'सुलतान'ची 3 दिवसांत रेकॉर्डब्रेक 100 कोटींची कमाई
By Admin | Published: July 9, 2016 06:41 PM2016-07-09T18:41:07+5:302016-07-09T18:42:17+5:30
बॉलिवूड दबंग सलमान खानचा 'ईद'च्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आलेल्या 'सुलतान' चित्रपटाने फक्त 3 दिवसांत 105 कोटींची कमाई केली आहे
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 09 - बॉलिवूड दबंग सलमान खानचा 'ईद'च्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आलेल्या 'सुलतान' चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. बुधवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुलतानगिरी करत फक्त 3 दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. सुलतानच्या कमाईने वर्षातील बॉलिवूडचे जवळपास 6 रेकॉर्ड मोडित काढले आहेत.
'सुलतान' चित्रपटाने फक्त 3 दिवसांत 105 कोटींची कमाई केली आहे. सुलतानने पहिल्या दिवशी 36.54 कोटी, दुसऱ्या दिवशी 37.30 कोटी तर तिसऱ्या दिवशी 31.50 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 'सुलतान'ने एवढी कमाई करत 6 रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
याअगोदर सलमानच्याच 'प्रेम रतन धन पायो'ने तिसऱ्या दिवशी 101 कोटी तर 'बजरंगी भाईजान'ने 102 कोटींचा गल्ला जमवला होता. 'सुलतान'च्या अगोदर अक्षय कुमारच्या 'एअरलिफ्ट'च्या नावे तीन दिवसात 83.50 कोटी कमावण्याचा विक्रम होता. 'सुलतान' 2016 मध्ये 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड 'एअरलिफ्ट' आणि 'हाऊसफुल 3' च्या नावावर होता. 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा सलमानचा हा दहावा सिनेमा आहे.
सलमानचा 'एक था टायगर' आणि 'सुलतान' हे दोन सिनेमे बुधवारी रिलीज झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक कमाईची बाजी 'सुलतान'ने मारली आहे. खेळावर आधारित चित्रपटांच्या यादीत देखील 'सुलतान' सर्वात वरील स्थानावर आहे. यापूर्वी 'भाग मिल्खा भाग'ने तीन दिवसात 52.44 कोटींची तर 'मेरी कोम'ने तीन दिवसात 12.7 कोटींचा गल्ला जमवला होता.
#Sultan Wed 36.54 cr, Thu 37.30 cr, Fri 31.50 cr. Total: ₹ 105.34 cr. India biz... Will continue its WINNING STREAK on Sat + Sun.— taran adarsh (@taran_adarsh) July 9, 2016
Salman Khan's BIGGEST OPENERS...#Sultan 105.34 cr [Wed+Thu+Fri]#BajrangiBhaijaan 102.60 cr [Fri+Sat+Sun]#PRDP 101.47 cr [Thu+Fri+Sat]— taran adarsh (@taran_adarsh) July 9, 2016
HINDI FILMS that crossed ₹ 100 cr [nett] biz in 2016...#Airlift [Jan]#HF3 [June]#Sultan [July]
India biz.— taran adarsh (@taran_adarsh) July 9, 2016