‘रिअल लाईफ’ प्रेमत्रिकोण!

By Admin | Published: June 2, 2017 04:42 AM2017-06-02T04:42:16+5:302017-06-02T04:42:16+5:30

बी-टाऊन म्हणजे सगळे काही. हॉट गॉसिप्स, कॉन्ट्रोव्हर्सी, स्कँडल, फेअरीटेल वेडिंग, ब्रेकअप्स... असे सगळे काही. बॉलिवूड इंडस्ट्रीतील

'Real Life' Pretoria! | ‘रिअल लाईफ’ प्रेमत्रिकोण!

‘रिअल लाईफ’ प्रेमत्रिकोण!

googlenewsNext

- Team CNX -
बी-टाऊन म्हणजे सगळे काही. हॉट गॉसिप्स, कॉन्ट्रोव्हर्सी, स्कँडल, फेअरीटेल वेडिंग, ब्रेकअप्स... असे सगळे काही. बॉलिवूड इंडस्ट्रीतील रिअल लाईफ लव्हस्टोरी म्हणजे आणखी एक मनोरंजनाचा भाग. बॉलिवूडमधील अनेकांच्या प्रेम कहाणीचा शेवट गोड झालाय. पण अनेकांची प्रेमकथा मात्र अधुरी राहिलीय. बॉलिवूडमधील असेच काही रिअल लाईफ लव्ह ट्रँगल अर्थात प्रेमत्रिकोण...


रेखा-अमिताभ बच्चन- जया भादुरी
अमिताभ बच्चन आणि रेखा या दोघांची प्रेमकथा बॉलिवूडमधील सगळ्यांत गाजलेली प्रेमकथा आहे. ‘दो अंजाने’ च्या सेटवर ही प्रेमकहाणी बहरली आणि ‘सिलसिला’च्या वळणावर संपली. अमिताभ बच्चन यांनी जया भादुरीसोबत लग्न केले. यादरम्यान, अमिताभ यांनी रेखासोबत सीक्रेट मॅरेज केल्याच्याही बातम्या आल्यात. ऋषी कपूर आणि नीतू सिंहच्या लग्नात रेखा भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून पोहोचली, त्यावेळी या बातम्यांना आणखीच ऊत आला. पण कालांतराने या नात्याला काही भविष्य नाही, हे लक्षात आले आणि अमिताभ व रेखाचे मार्ग वेगळे झाले.

कॅ टरिना कैफ- रणबीर कपूर- दीपिका पदुकोण
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण एकमेकांना भेटले. मग त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे प्रेम. पण रणबीर आपल्यासोबत असताना कॅटरिना कैफच्या प्रेमात अडकल्याचे दिसताच दीपिका त्याच्यापासून वेगळी झाली. मी दीपिकाला फसवल्याचे खुद्द रणबीरने कबूलही केले होते. त्याआधी दीपिका-रणबीर आणि सोनम कपूर असा प्रेमत्रिकोणही होता, हे येथे सांगितलेच पाहिजे.

शाहीद कपूर- करिना कपूर- सैफ अली खान

मैत्री झाल्यानंतर शाहीद कपूर आणि करिना कपूर एकमेकांच्या प्रेमात पडले. पण अचानक सैफ अली खानची एन्ट्री झाली अन् शाहीद व करिनाच्या नात्यात दुरावा आला. करिना सैफसोबत अधिक दिसू लागल्यावर तर दोघांचे ब्रेकअपच झाले. ‘टशन’ या चित्रपटानंतर इकडे शाहीद व करिनाच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि तिकडे करिना व सैफ एकत्र आले.

सलमान खान- ऐश्वर्या राय - विवेक ओबेरॉय

सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण सलमानने ऐश्वर्याला मारहाण केल्याच्या बातम्या बाहेर आल्या आणि यानंतर सलमान व ऐश्वर्या कायमचे दुरावले. यानंतर ऐश्वर्या राय विवेक ओबेरॉयच्या जवळ आली. पण हे रिलेशन जितक्या लवकर सुरू झाले, तितक्याच लवकर संपलेही.

वाणी गणपथी - कमल हासन- सारिका

कमल हासनने नृत्यांगना वाणी गणपथीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या दहा वर्षांनंतर कमल हासन अभिनेत्री सारिकाच्या प्रेमात पडला. सारिकासाठी कमलने वाणीला नाकारले आणि तिच्यासोबत राहू लागला. लग्नाआधी कमल व सारिका या दोघांना दोन मुली झाल्यात. यानंतर दोघांनी लग्न केले. पण हे नातेही तुटले. कमल त्याच्यापेक्षा वयाने अतिशय लहान असलेल्या सिमरननामक अभिनेत्रीच्या प्रेमात बुडाला आणि सारिकाने त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.


योगिता बाली- मिथुन चक्रवर्ती- श्रीदेवी
मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी या दोघांनी १९८० मध्ये सीक्रेट मॅरेज केल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी मिथुन योगिता बालीचा पती होता. मिथुन आपल्या पत्नीला सोडू शकत नाही आणि आपल्यासोबतचे नाते जाहीरपणे स्वीकारू शकत नाही, हे लक्षात आल्यावर श्रीदेवीने त्याच्यासोबतचे नाते तोडणेच योग्य समजले.

मोना शौरी- बोनी कपूर- श्रीदेवी

मिथुनसोबत नाते तोडल्यावर श्रीदेवी बोनी कपूरच्या पे्रमात पडली. लग्नाआधीच श्रीदेवी बोनीच्या बाळाची आई होणार असल्याचे कळले, तेव्हा मोना व बोनी वेगळे झाले. यानंतर बोनी कपूर व श्रीदेवी दोघांनी लग्न केले.

पूनम चंद्रमानी- शत्रुघ्न सिन्हा- रिना राय

शत्रुघ्न सिन्हा आणि रिना राय तेव्हा आॅन-स्क्रीन आणि आॅफ स्क्रीन कपल होते. शत्रुघ्न सिन्हा विवाहित आहे, हे माहीत असूनही रिना राय त्याच्याशी लग्न करायला तयार होती. पण पूनम सिन्हाला सोडायला शत्रुघ्नने रिनाला नकार दिला. मग काय, हे नाते संपवण्याशिवाय रिनाकडे पर्याय उरला नाही.

नदिरा जहीर - राज बब्बर- स्मिता पाटील
राज आणि नदिरा हे दोघे नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये भेटले आणि पुढे दोघांनी लग्नही केले. पण यानंतर ‘भीगी पलके’ या चित्रपटाच्या सेटवर राज बब्बर आणि स्मिता पाटील जवळ आले. स्मितासोबत लग्न करण्यासाठी राजने नदिराला घटस्फोट दिला. स्मिताच्या निधनानंतर राज पुन्हा नदिराकडे परतला.

Web Title: 'Real Life' Pretoria!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.