REVIEW : इमोशननं भरलेला सलमान खानचा "ट्युबलाइट"
By Admin | Published: June 23, 2017 01:52 PM2017-06-23T13:52:34+5:302017-06-23T13:52:34+5:30
बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा "ट्युबलाइट" आज बॉक्सऑफिसवर झळकला आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा "ट्युबलाइट" आज बॉक्सऑफिसवर झळकला आहे. दोन सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर कबीर खान आणि सलमान खान यांची ही जोडी "ट्युबलाइट" सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा एकत्र आली.
हॉलिवूड सिनेमा "अ लिटल बॉय" या सिनेमापासून प्रेरणा घेत "ट्युबलाइट" सिनेमा साकारण्यात आला आहे. या सिनेमात ज्या प्रकारे सलमान खानला प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आलं आहे, तसा सलमान यापूर्वी तुम्ही कधीही पाहिला नसेल. कारण यात सलमान ना आपलं शर्ट काढणार ना आपली सिक्स पॅक अॅब दाखवणार.
सलमान खानचा "ट्युबलाइट" सिनेमा पूर्णतः इमोशननं भरलेला आहे. सलमान "लक्ष्मण सिंह बिष्ट"ची भूमिका साकारत आहे. ज्याला परिसरातील सर्व जण "ट्युबलाइट" या नावानं हाक मारत असतात, कारण वयोमानानुसार त्याच्या बुद्धीची वाढ झालेली नाही. लक्ष्मण जगतपूर शहरातील रहिवासी असून त्याचा छोटा भाऊ भरत सिंह बिष्ट (सोहेल खान) आपल्या मोठ्या भावाची योग्यरित्या सांभाळ करत असतो.
अनाथ आश्रमात भरत आणि लक्ष्मण लहानचे मोठे होतात. यादरम्यान, भरतला आर्मीमध्ये नोकरी मिळते. 1962च्या भारत-चीन युद्धादरम्यानची ही कहाणी आहे. भारत-चीन युद्धादरम्यान भरतला कर्तव्य बजावण्यासाठी जावं लागतं. मात्र यावेळी त्याच्या परत येण्याची शक्यता फार कमी असते. इथूनच सुरू होतो सिनेमातील इमोशनल क्षणांना सुरुवात होते. यानंतर लक्ष्मण पूर्णतः एकटा पडतो त्याला भावाची आठवण सतावू लागते. सर्वजण त्याला म्हणत असतात तुझा भाऊ परतणार नाही. यामुळे तो आणखी भावूक होतो. त्यावेळी कसंही करुन आपल्या भावाला पुन्हा आणायचं, यासाठी लक्ष्मणचे प्रयत्न सुरू होतात.
या प्रयत्नात सलमानला खान चाचा (ओम पुरी), जादूगार शाशा (सलमान खान) आणि शी लिंग (झू झू) वेळोवेळी मदत करतात. पण लक्ष्मणच्या प्रयत्नांना यश येत का? लक्ष्मण आपल्या भावाला युद्धाच्या मैदानातून पुन्हा आणण्यात यशस्वी होतो का ? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहावा लागणार आहे. दरम्यान, कबीर खान या सिनेमाचं स्क्रिप्टिंग आणि दिग्दर्शनात काही ठिकाणी कमी पडल्याचं दिसत आहे. सिनेमातील अनेक पैलूंना अर्थच लागत नाही. यामुळे काही ठिकाणी सिनेमा रटाळ वाटण्याची शक्यता आहे.
सिनेसमीक्षकांनुसार पहिल्या तीन दिवसांत ट्युबलाइट 100 कोटी रुपयांचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. शिवाय एकूण कमाई 350 कोटी रुपये होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सिनेमाममध्ये सलमान खान, सोहेल खान यांच्याव्यतिरिक्त यशपाल शर्मा, जिशान, चीनमधील अभिनेत्री झू झू यांच्याही मुख्य भूमिका आहेत. दिवंगत अभिनेते ओम पुरीदेखील या सिनेमामध्ये दिसत आहेत, त्यांचा हा शेवटचा सिनेमा आहे. जानेवारी 2017मध्ये त्यांचे निधन झाले होते.