुळे 'रामायण' मध्ये लंकेश यशला पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असतील यात शंका नाही.