रेकॉर्डतोड "बाहुबली", पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2017 09:12 AM2017-04-29T09:12:03+5:302017-04-29T09:12:56+5:30
भारतात 6500 आणि जगभरातील किमान 9000 स्किन्सवर रिलीज झालेल्या "बाहुबली 2"ने पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार केला आहे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - दिग्दर्शक एसएस राजामौली आणि प्रभास यांच्या बहुप्रतिक्षित "बाहुबली 2" चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली आहे. रिलीज होण्याआधीच 500 कोटींची कमाई करणा-या चित्रपटाची लोकांना प्रचंड उत्सुकता आहे. भारतात 6500 आणि जगभरातील किमान 9000 स्किन्सवर रिलीज झालेल्या "बाहुबली 2" पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार करेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. बॉक्स ऑफिस रिपोर्ट आणि मिळालेल्या माहितीनुसार बाहुबलीने अत्यंत सहजपणे 100 कोटींचा आकडा पार केला आहे. पहिल्याच दिवशी 100 कोटींची तुफानी कमाई करणारा बाहुबली भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट ठरला आहे.
"बाहुबली 2"च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा 115 ते 120 करोडपर्यंत असल्याची माहिती आहे. चित्रपटाने केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईमध्ये इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काही नसून हे अपेक्षितच होतं असं समीक्षक सांगत आहेत. विशेष म्हणजे तीन दिवसांत चित्रपट 300 कोटींचा आकडा पार करेल असं सांगण्यात येत आहे.
"बाहुबली 2" ने सकाळी 95 टक्के प्रेक्षकांसोबत ओपनिंग केली होती. जवळजवळ सर्व थिएटर्स हाऊसफुल होती. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही ट्विट करत "बाहुबली 2" रेकॉर्डतोड कमाई करणारा चित्रपट असल्याचं सांगितलं होतं.
Unbelievable... Unthinkable... Unimaginable... #Baahubali2 starts with a DEAFENING ROAR... Shatters ALL records... Creates HISTORY...— taran adarsh (@taran_adarsh) April 29, 2017
देशातल्या सर्वच प्रमुख शहरांमधील मल्टिप्लेक्समध्ये अॅडव्हान्स बुकिंग फुल्ल झाले असून, बाहुबलीने आमिर खानच्या "दंगल"लाही मागे टाकलं आहे. बूक माय शोने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसात तिन्ही भाषांना मिळून बाहुबलीची किमान 10 लाख तिकिटं विकली गेली आहेत. त्यामुळे पहिल्या तीन दिवसांत चित्रपट 300 कोटींपेक्षा अधिक कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
"बाहुबली : द बिगिनिंग हा सिनेमा 2015 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. मात्र कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या प्रश्नाचं उत्तर या सिनेमात अपूर्ण राहिलं. त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलची सर्वांना उत्सुकता लागली होती.
आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट "बाहुबली 2" हा सिनेमा तेलगु, तमिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये आज रिलीज झाला आहे. देशभरात या चित्रपटच्या तिकिटांची किंमतही वेगवेगळा आहे. दिल्लीत, या चित्रपटाचं किंमत 2400 वर येऊन पोहोचली आहे. तर अमेरिकेत या चित्रपटासाठी चाहत्यांना 40 डॉलर मोजावे लागणार आहेत. या सिनेमाच्या हिंदी भागाची सर्व हक्क करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनतर्फे घेण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया, सत्यराज, रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत.