'या' क्षुल्लक कारणावरुन राणी-ऐश्वर्यामध्ये वादाची ठिगणी; २० वर्षांपासून दोघींमध्ये आहे अबोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 01:55 PM2023-03-22T13:55:21+5:302023-03-22T13:56:19+5:30

Aishwarya rai and rani mukerji : 'चलते चलते' या सिनेमामुळे खरं तर या दोन दिग्गज अभिनेत्रींमध्ये वादा निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं.

reason of bollywood actor aishwarya rai and rani mukerji cat fight | 'या' क्षुल्लक कारणावरुन राणी-ऐश्वर्यामध्ये वादाची ठिगणी; २० वर्षांपासून दोघींमध्ये आहे अबोला

'या' क्षुल्लक कारणावरुन राणी-ऐश्वर्यामध्ये वादाची ठिगणी; २० वर्षांपासून दोघींमध्ये आहे अबोला

googlenewsNext

कलाविश्वात अभिनेत्रींमध्ये होणारी कॅटफाईट कोणालाही नवीन नाही. अनेक दिग्गज अभिनेत्रींचं एकमेकींसोबत पटत नसल्याचं अनेकदा समोर आलं आहे. यात काही अभिनेत्रींनी तर उघडउघड एकमेकींवर टीकास्त्रही डागलं आहे. परंतु, सध्या कलाविश्वात अशा दोन अभिनेत्रींची चर्चा होत आहे. ज्या एकेकाळी एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी होत्या. मात्र, एका क्षुल्लक कारणामुळे त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि त्यांच्यात कायमचा अबोला निर्माण झाला.

'चलते चलते' या सिनेमामुळे खरं तर या दोन दिग्गज अभिनेत्रींमध्ये वादा निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं. सुरुवातीला चलते चलतेसाठी ऐश्वर्या रायची (aishwarya rai) निवड करण्यात आली होती. मात्र, त्या काळी ती सलमानला (salman khan) डेट करत असल्यामुळे सलमान अनेकदा सेटवर येऊन गोंधळ घालायचा. ज्यामुळे एकदा शाहरुखने मध्यस्थी करायचा प्रयत्न केला होता. शाहरुखने (shahrukh khan)मध्यस्थी केल्यामुळे सलमानने त्यालाच चार शब्द सुनावले. या घटनेनंतर शाहरुखला राग आला आणि त्याने ऐश्वर्यासोबत काम करण्यास नकार दिला. ऐश्वर्याला रिप्लेस करण्यासाठी त्यांनी राणी मुखर्जीची (rani mukerji) निवड केली. विशेष म्हणजे राणीने क्षणाचाही विलंब न करता या सिनेमासाठी होकार दिला.

राणीने दिलेल्या होकारामुळे तिने आपली फसवणूक केली असा समज ऐश्वर्याचा झाला आणि तिने राणीशी बोलणं बंद केलं. विशेष म्हणजे या घटनेला इतकी वर्ष झाली तरीदेखील राणी आणि ऐश्वर्यामधील हे वैर कायम आहे.
 

Web Title: reason of bollywood actor aishwarya rai and rani mukerji cat fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.