Ek Nirnay Swatacha Swatasathi Marathi Movie Review: वर्तमानाचा भूतकाळाशी नातं जोडण्याचा 'एक निर्णय'

By गीतांजली | Published: January 17, 2019 05:47 PM2019-01-17T17:47:33+5:302023-08-08T19:47:32+5:30

ही गोष्ट आहे डॉ. ईशान, (सुबोध भावे) डॉ. मुक्ता (मधुरा वेलणकर- साटम) आणि मानसी (कुंजिका काळविंट) यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची.

Ek Nirnay Swatacha Swatasathi Marathi Movie Review | Ek Nirnay Swatacha Swatasathi Marathi Movie Review: वर्तमानाचा भूतकाळाशी नातं जोडण्याचा 'एक निर्णय'

Ek Nirnay Swatacha Swatasathi Marathi Movie Review: वर्तमानाचा भूतकाळाशी नातं जोडण्याचा 'एक निर्णय'

Release Date: January 18,2019Language: मराठी
Cast: सुबोध भावे,मधुरा वेलणकर- साटम, कुंजिका काळविंट,विक्रम गोखले,सुहास जोशी, शरद पोंक्षे सीमा देशमुख आणि श्रीरंग देशमुख
Producer: श्रीरंग देशमुखDirector: श्रीरंग देशमुख
Duration: 2 तास 20 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

गीतांजली आंब्रे 

स्पर्म डोनेट विषय जेव्हा आपल्यासमोर येतो तेव्हा आपल्याला आठवतो तो आयुष्यमान खुराणा विकी डोनर सिनेमा.  विकी डोनरसारखा नाही मात्र स्पर्म डोनेट याच विषयावर 'एक निर्णय स्वत:चा स्वत:साठी' या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे. आपण आयुष्यात अनेकवेळा निर्णय घेतो मात्र कितीवेळा त्या निर्णयावर ठाम राहतो किंवा त्यातील किती निर्णय आपण स्वत:साठी घेतो ? हे या सिनेमातून आधोरेखित करण्यात आले आहे.


ही गोष्ट आहे डॉ. ईशान, (सुबोध भावे) डॉ. मुक्ता (मधुरा वेलणकर- साटम) आणि मानसी (कुंजिका काळविंट) यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची. डॉ. ईशान बाल रोगतज्ज्ञ असतो तर डॉ. मुक्ता ही पुण्यातील प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ज्ञ असते. डॉ. ईशान आणि मुक्ता यांचा घटस्फोट झालेला असतो. त्यानंतर डॉ. ईशान मानसीशी लग्न करतो. ईशान आणि मानसी यांचा सुखी संसार सुरु असतो, मानसीला आई होण्याची चाहुल लागते मात्र हा आनंद खूप काळ टिकत नाही. काही दिवसांतच मानसीचा गर्भपात होतो आणि ती कधीच आई होऊ शकणार नाही असे समजते. तर तिकडे मुक्ताच्या आई-वडिलांचा विमान अपघातात मृत्यू होतो. हा तिचासाठी खूप मोठा मानसिक धक्का बसतो. तिला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची गरज असते. तिला यासाठी तिचे बाळ हवं असते आणि हे बाळं तिला ईशानपासून हवं असते. ती ईशानाला यासाठी स्पर्म डोनेट करण्यास सांगते. स्पर्म डोनेटसाठी ईशान तयार होणार का?, मानसी यासाठी ईशाला परवानगी देणार का ?, यासगळ्याचा ईशान आणि मानसीच्या संसारावर काय परिणाम होणार? नेमका मुक्ता आणि ईशाना घटस्फोट कशामुळे होतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला जाऊन सिनेमा पाहावा लागेल.


वर उल्लेख केला असला तरी विकी डोनर आणि या सिनेमाची कथा सारखी नाही. श्रीरंग देशमुख यांनी लेखन, निर्मिती व दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबादारी संभाळली आहे. तसेच त्यांनी सिनेमात ईशानच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली आहे. विषय चांगला असूनही दिग्दर्शक तो रुपेरी पडद्यावर मांडताना कमी पडला आहे. आजच्या तरुण पिढीचा प्रतिनिधीत्व करणारा सिनेमा असला तरी त्यावर जुन्या बुरसट विचारांचा पगडा वाटतो तो असा याचे उदाहरण द्यायचे झाले तर मानसी आणि ईशान दरवेळीतून बाहेर पडताना सगळ्यांच्या पाय पडतात. पुण्यासारख्या शहरात असणारी मानसी नवऱ्याला आहो-जाहो करते ही गोष्ट खटकते. अभिनयाबाबत बोलायाचे झाले तर सुबोध भावेने आपली भूमिका चोख बजावली आहे तर मधुरा वेलणकर- साटम या सिनेमातून पाच वर्षांनी कमबॅक करत असल्याचे कुठेच जाणवत नाही. कुजिंका काळविंट या सिनेमातून पदार्पण करत असल्याचे सिनेमा पाहताना प्रकर्षाने जाणवते. विक्रम गोखले, मंगल केंकरे, सुहास जोशी, मुग्धा गोडबोले, शरद पोंक्षे, सीमा देशमुख यांनी आपल्या वाटेला आलेल्या व्यक्तिरेखा चांगल्या बजावल्या आहेत. मात्र तेवढी तगडी स्टारकास्ट असतानाही दिग्दर्शकाला त्याचा योग्य उपयोग करुन घेता आलेला नाही आहे हे सिनेमा पाहताना अनेकवेळा जाणवते. सिनेमाचे संगीत बेताचेच आहे. पूर्वाधापेक्षा मध्यांतरानंतर सिनेमा चांगली गती पकडतो. मात्र सिनेमाचा शेवट हा अर्धवट वाटतो. एकंदरीत सिनेमा पाहायचा की नाही हा निर्णय तुम्ही स्वत:चा स्वत:साठी घ्या.         


 

Web Title: Ek Nirnay Swatacha Swatasathi Marathi Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.