Disha Patani And Tiger Shroff Breakup : दिशा पाटनी व टायगर श्रॉफचं का बिनसलं? वाचा, कपलचं ब्रेकअप होण्यामागचं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 05:29 PM2022-07-28T17:29:01+5:302022-07-28T17:29:46+5:30

Disha Patani And Tiger Shroff Breakup : दिशा पाटनी व टायगर श्रॉफ गेल्या 6 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण आता त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. आता हे ब्रेकअप का झालं याची चर्चा सुरू झाली आहे. आता एक वेगळीच चर्चा कानावर येतेय...

Reason Behind The Breakup Of Disha Patani And Tiger Shroff | Disha Patani And Tiger Shroff Breakup : दिशा पाटनी व टायगर श्रॉफचं का बिनसलं? वाचा, कपलचं ब्रेकअप होण्यामागचं खरं कारण

Disha Patani And Tiger Shroff Breakup : दिशा पाटनी व टायगर श्रॉफचं का बिनसलं? वाचा, कपलचं ब्रेकअप होण्यामागचं खरं कारण

googlenewsNext

Disha Patani And Tiger Shroff Breakup : बॉलिवूड इंडस्ट्रीत अफेअर्स, ब्रेकअप, पॅचअपच्या बातम्या नव्या नाहीत. नुकतंच बॉलिवूडच्या एका लोकप्रिय कपलचं ब्रेकअप झाल्याचं कळतंय. हे कपल म्हणजे, दिशा पाटनी (Disha Patani ) व टायगर श्रॉफ (Tiger Shroff). खरं तर दिशा व टायगर दोघांपैकी कुणीही आपल्या रिलेशनशिपची कबुली दिली नव्हती. पण त्याचं नातं लपून राहिलं नव्हतं. गेल्या 6 वर्षांपासून दोघं रिलेशनशिपमध्ये होते. पण आता त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. आता हे ब्रेकअप का झालं याची चर्चा सुरू झाली आहे. तर आता एक वेगळीच चर्चा कानावर येतेय.

कपलच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशाला लग्न करायचं होतं. पण टायगर यासाठी राजी नव्हता. इथेच सगळं बिनसलं आणि दोघांचं ब्रेकअप झालं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगरने आई-बाबाचं घर सोडून स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून तो व दिशा जवळजवळ सोबत राहत होते. इतका काळ एकत्र राहिल्यानंतर आता लग्नाचा निर्णय घ्यावा, असं दिशाला वाटू लागलं आणि तिने हा निर्णय टायगरला सांगितला. पण टायगरने ‘नहीं, अभी नहीं,’ म्हणत तिला टाळलं. दिशाला लग्न हवं होतं आणि टायगर यासाठी राजी नव्हता. अखेर दिशा व टायगरने ब्रेकअपचा निर्णय घेतला.

 मार्च 2022 मध्ये टायगरचे डॅड जॅकी श्रॉफ यांनीही टायगर अद्याप लग्नासाठी तयार नसल्याचे म्हटलं होतं. त्यावेळी टायगर व दिशा दोघंही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा होती. पण जॅकीने या चर्चा धुडकावून लावल्या होत्या. टायगरचं लग्न सध्या त्याच्या कामाशी झालं आहे. तो कामावर फोकस करतोय. लग्नाचा त्याचा काहीही इरादा नाही, असं जॅकीने स्पष्ट केलं होतं.

कालच जॅकीने टायगर व दिशाच्या ब्रेकअपच्या बातमीवरही प्रतिक्रिया दिली होती. ते एकत्र आहेत की नाही, हा त्यांचा निर्णय आहे. ती त्यांची लव्हस्टोरी आहे. मी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल काहीही बोलू शकत नाही, असं जॅकी म्हणाला होता.

Web Title: Reason Behind The Breakup Of Disha Patani And Tiger Shroff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.