Anniversary Special :आई-वडील लग्नात उपस्थित नसल्याने नणंदेने केले होते रेणुका शहाणेचे कन्यादान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 12:19 PM2020-05-26T12:19:42+5:302020-05-26T12:26:02+5:30
आज रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्या लग्नाचा १९ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी त्यांचे एक कपल मानले जाते.
अभिनेता आशुतोष राणा आणि अभिनेत्री रेणुका शहाणे हे बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक आहे. ते दोघे अनेक सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र हजेरी लावतात. त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. रेणुका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. त्याचसोबत विविध सामाजिक प्रश्नांवर आपले मत मांडत असते. त्यामुळे तिला सोशल मीडियावर लोक मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. रेणुकाने आज तिच्या खाजगी जीवनाविषयी एक खास गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आज रेणुका आणि आशुतोष यांच्या लग्नाचा १९ वा वाढदिवस आहे. रेणुकाने त्यांच्या लग्नामधील एक क्यूट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, आमच्या लग्नाला १९ वर्षं पूर्ण झाले... किती सुंदर आहे हे सगळे...
You and I....what a beautiful world....19 years ago today......love eternal @ranaashutosh10 ❤❤❤ pic.twitter.com/HXfoKDencl
— Renuka Shahane (@renukash) 25 May 2020
रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांची प्रेमकथा ही खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यांची भेट दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. या चित्रपटाच्या ट्रायलच्यावेळी आशुतोष अभिनेत्री राजेश्वरी सचदेवसोबत आला होता. राजेश्वरी आणि रेणुका या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. याच वेळी राजेश्वरीने रेणुका आणि आशुतोष यांची ओळख करून दिली. पण त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या संपर्कात देखील नव्हते. पण काहीच महिन्यांनी आशुतोषने दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने रेणुकाला फोन केला. त्यानंतर त्यांच्यात वारंवार फोनवर बोलणे व्हायला लागले, त्यांचे भेटणे सुरू झाले आणि त्यानंतर काहीच महिन्यात त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आशुतोष आणि रेणुका यांच्या लग्नाची देखील एक गंमतीदार आठवण आहे. आशुतोष हा मुळचा मध्यप्रदेशचा आहे. मध्यप्रदेश मधील त्याच्या गावात त्यांचे लग्न झाले. रेणुका लग्नासाठी ट्रेनने गेली होती. त्यावेळी स्टेशनवर घ्यायला तिला कमीत कमी दीड हजार लोक तिथे आले होते. त्यांच्या लग्नाला तर इतकी गर्दी झाली होती की, या गर्दीमुळे रेणुकाचे आई वडील लग्नाच्या ठिकाणापर्यंत देखील पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ऐनवेळी तिचे कन्यादान तिच्या नणंदेने केले.