संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’मध्ये एव्हरग्रीन रेखाची एन्ट्री? लिहिला खास रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 02:15 PM2022-06-14T14:15:20+5:302022-06-14T14:15:44+5:30
Heeramandi, Rekha : एव्हरग्रीन रेखाच्या सौंदर्यावर सगळेच फिदा आहेत. हीच रेखा आता कमबॅकसाठी तयार आहे...
एव्हरग्रीन रेखाच्या (Rekha) सौंदर्यावर सगळेच फिदा आहेत. हीच रेखा आता कमबॅकसाठी तयार आहे, असं म्हणायला हरकत नाही. होय, संजय लीला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali ) ‘हीरामंडी’ या सीरिजमध्ये एव्हरग्रीन ब्युटी रेखाची एन्ट्री होणार आहे. चर्चा तर हीच आहे. गंगूबाई काठियावाडी, रामलीला, पद्मावती, बाजीराव मस्तानी अशा एकापेक्षा एक दर्जेदार कलाकृती देणारे संजय लीला भन्साळी ‘हीरामंडी’ ( Heeramandi) ही भव्यदिव्य सीरिज बनवत आहेत. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सीरिजमध्ये रेखाची एन्ट्री होऊ शकते.
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, भन्साळींच्या या सीरिजमध्ये रेखा एका महत्त्वपूर्ण रोलमध्ये दिसू शकते. हा रोल खास रेखासाठी लिहिला गेला आहे, असंही कळतंय. रेखा दीर्घकाळापासून भन्साळींसोबत काम करण्यास उत्सुक होती. भन्साळीही रेखासोबत काम करण्यास आतुर होते. ‘हीरामंडी’च्या निमित्ताने हा योग जुळून आला, असं मानलं जातंय.
संजय लीला भन्साळींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ‘हीरामंडी’ ही वेब सीरिज एकूण सात एपिसोड्समध्ये दाखवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची कथा दाखवण्यात येणार आहे. यातील कथा ही हीरामंडी सेक्स वर्कर्सच्या कहाणीशी संबंधित असल्याचं देखील बोललं जातंय. सोबतच भारतातल्या हीरामंडी जिल्ह्याची सांस्कृतिक वास्तविकता सुद्धा या वेब सीरिजच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. संजय लीला भन्साळींच्या या ग्रॅण्ड प्रोजेक्टमध्ये राजकारण, प्रेम आणि विश्वासघात या भावनांचं दर्शन घडवणार आहे.
‘हीरामंडी’ची कास्टिंग पूर्ण झाली आहे. रेखाशिवाय माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, हुमा कुरेशी, ऋचा चड्ढा यात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. भन्साळी लवकरच कलाकारांची अधिकृत घोषणा करू शकतात.
पाकिस्तानातील रेडलाइट एरिया ‘हीरामंडी’
‘हीरामंडी’चं नाव शिख महाराजा रणजीत सिंह यांचे मंत्री हिरा सिंह यांच्या नावावरून पडलं होतं. हिरा सिंहने इथे धान्याच्या बाजाराचं निर्माण केलं होतं. त्यानंतर हळूहळू त्यांनी या मंडीत तवायफांना आणलं. तेच महाराजा रणजीत सिंह यांनी नेहमीच या परिसराल संरक्षित करण्याचं काम केलं. या भागाला शाही मोहल्ला म्हणूनही ओळखलं जातं. कारण हा परिसर लाहोर किल्ल्याच्या बाजूलाच आहे.
मुघल काळादरम्यान अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तान साख्या ठिकाणांहून महिलांना या मोहल्ल्यात आणलं जातं होतं. आजसारख्या त्यावेळी तवायफ बदनाम नव्हत्या. मुघलकाळात त्या संगीत, नृत्य, तहजीब आणि कलेशी जुळलेल्या होत्या. त्यांच्यामुळेच उच्च वगार्तील लोकांच्या मैफली सजायच्या. ज्यासाठी उच्च वगार्तून त्यांना इनाम दिले जायचे. काही काळाने शाही मोहल्ल्यात हिंद नहाद्वीप भागातील महिलाही येऊ लागल्या. त्या मुघलांसमोर क्लासिकल नृत्य करायच्या.
कालांतराने मुघलांच्या काळाची चमक फिकी पडली. परदेशी आक्रमणां दरम्यान शाही मोहल्ल्यात वसवलेले तवायफखाने तोडले गेले. त्यानंतर हळूहळू इथे वेश्यावृत्ती वाढली आणि आता तर इथे किन्नरांचे नृत्य बघितले जातात.
दिवसा तर लाहोरचा हा भाग पूर्णपणे नॉर्मल मार्केट वाटतो. पण अंधार होताच हा भाग रेडलाइट एरिया बनतो. जर तुम्ही कलंक सिनेमा पाहिला असेल तर त्यातही शाही मोहल्ल्याचा उल्लेख आहे.