रीलमध्येही रीअल रोमान्सचा फील

By Admin | Published: November 23, 2015 01:44 AM2015-11-23T01:44:52+5:302015-11-23T01:44:52+5:30

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या ‘तमाशा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा या दोघांचा रोमान्स प्रेक्षकांना बघता येणार आहे.

Real Romance Feel in the Reel | रीलमध्येही रीअल रोमान्सचा फील

रीलमध्येही रीअल रोमान्सचा फील

googlenewsNext

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या ‘तमाशा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा या दोघांचा रोमान्स प्रेक्षकांना बघता येणार आहे. ही जोडी जेव्हा जेव्हा पडद्यावर आली तेव्हा तेव्हा त्यांचा अभिनय इतका नैसर्गिक वाटला की जणू ते खरंच एकमेकांचे लाइफ पार्टनर आहेत. शाहरूख आणि काजोल या दोघांच्या अभिनयाचा किस्साही असाच आहे. रीलमध्येही रीअल रोमान्सचा फील देणाऱ्या बॉलिवूडमधल्या अशाच काही गाजलेल्या काही रोमांटिक जोड्यांची ही आॅनस्क्रीन प्रेमकथा...
रणबीर कपूर - दीपिका पदुकोण
सध्याच्या पिढीसाठी ही अतिशय प्रेमळ जोडी आहे. त्यांचा रोमांन्स बघण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. ते एकत्र असले की, त्यांची केमिस्ट्री पडद्यावर पाहण्यासारखी असते. ब्रेक-अपनंतरही आनंदी वातावरणात काम कसे करावे, याचे उदाहरणच त्यांनी घातले आहे. ‘तमाशा’मध्येही असेच काहीचे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
शाहरूख खान - काजोल
या जोडीने बॉलिवूडच्या इतिहासात सर्वात जास्त काळ चाललेला ‘दिलवाले दुल्हेनिया ले जायेंगे’ हा चित्रपट प्रेक्षकांना गिफ्ट दिला आहे. ते पहिल्यांदा बाजीगर या चित्रपटातून एकत्र आले होते. त्यानंतर त्यांची केमिस्ट्री रंगतच गेली. कुछ-कुछ होता है, माय नेम इज खान, कभी खुशी कभी गम यांचा समावेश आहे. हे दोघे आता दिलवाले मधुन पुन्हा प्रेक्षकांसमोर येत आहेत. ही जोडीही अशीच आहे ती पडद्यावर फारच नॅचरल वाटली.
अमिताभ बच्चन - रेखा
या दोघांच्या पडद्यावरील अभिनयाबाबत काय बोलावे? कॅमेऱ्यासमोर असतानाही त्यांच्या मनातील भाव अगदी अलगद त्यांच्या चेहऱ्यावर उतरायचे. ही जोडी बॉलिवूडच्या इतिहासातील एव्हरग्रीन जोडी आहे. अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी पहिला चित्रपट १९७३ साली केला होता. नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या प्रेमाचा रंग प्रेक्षकांनी पडद्यावर अनुभवला.
माधुरी दीक्षित - सलमान खान
प्रत्येकवेळी तुम्ही जेंव्हा ‘हम आपके कोण’ बघता त्यावेळी खरंच वाटते की, ही जोडी प्रत्यक्ष जीवनातील एकमेकांचे साथीदार पाहिजे होते. पण, आपण ती इच्छाच करू शकतो. प्रत्यक्षात माधुरी दिक्षितने डॉ. नेने यांच्याशी विवाह केलेला आहे. ते असे म्हणतात की, चित्रपट फक्त स्वप्न विकतो, आपण त्यांना फक्त पुढच्या चित्रपटात एकत्र बघण्याची अपेक्षा व्यक्त करू शकतो.
धर्मेंद्र - हेमा मालिनी
असे म्हणतात की, धर्मेद्र आणि हेमामालिनी हे त्यांच्या १९७० मधील चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रेमात पडले होते. त्यांनी ४० चित्रपट एकत्र केले आहेत. पण ते लक्षात राहतात ते १९७५ मधील वीरू आणि बसंती या जोडीमुळे. हा चित्रपट आला तेव्हा दोघांचे लग्न झालेले नव्हते. पण, त्यांचा सहज अभिनय बघून अनेकांना ही रिअल जोडीच वाटत होती.
नितू सिंग - ऋषी कपूर
रणबीर कपूरचे आईवडील असलेले हे दोघं पडद्यावर आणि पडद्याबाहेरसुद्धा उत्कृष्ट जोडीदार वाटतात. तुम्हाला एक मै और एक तू हे गाणं आठवत असेल, तर तुम्हाला त्या रोमान्समधील निरागसताही नक्कीच आठवेल. ही जोडी नेहमीच चर्चेत राहिलेली जोडी आहे. त्यांनी एकत्रितपणे १५ चित्रपट केले आहेत. आणि ती पहिलीच जोडी आहे ज्यांच्यात काही वाद नाही. या जोड्यांनी पडद्यावरील केमिस्ट्रीच्या माध्यमातून प्रेक्षकांनाही प्रेमात पडण्याची प्रेरणा दिली, रोमान्सला नवीन अर्थ दिला. भलेही त्यांचे चित्रपट हिट असो किंवा फ्लॉप. त्यांना एकत्रित बघण्यातच प्रेक्षकांचा पैसा वसूल झालेला आहे.
राज कपूर - नर्गिस
एकंदर १६ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या या जोडीला बॉलिवूडच्या प्रेक्षकांनी नेहमीच पसंत केले आहे. त्यांनी श्री ४२०, आवारा आणि बरसातमधून संस्मरणीय भूमिका निभावली आहे. त्यांच्यावर चित्रित झालेली गाणीसुद्धा बॉलिवुडमधील प्रसिद्ध रोमांन्टिक गाणी आहेत. ‘प्यार हुआ एकरार हुआ’ हे गाणे तर इतके ताजे वाटते की, आजची पिढीसुद्धा ते गाणे ऐकते.

Web Title: Real Romance Feel in the Reel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.