अखेर 'पुष्पा २' ची रिलीज डेट लॉक, या तारखेला थिएटर गाजवायला येणार अल्लू अर्जुन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 08:55 AM2024-06-18T08:55:29+5:302024-06-18T08:57:34+5:30

'पुष्पा २' च्या रिलीज डेटवरील पडदा बाजूला सरकला आहे. या तारखेला होणार सिनेमा थिएटरमध्ये रिलीज

release date of Pushpa 2 is locked starring Allu Arjun rashmika mandanna fahad fazil | अखेर 'पुष्पा २' ची रिलीज डेट लॉक, या तारखेला थिएटर गाजवायला येणार अल्लू अर्जुन

अखेर 'पुष्पा २' ची रिलीज डेट लॉक, या तारखेला थिएटर गाजवायला येणार अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' ची उत्सुकता शिगेला आहे. 'पुष्पा २' मधलं 'अंगारो सा..' गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. सामान्य माणसांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण या गाण्यावर रील्स बनवत आहेत. 'पुष्पा २' च्या रिलीजबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. १५ ऑगस्ट २०२४ ला सिनेमा रिलीज होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण अखेर 'पुष्पा २' च्या मेकर्सनी सिनेमाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा केलीय.

या तारखेला 'पुष्पा २' होणार रिलीज

काल १७ जूनला रात्री 'पुष्पा २' च्या मेकर्सनी नवीन पोस्टर शेअर करत सिनेमाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा केलीय. 'पुष्पा २' सिनेमाच्या नवीन पोस्टरमध्ये अल्लूने कोट परिधान केला असून डोक्यावर शेला गुंडाळला आहे. हातात तलवार असलेल्या खतरनाक अवतारात अल्लू अर्जुन दिसतोय. या पोस्टरवर 'पुष्पा २' ची रिलीज डेटही झळकत आहे. ६ डिसेंबर २०२४ ला 'पुष्पा २' भारतभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

'पुष्पा २' मधील कलाकार

याआधी १५ ऑगस्ट रोजी 'पुष्पा 2' रिलीज होणार होता. पण आता सर्वांनाच ६ डिसेंबरची उत्सुकता आहे. त्याआधी याचा ट्रेलर कधी येतो याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. चंदन तस्करीमध्ये दादा असणाऱ्या पुष्पा समोर आता डॅशिंग पोलिस ऑफिस असणार आहे. फहाद फाजिलने या पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. दोघांमधील खतरनाक अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. शिवाय पुष्पा आणि श्रीवल्लीची पुढील लव्हस्टोरीही मनोरंजन करणार आहे. सुकुमार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

Web Title: release date of Pushpa 2 is locked starring Allu Arjun rashmika mandanna fahad fazil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.