काय सांगता? Game of Thrones माहीत नाही? चिंता सोडा आम्ही सांगतो!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 02:58 PM2018-11-09T14:58:54+5:302023-08-08T20:35:32+5:30
गेम ऑफ थ्रोन्सचे आतापर्यंत सात सीझन आले आहेत. जगभरातील प्रेक्षकांना या सीरिजने अक्षरश: वेड लावलं आहे.
Winter is Coming? Alannister always pays his debts? Mother Of Dragon? Iron Throne? काही लाईट पेटली का? नाही ना? मग तुम्हाला जॉन स्नो सारखं यू नो नथिंग म्हणाव लागेल. अजूनही तुम्ही विषय काय आहे यावर अडलेले असाल तर आम्ही बोलतोय ते 'गेम ऑफ थ्रोन्स' या टीव्ही सीरिजबाबत.
गेम ऑफ थ्रोन्सचे आतापर्यंत सात सीझन आले आहेत. जगभरातील प्रेक्षकांना या सीरिजने अक्षरश: वेड लावलं आहे. इतकं की, पुढचा सीझन कधी येईल, याची सतत चर्चा आणि त्याची आतुरता ही सीरिज बघणाऱ्यांना लागलेली असते. कोट्यवधी लोक ही सीरिज न कंटाळा करता बघतात. आणि जे बघत नाही किंवा ज्यांना याबाबत माहीत नाही त्यांना तर थेट ही सीरिज बघणारे परग्रहावरील ठरवून मोकळे होतात.
पण हे खरंय की, अजूनही ही सीरिज अनेकांनी पाहिली नाहीये. काहींना याचं नाव सुद्धा माहीत नाही. त्यामुळे त्यांना मित्रांकडून सतत टोमणे ऐकावे लागतात आणि अपमानित व्हावं लागतं. तर याच लोकांच्या जखमेवर आम्ही थोडी मलमपट्टी करण्याचा विचार केला. आता या सीरिजचा आठवा सीझन येणार आहे. पण त्याआधी यात काय काय झालं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. म्हणजे तुम्ही बघाल तेव्हा तुमची लिंक लागेल.
काय आहे गेम ऑफ थ्रोन्स
गेम ऑफ थ्रोन्सही एचबीओवर चालणारी टीव्ही सीरिज आहे. याची कथा जॉर्ज आर आर मार्टिन यांच्या 'ए सॉंग ऑफ फायर अॅन्ड आइस' या पुस्तकांच्या सीरिजवर आधारित आहे. आतापर्यंत याचे ७० एपिसोड (७ सीझन) आले आहेत.
गेम ऑफ थ्रोन्सची कथा ही काल्पनिक वेस्टरोज साम्राज्याची आहे. या साम्राज्याची गादी म्हणजेच आयर्न थ्रोनवर कब्जा मिळवण्याच्या संघर्षाची कथा आहे. त्यामुळे या कथेत अनेक भूमिका, अनेक राज्ये आणि अनेक ट्विस्ट आहेत.
वेस्टरोज साम्राज्य
वेस्टरोज एक विशाल साम्राज्य आहे ज्यात ७ वेगवेगळी आणि मोठी राजघराणी आहेत त्यात टारगॅरियन (Targaryen), बॅरथियोन (Baratheon), स्टार्क (Stark), लॅनिस्टर (Lannister), ग्रेजॉय (Greyjoy), मार्टेल (Martell) आणि टायरेल (Tyrell) यांचा समावेश आहे. त्यासोबतच एरिन (Arryn) आणि टली (Tully) हेही घराणे आहेत.
टारगॅरियन राजांनी इतर ५ राज्यांना हरवून आणि डॉर्न राज्यासोबत लग्नाचं नातं जोडून पूर्ण वेस्टरोजवर शासन केलं. नंतर रॉबर्ट बॅरनथिओनने नेड स्टार्कच्या मदतीने आयर्न थ्रोन्सवर कब्जा मिळवला. शेवटचा टारगॅरियन राजा हा त्याच्या सुरक्षा रक्षकाच्या हातून मारला गेला. राजाचे दोन मुलं सोडून सर्व टारगॅरियन कुटूंब मारलं जातं.
गेम ऑफ थ्रोनची कथा तेथून सुरु तेव्हा रॉबर्ट हा शाही गादीवर आहे. जेमी लॅनिस्टर त्याच्या सुरक्षा रक्षकांपैकी एक आहे. जेमीची बहीण सेरसई महाराणी आहे. जेमी आणि सेरसईचे वडील टायविन लॅनिस्टर राजाच्या जवळच्या सल्लागारांमध्ये आहे. राजाचा मुख्य सल्लागार जोन एरिन आहे, ज्याचा अचानक मृत्यू होतो.
द वॉल काय आहे?
वेस्टरोजच्या उत्तरेकडील सीमेपलिकडे जंगल आहे. या जंगलात आदिवासी लोक राहतात. त्यामुळे सुरक्षेसाठी उत्तरेकडील सीमेवर एक भव्य भींत बांधण्यात आली आहे. या भींतीच्या सुरक्षेसाठीही काही लोक असतात. यासाठी असे योद्धे निवडले जातात, ज्यांचं लग्न झालेलं नाहीये. त्यांना ब्लॅक बॅदर्स किंवा क्रोजही म्हटलं जातं. जॉन स्नो यांपैकी एक आहे.
वॉलच्या पलिकडे काय आहे?
वॉलच्या पलिकडे घनदाट जंगल असून त्यात काही आदिवासी जमातीचे लोक राहतात. गेम ऑफ थ्रोनच्या सुरुवातीलाच याच जंगलात द अदर्स किंवा वाइट वॉकर्स येतात. हे अद्भूत जीन असून त्यांच्याकडे अद्भूत शक्ती आहे आणि ते सहजपणे मारले जाऊ शकत नाहीत. त्यांना केवळ एका खासप्रकारच्या तलवारीने मारले जाऊ शकते. हे जीन ज्यांना मारतात ते लोक त्यांच्याप्रमाणे वाइट वॉकर्स होतात. याच जंगलांमध्ये चिल्ड्रन ऑफ द फॉरेस्ट सुद्धा राहतात. जे वेस्टरोजमधील फार जुने लोक आहेत. त्यांच्याकडेही अद्बूत शक्ती आहेत.
वेस्टरोज व्यतिरिक्त या जगात काय आहे?
वेस्टरोज व्यतिरिक्त गेम ऑफ थ्रोनच्या दुनियेत एसोस आणि सोथोरियोस महाव्दीप आहेत. वेस्टरोजच्या पूर्वेत एसोसमध्ये अनेक स्वतंत्र शहरे आहेत. यातील अनेकमध्ये दासप्रथा चालते. शेवटच्या टारगॅरियन राजाच्या मृत्यूनंतर त्याची वाचलेली मुलं विसरिज आणि डेनेरिस इथेच पळून आले होते. या दोन शहारांना जिंकल्यानंतरच डेनेरिसने विशाल सेना उभारली. या सेनेला घेऊनच ते वेस्टरोजवर चालून जाणार आहे.
ही सीरिज एक कम्प्लिट एंटरटेनमेंट पॅकेज आहे. राजेशाही, लढाया, किल्ले, रोमान्स, कॉमेडी आणि भरपूर बोल्ड सीन्स ही या सीरिजची खासियत आहे. त्यामुळे तुम्ही जर ही सीरिज अजून पाहिले नसेल तर बघायला सुरुवात करा आणि आपल्या मित्रांकडून होणारा अपमानही थांबवू शकता.