या कारणामुळे चर्चा फक्त देसी गर्ल प्रियांका निकच्या लग्नाचीच,वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 06:00 AM2018-12-25T06:00:00+5:302018-12-25T06:00:00+5:30

प्रियांका-निक विवाह हा सर्वाधिक लोकप्रिय, चर्चित आणि ट्रेंडिंग सेलिब्रिटी विवाह बनलाय. प्रियांकाच्यानंतर तिची प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या दीपिकाचा विवाह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर दूस-या स्थानी आहे.

For this reason the discussion is only for Desi Girl Priyanka Nika's wedding, read detailed | या कारणामुळे चर्चा फक्त देसी गर्ल प्रियांका निकच्या लग्नाचीच,वाचा सविस्तर

या कारणामुळे चर्चा फक्त देसी गर्ल प्रियांका निकच्या लग्नाचीच,वाचा सविस्तर

googlenewsNext

गेल्या काही दिवसांमध्ये प्रियांका चोप्रा सातत्याने आपल्या लग्नाच्या बातम्यांनी सर्वत्र चर्चेचा विषय होती.  इंटरनॅशनल सिंगर निक जोन्स आणि प्रियांकाचे लग्न ह्या ग्लोबल आयकॉनला स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय बनले आहेत. प्रियांका-निक विवाह हा सर्वाधिक लोकप्रिय, चर्चित आणि ट्रेंडिंग सेलिब्रिटी विवाह बनलाय. प्रियांकाच्यानंतर तिची प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या दीपिकाचा विवाह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर दूस-या स्थानी आहे. जोधपुरमध्ये पारंपरिक पध्दतीने लग्न करण्यापासून ते मुंबईमध्ये रिसेप्शनपर्यंत तीन आठवडे चाललेल्या प्रियंकाच्या ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ ने स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर नुकत्याच झालेल्या बॉलीवूड विवाहांमध्ये ‘सर्वाधिक चर्चित विवाह’ असण्याचा मान पटकावलाय.

आंतरराष्ट्रीय मॅगझिन आणि मीडियाने प्रियांका-निकच्या लग्नाचे फोटो, व्हिडीयोला प्रसिध्दी दिली. जे ह्याअगोदरच्या बॉलीवूड लग्नांच्याबाबतीत कधीच घडले नव्हते.एवढेच नाही तर मुंबई झालेल्या रिसेप्शनचे फोटोसूध्दा सोशल मीडिया, डिजीटल आणि न्यूज प्रिंटमध्ये ट्रेंड झाले. यामुळेच दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या कव्हरेजला मागे टाकत प्रियांका आणि निकचे लग्न सर्वाधिक चर्चेत असलेले लग्न ठरले. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे  ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्विन कौल सांगतात, "निक जोन्स आणि प्रियांका चोप्रा दोघांचे लग्न दीपिका-रणवीरच्या लग्नापेक्षा डिजिटल न्यूज, फेसबुक, न्यूजप्रिंट, ट्विटर, इंस्टाग्राम आणि वायरल न्यूजव्दारे चांगलेच गाजले. " अश्वनी कौल सांगतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

प्रियंका-निकच्या लग्नात दीड ते दोन हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.  २९ नोव्हेंबरला मेहंदी आणि संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता.३० नोव्हेंबरला कॉकटेल पार्टी, १ डिसेंबरला हळद समारंभ आणि २ डिसेंबरला प्रियंका-निकचं शुभमंगल पार पडले होते.

 

 

Web Title: For this reason the discussion is only for Desi Girl Priyanka Nika's wedding, read detailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.