kaagar Marathi Movie Review : 'सैराट'नंतर रिंकू राजगुरूचा 'कागर'मध्येही दमदार अभिनय

By अजय परचुरे | Published: April 25, 2019 05:48 PM2019-04-25T17:48:03+5:302023-08-08T19:47:32+5:30

कागर या सिनेमाची घोषणा झाल्यावरच या नावावरून आणि सैराट फेम रिंकू राजगुरूच्या दुसºया मराठी सिनेमामुळे एक प्रकारची उत्सुकता निर्माण झाली होती.

kaagar Marathi Movie Review | kaagar Marathi Movie Review : 'सैराट'नंतर रिंकू राजगुरूचा 'कागर'मध्येही दमदार अभिनय

kaagar Marathi Movie Review : 'सैराट'नंतर रिंकू राजगुरूचा 'कागर'मध्येही दमदार अभिनय

Release Date: April 26,2019Language: मराठी
Cast: रिंकू राजगुरू ,शुभंकर तावडे,शशांक शेंडे
Producer: सुधीर कोलते आणि विकास हांडे Director: मकरंद माने
Duration: २ तास ११ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

कागर या सिनेमाची घोषणा झाल्यावरच या नावावरून आणि सैराट फेम रिंकू राजगुरूच्या दुसºया मराठी सिनेमामुळे एक प्रकारची उत्सुकता निर्माण झाली होती. नवीन कोवळी फुटलेली पालवी म्हणजे कागर . अनेक वर्षांपूर्वी हा शब्द खेडेगावात वापरला जायचा. याच शब्दाचा वापर करून खेडेगावातील राजकारणातून राज्याच्या राजकारणात प्रवास करणाऱ्या म्हणजेच नवीन कोवळी फुटलेल्या राणीचा उदय म्हणजे कागरचा प्रवास .हा प्रवास साधासुधा नसून प्रेम,खून,हिंसा,गटातटाचं राजकारण यांच्यात गुरफटलेल्या ग्रामीण राजकारणाचा पुरता बुरखा मांडण्याचा प्रयत्न म्हणजे कागर ...मात्र हा प्रयत्न कथा, कलाकार, चित्रिकरण यांच्यामध्ये उत्तम झाला असला तरी मांडणीमध्ये थोडासा कमी पडला आहे. मात्र फुटलेली ही नवीन पालवी नक्कीच पाहण्यासारखी आहे. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद मानेची ही ग्रामीण भागातील अत्यंत साधी आणि सरळ कथा.. बुध्दिबळाच्या पटात राजाला सर्वोच्च स्थान असलं तरी पटातील वजीर हे अत्यंत हुशार आणि महत्वाचं प्यादं असतं. अश्याच ग्रामीण भागातील एका गावातील आमदाराला शह देण्यासाठी गावातील गुरूजी (शशांक शेंडे) या नावाने चाणक्यनिती खेळणारे गावातील राजकारणात एक नवा पाट मांडतात. गावातील भैय्यासाहेब या तरूण नेतृत्वाला मदतीची रसद पुरवून आमदारासमोर ते एकप्रकारे आवाहन उभं करतात. या सगळÞ्यात गुरूजींची लेक राणी (रिंकू राजगुरू) आणि गुरूजींचा उजवा हात आणि इंजिनियरींगचे शिक्षण घेऊनही शेतकºयांच्या न्यायहक्कासाठी लढणाºया युवराज (शुभंकर तावडे) यांच्यामध्ये प्रेमाचा अंकुर फुलत असतो. गुरूजींच्या या चालीमुळे आमदारही चवताळतो आणि आपली कूटनिती सुरू करतो. या सगळ््या नात्यात एक दिवस गुरूजींच्या सांगण्यावरून युवराज असं काही करून जातो की पुढे गावातील राजकारणाला एक यु टर्न मिळतो आणि राणी ग्रामीण राजकारणातील एक नवं नेतृत्व म्हणून लोकांसमोर येते. या नाट्यात पुढे युवराजचं काय होतं? राणीला राजकारणाचा हा 'कागर' मानवतो का ? हे पाहण्यासाठी सिनेमा पाहणं जास्त औत्सुक्याचं आहे. 

 

सिनेमा पूर्णपणे अकलूज आणि आसपासच्या परिसरात चित्रित झाला आहे. सैराटची जादू अजूनही महाराष्ट्रभर पसरलेली असल्याने आणि मुळात रिंकू या सिनेमात प्रमुख भूमिकेत असल्याने सैराट आणि कागरची तुलना ह्या सिनेमाचा ट्रेलर आल्यापासूनच सुरू झाली आहे. मात्र हे आधीच स्पष्ट करायला हवं की नागराजचा सैराट आणि मकरंदचा कागर अतिशय भिन्न आहे. सैराटचा प्रभाव काहीअंशी जाणवत असला तरी मकरंदचं व्हिजन वेगळं आहे. सिनेमा मध्यतरांपर्यंत अतिशय जलदगतीने आणि नाट्यपूर्ण घडामोडी घडत पुढे जातो. मध्यतरांनंतर सिनेमा थोडासा कथेच्या मांडणीत फसल्यासारखा झालाय. कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीचं अतिशय जलदगतीने राजकारणात पुढे येण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. उत्तम पध्दतीने कथा पुढे सरकत असताना अनावश्यक ठिकाणी मध्यंतरानंतर आलेली कव्वाली सिनेमात खटकते. या कव्वालीने सिनेमाचा पोत बिघडतो. गुरूजींची कपटनिती प्रस्थापित आमदार इतक्या सहजगतीने कसं काय मान्य करतो ?असे अनेक प्रश्न मध्यंतरानंतर आपल्या मनात येऊन जातात. त्यामुळे मकरंदला अपेक्षित असलेला कागर मध्यतरानंतर काहीसा भरकटल्यासारखा झाला आहे. कथेवरची उत्तम पकड नंतर ढीली होत गेल्याने कागर अपेक्षित असा शेवट साध्य करू शकला नाहीये. 

रिंकू राजगुरूने राणीच्या भूमिकेत कमाल केली आहे. सैराटमध्ये हीच रिंकू होती का असा प्रश्न आपल्याला कागर बघताना जाणवतो. प्रेम,राजकारण,संघर्ष या सगळ््या टप्प्यांवरील तिचा बदलत जाणारा अभिनय लाजवाब आहे. शुभंकर तावडेने आपल्या पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली आहे. कार्यकर्त्याची व्यथा, संघर्ष त्याने अत्यंत उत्तमरित्या रंगवला आहे. या सिनेमाचा कणा आहे गुरूजीच्या भूमिकेतील शशांक शेंडेंचा  गुरूजीच्या कपटनीती,चाली शशांक शेंडेंनी आपल्या अभिनयाने इतक्या उंचीवर नेऊन ठेवल्या आहेत त्याला तोड नाही. बाकी आमदाराच्या भूमिकेतील सुहास पळशीकर ,इन्सपेक्चरच्या भूमिकेतील उमेश जगताप यांनी आपल्या वाट्याला आलेली भूमिका उत्तम वठवली आहे. ग्रामीण राजकारणाचा बुरखा फाडणारा हा कागर एकदा पाहण्यासारखा आहे.                 

Web Title: kaagar Marathi Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.