Review: ईदचा आनंद द्विगुणित करणारा दुहेरी अॅक्शन धमाका! 'बडे मिया छोटे मिया' कसा आहे?

By संजय घावरे | Published: April 11, 2024 06:40 PM2024-04-11T18:40:03+5:302024-04-11T18:43:42+5:30

अक्षय कुमार - टायगर श्रॉफ यांचा ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला 'बडे मिया छोटे मिया' कसा आहे? वाचा Review

bade miyan chote miyan movie review starring akshay kumar tiger shroff | Review: ईदचा आनंद द्विगुणित करणारा दुहेरी अॅक्शन धमाका! 'बडे मिया छोटे मिया' कसा आहे?

Review: ईदचा आनंद द्विगुणित करणारा दुहेरी अॅक्शन धमाका! 'बडे मिया छोटे मिया' कसा आहे?

Release Date: April 11,2024Language: हिंदी
Cast: अक्षय कुमार, टायगर श्रॅाफ, मानुषी छिल्लर, आलया एफ, पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, रोनित रॅाय, मनीष चौधरी
Producer: जॅकी भगनानी, वासू भगनानी, दिपशीखा देशमुख, अली अब्बास जफर, हिमांशू मेहराDirector: अली अब्बास जफर
Duration: दोन तास ४४ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

एका काल्पनिक कथानकावर आधारलेला हा चित्रपट म्हणजे रमजान ईदला प्रदर्शित होणाऱ्या टिपिकल सलमान खान शैलीतील अॅक्शनपट आहे. लॅाजिकचा शोध न घेता पाहिल्यास पावणे तीन तास फुल टू मनोरंजन करणारा दिग्दर्शक अली अब्बास जफरचा हा चित्रपट नाट्यमय घडामोडींद्वारे अखेरपर्यंत खिळवून ठेवणारा आहे.

कथानक : भारतीय संरक्षण विभागाने सैन्य दलासोबत मिळून परदेशी आक्रमणे रोखण्यासाठी एक पॅकेज बनवलेले असते. भारतीय सैन्यावर हल्ला करून ते पॅकेज घेऊन कबीर फरार होतो. सैन्यातून कोर्ट मार्शल केलेले फिरोझ आणि राकेश यांच्याकडे ते पॅकेज परत आणण्याची जबाबदारी सोपवली जाते. कॅप्टन निशी दोघांचा शोध घेते आणि कर्नल आझाद यांचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवते. त्यानंतर दोघेही देश वाचवण्याच्या मोहिमेवर जातात, पण हे आव्हान वाटतं तितकं सापं मुळीच नसतं. कारण शत्रू खूप बलाढ्य आणि आपलाच असतो.


लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची कथा काल्पनिक असली तरी नाट्यमय वळणांची अचूक पेरणी केलेली आहे. काही संवाद अर्थपूर्ण, तर काही विनोदी आहेत. आधुनिक विज्ञान आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काय करता येऊ शकतं याची झलक या चित्रपटात आहे. मित्रच शत्रू बनणे, करण कवचची संकल्पना, क्लोन सैनिक, माईंड कंट्रोल, दोन शूरवीरांचा संघर्ष सारं काही अॅक्शनच्या आधारे दाखवलं गेलं आहे. वास्तवदर्शी अॅक्शन या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॅाईंट आहे. सुरुवातीच्या दृश्यापासून अखेरपर्यंत नावीन्यपूर्ण अॅक्शन शैली पाहायला मिळते. गाणी श्रवणीय आहेत. पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी, व्हिएफएक्स आदी गोष्टी चांगल्या आहेत.
 


अभिनय : अक्षय कुमार आणि टायगर श्रॅाफच्या जोडीने धमाल केली आहे. दोघेही अॅक्शन आणि डान्समध्ये तरबेज असले तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. अक्षयने आपल्याच शैलीत फिरोज साकारला असून, टायगरच्या वाटल्याला आलेले काही खुमासदार संवाद हास्य फुलवतात. पृथ्वीराज सुकुमारनने साकारलेला खलनायक थरकाप उडवणारा असून, लक्ष वेधणारा आहे. आलया एफने पुन्हा एकदा प्रभावित केलं आहे. मानुषी छिल्लरच्या अभिनयातील नव्या छटा दिसतात. सोनाक्षी सिन्हाचा रोल बऱ्यापैकी मोठा असूनही कॅमिओ का म्हटलं गेलं ते समजत नाही. रोनित रॅायसह इतर सहाय्यक भूमिकांमधील कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.


सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, अॅक्शन, गीत-संगीत, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू : काही लॅाजिकलेस दृश्ये, चित्रपटाची लांबी


थोडक्यात काय तर फुल टू मनोरंजन करणारा हा अॅक्शनचा दुहेरी धमाका पावलोपावली नाट्यमय घडामोडींद्वारे अखेरपर्यंत खिळवून ठेवत रमजान ईदचा आनंद द्विगुणित करणारा आहे.

Web Title: bade miyan chote miyan movie review starring akshay kumar tiger shroff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.