संजय दत्तची शिक्षा माफ करण्यास नकार

By Admin | Published: September 25, 2015 03:31 AM2015-09-25T03:31:37+5:302015-09-25T03:31:51+5:30

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची शिक्षा माफ करण्याबाबत

Refuse to forgive Sanjay Dutt | संजय दत्तची शिक्षा माफ करण्यास नकार

संजय दत्तची शिक्षा माफ करण्यास नकार

googlenewsNext

मुंबई - बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची शिक्षा माफ करण्याबाबत माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी दोन वर्षांपूर्वी केलेला अर्ज महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या आरोपीला माफी दिल्यास चुकीचा पायंडा पडेल, असे कारण दिले आहे.
काटजू यांनी तत्कालीन राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री व राज्यपाल यांना पत्र लिहून शिक्षा माफ करण्याची मागणी केली होती. काटजू यांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या अर्जावरील गृहखात्याने आपला अभिप्राय ८ सप्टेंबर २०१५ रोजी राज्यपालांना कळवला. त्यानुसार अर्ज फेटाळण्याचा निर्णय राज्यपालांनी घेऊन सरकारकडे पाठवला.

Web Title: Refuse to forgive Sanjay Dutt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.