चित्रपदार्पण पुरस्कारामध्ये ‘रेडू’ची बाजी ; सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शनासह पाच पुरस्कार        

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 07:56 PM2019-03-02T19:56:30+5:302019-03-02T19:57:29+5:30

नवोदित कलाकारांना प्रोत्साहनासाठी डिव्हाईन कॉज सोशल फौंडेशन आणि मराठी चित्रपट परिवारतर्फे चित्रपदार्पण पुरस्कारांचे आयोजन केले जाते.

'Redu' best in the chitrapadarpan Awards; Best Film, Directing Five awards | चित्रपदार्पण पुरस्कारामध्ये ‘रेडू’ची बाजी ; सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शनासह पाच पुरस्कार        

चित्रपदार्पण पुरस्कारामध्ये ‘रेडू’ची बाजी ; सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शनासह पाच पुरस्कार        

googlenewsNext

पुणे :  नवोदित कलाकारांना प्रोत्साहनासाठी डिव्हाईन कॉज सोशल फौंडेशन आणि मराठी चित्रपट परिवारतर्फे आयोजित ९ व्या चित्रपदार्पण पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासह दिग्दर्शक, कथा अशा विविध विभागांमध्ये पुरस्कार पटकावून ‘ रेडू ’या चित्रपटाने बाजी मारली. 
प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, पुष्कर जोग, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, निमार्ते वैभव जोशी, अभिनेता राहुल सोलापूरकर, प्रिती व्हिक्टर, सुनंदा काळुसकर मराठी चित्रपट परिवारचे निवृत्ती जाधव, राहुल सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते. 
रेडू या चित्रपटासाठी दिग्दर्शक सागर वंजारी यांना गौरविण्यात आले. मंत्र चित्रपटासाठी सौरभ गोगटे आणि शिकारी चित्रपटासाठी सुव्रत जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले तर तृप्ती तोरडमल यांना सविता दामोदर परांजपे चित्रपटासाठी आणि गौरी किरण यांना पुष्पक विमान चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार हॉस्टेल डेजमधील भूमिकेसाठी विराजस कुलकर्णी आणि मंत्र मधील भूमिकेसाठी शुभंकर एकबोटे यांना मिळाला. 
  माधुरी  चित्रपटातील भूमिकेसाठी संहिता जोशी हिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. संजय नवगिरे यांची रेडू कथा सर्वोत्कृष्ट ठरली तर   फर्जंद चित्रपटाच्या पटकथा आणि संवादासाठी दिग्पाल लांजेकर यांना पारितोषिक मिळाले. बबन चित्रपटाचे गीतकार सुहास मुंढे सर्वोत्कृष्ट ठरले. तर याच चित्रपटासाठी ओंकार स्वरुप यांना गौरविण्यात आले. 
नॉन फिल्मी म्युझिक अल्बम विभागामध्ये  यु अ‍ॅन्ड मी अल्बम सर्वोत्कृष्ट ठरला. अमिता घुगरी (सर्वोत्कृष्ट पाशर््वगायिका, रेडू), रणजीत माने (सर्वोत्कृष्ट कँमेरामन, चिठ्ठी), नेहा गुप्ता (सर्वोत्कृष्ट निर्मितीमूल्य, रेडू), सर्वोत्कृष्ट संकलन मंत्र - सचिन पंडीत, सर्वोत्कृष्ट वेशभूषा हॉस्टेल डेज - मोहिनी ननावरे. सर्वोत्कृष्ट संगीतकार - साई पियुष - यु अ‍ॅन्ड मी, शशांक प्रतापवार - साहिबा, सर्वोत्कृष्ट गायक - सागर मोडक - तू नसताना, सर्वोत्कृष्ट गायिका रसिका सुनील - यु अ‍ॅन्ड मी, सर्वोत्कृष्ट गीतकार - अदिती द्रविड - झिलमिल यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Web Title: 'Redu' best in the chitrapadarpan Awards; Best Film, Directing Five awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.