अनुष्का शर्मा एक घाबरवणारी 'परी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 07:22 AM2018-03-02T07:22:51+5:302023-08-08T20:27:58+5:30

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत रोमान्स, थ्रिलर, रहस्यमय असे एकापेक्षा एक चित्रपट बनले आहेत पण भयपट बनवण्यात बॉलिवूड थोडे मागे पडते

Anushka Sharma is a scary 'fairy' | अनुष्का शर्मा एक घाबरवणारी 'परी'

अनुष्का शर्मा एक घाबरवणारी 'परी'

Release Date: March 02,2018Language: हिंदी
Cast: अनुष्का शर्मा,परम्ब्रता चैटर्जी, रिताभरी चक्रबर्ती, मानसी मुल्तानी, रजत कपूर
Producer: अनुष्का शर्माDirector: प्रोसित रॉय
Duration: २ तास १६ मिनटंGenre:
लोकमत रेटिंग्स
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">हर्षवर्धन पाठक
 
बॉलिवूडमध्ये आतापर्यंत रोमान्स, थ्रिलर, रहस्यमय असे एकापेक्षा एक चित्रपट बनले आहेत पण भयपट बनवण्यात बॉलिवूड थोडे मागे पडते. म्हणूनच जेव्हा जेव्हा गोष्ट हॉरर चित्रपटाची येते तेव्हा  भारतीय प्रेक्षक हॉलिवूड चित्रपट पाहणे पसंत करतात पण आता अनुष्काचा परी हा चित्रपट ही प्रथा कदाचित बदलू शकेल. कारण अनुष्काचा परी हा चित्रपट हॉलिवूडच्या भयपटांना टक्कर देणार आहे. अनुष्काचा परी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ह्या आधीच या चित्रपटाच्या पोस्टर आणि टिझरने सगळ्यांची उत्सुकता वाढवली होती चला तर मग जाणून घेऊ या कसा आहे हा चित्रपट
 
चित्रपटाची कहाणी अर्णब (परंब्रता चटर्जी) आणि पियाली (रिताभरी चक्रवर्ती) च्या भेटी पासून सुरू होते. ह्यानंतर जेव्हा अर्णब आपल्या कटुंबा बरोबर परत घरी जातो तेव्हा रस्त्यात एका स्त्री चा अपघात होतो ह्या घटनेमुळे अर्णब ची भेट रुखसना खातून( अनुष्का शर्मा) शी होते जी अतिशय गंभीर अवस्थेत असते आणि त्याच्याशी विक्षिप्त वागते. चित्रपटाच्या कहाणी ला वेगळे वळण तेव्हा मिळते जेव्हा हसीम अली (रजत कपूर)  हे पात्र पडदयावर येते नंतर हा चित्रपट असे वळण घेतो ज्याने प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकेल.

प्रोसित रॉय पहिल्यांदा चित्रपट दिग्दर्शन करत आहे त्या मानाने त्याने चांगले काम केले आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबर, सिनेमॅटोग्राफी निवडलेले लोकेशन सर्वच कमालीचे आहे. लोकेशन्स आणि कॅमेराचा उत्तम वापर आपल्याला आश्चर्यकित करून जाते, चित्रपटातील बॅकग्राऊंड साऊंड आणि व्हिएफक्स खूपच छान जमलं आहे. त्यात कलाकारांना केलेला मेकअप अतिशय उत्तम आहे, ह्या चित्रपटात असे काही दृष्य अशी आहेत जी अचानक घाबरवतात. या चित्रपटाच्या कथेत प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचा क्षमता आहे. प्रोसित रॉयने पूर्ण चित्रपट कमालीचा आखला आहे.

आता अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर अनुष्का शर्माचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे , तिचे फक्त  हावभावच आपल्याला घाबरवून सोडतात. हा चित्रपट अनुष्काच्या करिअरमधल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक ठरेल.अनुष्का बरोबरच रजत कपूर,परंब्रता चटर्जी ह्यांचा ही अभिनय चांगला आहे.

चित्रपटाचा दुसऱ्या भागापेक्षा पहिला भाग प्रेक्षकांना जास्त प्रभावित करणारा आहे. इंटरव्हलनंतर चित्रपट थोडा कमकुवत होतो. एवढे असूनही अनुष्काचा भयपट कमजोर हृदय असलेल्या लोकांसाठी नाही आहे. आपण असे म्हणू शकतो की हा भयपट ज्या विचाराने बनवला आहे त्यात तो एकदम खरा ठरतो. 

 

Web Title: Anushka Sharma is a scary 'fairy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.