film review : ‘मशीन’ आणतो वैताग!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2017 09:09 AM2017-03-17T09:09:04+5:302023-08-08T19:28:38+5:30

खरे तर चित्रपटाचे ‘मशीन’ हे नाव अभिनेता मुस्तफा याने अगदी सार्थ ठरवले आहे. या चित्रपटाचा हिरो बघितल्यावरच दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी ‘मशीन’ हे आगळे-वेगळे नाव आपल्या सिनेमासाठी का निवडले असावे, हे कळून चुकते.

film review: 'machine' brings frustrated! | film review : ‘मशीन’ आणतो वैताग!

film review : ‘मशीन’ आणतो वैताग!

Release Date: March 17,2017Language: हिंदी
Cast: मुस्तफा , कियारा अडवाणी
Producer: प्रणय चौकशीDirector: अब्बास मस्तान
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>- जान्हवी सामंत

रोमँटिक अ‍ॅक्शनपट असलेला ‘मशीन’ हा चित्रपट आज रिलीज झाला.  दिग्दर्शक अब्बास-मस्तान खानदानाचा वारस अभिनेता मुस्तफा या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतो आहे. या चित्रपटात ‘एम एस धोनी’फेम कियारा अडवाणी फिमेल लीडमध्ये आहे.  ‘तू चीज बडी है मस्त’ आणि ‘एक चतुर नार’ या जुन्या गाण्यांच्या तडक्यासह साकारलेला हा चित्रपट कसा आहे, हे तुम्ही वाचायलाच हवे... 
 
खरे तर चित्रपटाचे ‘मशीन’ हे नाव अभिनेता मुस्तफा याने अगदी सार्थ ठरवले आहे. या चित्रपटाचा हिरो बघितल्यावरच दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी ‘मशीन’ हे आगळे-वेगळे नाव आपल्या सिनेमासाठी का निवडले असावे, हे कळून चुकते. ‘मशीन’चा हिरो अगदी ‘मशीन’सारखा पडद्यावर वावरतो आणि सगळ्याच मेंदूचा भुगा करून टाकतो. मुस्तफा चालता-फिरता स्मार्ट दिसतो. पण कुठल्याच संवादाला त्याच्या चेहºयावरची रेषा जराही हलत नाही. त्यामुळे अख्ख्या चित्रपटात तो मख्य चेहºयाने वापरतो.
‘मशीन’ म्हणजे विचित्र चित्रपट, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. सारा थापर(कियारा अडवाणी) ही वूडस्टॉक कॉलेजची अतिशय हुशार विद्यार्थीनी असते. केवळ हुशारच नाही तर हिंदी चित्रपटातील हिरोईनमध्ये असलेले सगळे गुण तिच्यात असतात. म्हणजे, ती दयाळू असते, तिला नाचता येतं. तिचा गाता येतं. तिला कार रेसिंगही आवडतं. आदित्य(इशान शंकर) नावाचा तिचा एक बेस्ट फ्रेन्ड असतो. एकदा कार रेसिंगदरम्यान तिची अन् रंश(मुस्तफा)ची नजरानजर होते. रंशने नुकताच कॉलेजात प्रवेश घेतलेला असतो. निश्चिपणे सारा सुंदर असते आणि त्यामुळे तिच्यावर भाळणारेही खूप असतात. पण अचानक साराला निनावी पत्र आणि भेटवस्तू यायला लागतात. तोपर्यंत सारा रंशच्या प्रेमात पडली असते. रंश हाच आपल्याला ही पत्र व भेटवस्तू पाठवत असल्याचे तिला वाटते. पण हे सगळं करणारा वेगळाच कुणी असतो. याचदरम्यान साराचा जीवलग मित्र आदित्यची हत्या होते. ही हत्या साराचा एक आशिक विकी याने केल्याचे उघड होते. 

एकीकडे ही मर्डर मिस्ट्री आणि दुसरीकडे सारा व रंश यांचे प्रेम. प्रेमाची गाडी इतकी फास्ट धावते की,  वूडस्टॉक कॉलेजच्या वार्षिक महोत्सवात दोघेही एकमेकांवरील प्रेमाची कबुली देतात आणि यानंतर साराचे वडिल दोघांचे लग्नही लावून देतात. यानंतर चित्रपटात एक मोठा टिष्ट्वस्ट येतो. मग सुरु होतो सस्पेन्स. पण तोपर्यंत चित्रपटात काय होतयं? कशासाठी होतयं? कथा पुढे का सरकत नाहीय? असे अनेक प्रश्न पडायला लागतात आणि या प्रश्नांची उत्तरं शोधता-शोधता पहिला हाफ संपतो.

चित्रपट बनवताना कुठलेही लॉजिक वापरलेले नाही, खरे तर हे दोन सीन्सनंतरच कळून चुकते. अतिशय बालिश अशी कथा आणि तितकेच पोरकट संवाद यामुळे चित्रपटाचा दर्जा आणखीच खाली घसरतो. त्यातच काही कलाकार ओव्हर अ‍ॅक्टिंग करतात तर काहींच्या चेहºयावरची माशीही हलत नाही.
कियाराने आपले काम नेटाने केलेय. पण मुस्तफा आणि इशान शंकर या दोघांना धड संवादही बोलता येत नाही.  दोन जुनी गाणी सोडली तर सगळीच गाणी कंटाळा आणतात. कर्कश पार्श्वसंगीत चित्रपटातील उरला सुरला इंटरेस्टही संपवून टाकते. आपल्या मुलाच्या ग्रँड डेब्यूसाठी अब्बास-मस्तानसारख्या मुरलेल्या दिग्दर्शकांनी इतका सुमार चित्रपट निवडावा, याचेच चित्रपटाअंती आश्चर्य वाटते.

Web Title: film review: 'machine' brings frustrated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.