"दोघांचं अफेअर आहे, असं सांगूयात", रंजना यांनी दिलेल्या या सल्ल्याला रवींद्र महाजनींचा होता विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 03:54 PM2024-02-10T15:54:09+5:302024-02-10T15:55:13+5:30
Ravindra Mahajani And Ranjana : झुंज, लक्ष्मी, मुंबईचा फौजदार या चित्रपटातून रविंद्र महाजनी आणि रंजना ही जोडी सुपरहिट झाली होती.
रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या पत्नी माधवी महाजनी (Madhavi Mahajani) यांचे चौथा अंक हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. या त्यांच्या आत्मचरित्रात अनेक चांगल्या, वाईट घटनांचा मागोवा घेतलेला आहे. यात त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. अभिनेत्री रंजना आणि रविंद्र महाजनी यांची जोडी रुपेरी पडद्यावर तुफान गाजलेली पाहायला मिळाली. या जोडीने अनेक चित्रपटात एकत्रित काम केले. या आत्मचरित्रात रंजना यांचा एक किस्सा माधवी महाजनी यांनी सांगितला आहे.
‘जाणता अजाणता’ हे रविंद्र महाजनी यांचे पहिले नाटक खूप गाजले होते. व्ही शांताराम त्यावेळी झुंज चित्रपटासाठी चांगल्या नायकाच्या शोधात होते. हे नाटक पाहिल्यानंतर त्यांना रविंद्र महाजनीच चित्रपटासाठी योग्य आहेत असे वाटले. यात त्यांची नायिका होती रंजना. ‘कोण होतास तू…’ , ‘निसर्ग राजा ऐक सांगते…’ ही चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. या भूमिकेसाठी रविंद्र महाजनी यांना फिल्म फेअर अवॉर्डने गौरवण्यात आले होते. लक्ष्मी , मुंबईचा फौजदार चित्रपटाने ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसली. गोंधळात गोंधळ या चित्रपटात रंजना असल्या तरी प्रिया तेंडुलकर यांच्यासोबत रविंद्र महाजनी यांना संधी मिळाली होती.
रंजना यांनी रविंद्र महाजनी यांना सुचवला होता एक उपाय
रविंद्र महाजनी आणि रंजना ही जोडी सुपरहिट झाल्यानंतर या दोघांना अनेक चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या. आपल्याला आणखी चित्रपटात काम करता यावे म्हणून रंजना यांनी रविंद्र महाजनी यांना एक उपाय सुचवला होता. माधवी यांना विश्वासात घेऊन आपल्या दोघांचं अफेअर चाललंय असं आपण उठवूया… असा रंजना यांना एक मार्ग सुचवला होता. माधवी यांनी आपली काहीच हरकत नसल्याचे कळवले होता. पण रविंद्र महाजनी यांनी मात्र या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला होता.
रविंद्र महाजनी हे कामाच्या आणि पत्नीच्या बाबतीत होते एकनिष्ठ
रविंद्र महाजनी हे कामाच्या आणि पत्नीच्या बाबतीत एकनिष्ठ होते. त्यांच्यासोबत काम करणारी एक नायिका त्यांच्या प्रेमात पडली होती. तेव्हा ती नायिका थेट रविंद्र महाजनी यांच्या घरी पोहोचली होती. पण रविंद्र महाजनी परक्या स्त्रियांपासून खूप लांब राहत होते. ती इथे का आली किंवा तिला माझा पत्ता कसा कळला हेही ते पत्नीला बोलून दाखवत असत. त्यामुळे रविंद्र महाजनी यांची ही बाजू जमेची ठरली होती. ते आपल्या पत्नीशी कायम एकनिष्ठ राहिले हे माधवी महाजनी यांच्या आत्मचरित्रातून स्पष्ट होते.