Kaalakaandi Movie Review: ​एक मनोरंजक कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 08:48 AM2018-01-12T08:48:59+5:302023-08-08T19:16:16+5:30

‘शेफ’ या चित्रपटानंतर सैफ अली खान ‘कालाकांडी’ या ब्लॅक कॉमेडी चित्रपटासह परतला आहे. आज हा चित्रपट रिलीज झाला. अ

Kaalakaandi Movie Review: An entertaining story | Kaalakaandi Movie Review: ​एक मनोरंजक कथा

Kaalakaandi Movie Review: ​एक मनोरंजक कथा

Release Date: January 12,2018Language:
Cast: सैफ अली खान, दीपक डोबरियाल, विजय राज, कुणाल राय कपूर, इशा तलवार, अक्षय ओबेरॉय
Producer: रोहित खट्टर ,अशी दुआ साराDirector: अक्षत वर्मा
Duration: हिंदीGenre:
लोकमत रेटिंग्स
-ज
ान्हवी सामंत

‘शेफ’ या चित्रपटानंतर सैफ अली खान ‘कालाकांडी’ या ब्लॅक कॉमेडी चित्रपटासह परतला आहे. आज हा चित्रपट रिलीज झाला. अक्षत वर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे आणि या नात्याने या चित्रपटाचा ‘देल्ही बेली’ या चित्रपटासोबत संबंध आहे. ‘देल्ही बेली’ रिलीज झाला होता तेव्हा त्यातील ‘भाग भाग डिके बोस’ या गाण्यावरून वादंग माजला होते. हे गाणे भारतीय संस्कृतीवरचा कलंक आहे, असा आरोप देशातील काही संस्कृती रक्षकांनी केला होता. तरीही   तस्करीच्या हिऱ्यांभोवती फिरणारा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. अक्षत वर्मा या  चित्रपटाचे लेखक होते. याच अक्षत शर्मांनी ‘कालाकांडी’द्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्यामुळे ‘कालाकांडी’ पाहतांना ‘डेल्ही बेली’ हटकून आठवतो. त्याचवेळी हा चित्रपट दिग्दर्शकाचा एक अधिकृत परिपक्व प्रयत्न असल्याचेही जाणवते.

‘कालाकांडी’ या चित्रपटात तीन कथा समांतर चालतात. चित्रपट सुरु होतो तो रिहीन (सैफ अली खान) या चाळीशीच्या मध्यवर्ती पात्राच्या कथेने. भाऊ अंगद (अक्षय ओबेरॉय) याच्या लग्नाच्या धामधूमीत रिहीनला एक धक्कादायक गोष्ट कळते. ती म्हणजे, त्याला टर्मिनल कॅन्सर असण्याची. आपल्याकडे अतिशय कमी वेळ शिल्लक असल्याचेही त्याला कळते. खरे तर रिहीनने आपल्या आयुष्यात आत्तापर्यंत कुठलीही चुकीची गोष्ट केलेली नसते. त्याला कुठलेही व्यसन नसते. पण फार कमी वेळ शिल्लक आहे, हे कळल्यावर आत्तापर्यंत जे काही केले नाही त्या सगळ्या गोष्टी करण्याचे तो ठरवतो आणि हे करताना तो ड्रग्जही जवळ करतो. ड्रग्जच्या नशेत असतानाच  भावाची त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डला भेट घालून घेण्याच्या प्रयत्नात असताना रिहीन पोलिसांच्या कचाट्यात सापडतो. रिहीनच्या यात कथेसोबत चित्रपटात एक कपल तारा आणि झुबिन (शोभिता धुलिपला आणि कुणाल राय कपूर) यांची कथा दाखवली जाते. तारा प्रेमात कन्फ्युज्ड असते आणि यातच बॉयफ्रेन्डच्या इच्छेविरोधात पीएचडी करण्यासाठी अमेरिकेत जाण्याचा निर्णय ती घेते. अमेरिकेत जाण्यापूर्वी तारा अन्य एक कपल शेहनाज आणि आॅमलेट (शेहनाज ट्रेजरीवाला आणि नील भूपलाम) यांना एका डिस्कोमध्ये भेटायला जाते. ताराला फ्लाईट पकडायची असते पण याचदरम्यान त्या डिस्कोवर पोलिसांची धाड पडते आणि आपली फ्लाईट तर मिस होणार नाही ना या विचाराने तारा पॅनिक होते. यानंतर या चित्रपटात तिसरा ट्रॅक दिसतो. तो म्हणजे दोन अंडरवर्ल्ड डॉन रेहमत आणि वारिस (विजय राज व दीपक डोबरियाल) यांचा. हे दोघेही त्यांचा दादा रेजा भाईसाठी खंडणी वसूलीचे काम करत असतात. पुढे या सगळ्या समांतर कथा एकाच मार्गावर येतात. सगळे एकमेकांच्या आयुष्यात एन्ट्री घेतात आणि फसतात. यांच्या आयुष्यात पुढे काय काय होते, हे पाहण्यासाठी निश्चितपणे तुम्हाला चित्रपटगृहात जावून चित्रपट पाहावा लागेल.

एकंदरीत सांगायचे तर या तिन्ही कथांची सरमिसळ पडद्यावर पाहणे मनोरंजक आहे. याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे,  तुलनेने कमी अवधी आणि या अवधीत अख्खा चित्रपट दाखवण्यासाठी तीन वेगवेगळ्या लहान कथांचा करण्यात आलेला परिणामकारक वापर. चित्रपटाचा विषय गंभीर असूनही ‘कालाकांडी’ जड होत नाही. विशेष म्हणजे, प्रत्येक पात्र त्याच्या वाट्याला आलेल्या वेळात प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. अर्थात क्लायमॅक्समध्ये  चित्रपटाची लय कुठेतरी बिघडते. अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर दिग्दर्शकाने प्रत्येक पात्राकडून सर्वोत्तम काम काढून घेतले आहे. पण सरतेशेवटी सैफ हाच या चित्रपटाचा आत्मा आहे. त्याचा दमदार अभिनय चित्रपटाला अधिक विश्वासार्ह आणि मनोरंजक बनवतो. सैफशिवाय विजय राज आणि दीपक डोबरियाल ही गँगस्टर रूपातील जोडी पाहणेही तितकेच मनोरंजक ठरते. याआधी डझनावर चित्रपटात अशाच गँगस्टर रूपात दिसूनही या चित्रपटात ही जोडी ताजी व मजेशीर वाटते. याऊपरही काही लोकांना हा चित्रपट आणि त्यातले विनोद त्रासदायक वाटू शकताता. कुटुंबासोबत चित्रपटाचा आनंद घेणाºयांनाही हा चित्रपट ( ए सर्टिफिकेट मिळालेल्या या चित्रपटात अनेक आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला गेला आहे.) खटकू शकतो. त्यामुळे अशा लोकांसाठी हा चित्रपट नाहीच, हे आधीच सांगायला हवे. पण ‘गो गोवा गॉन’ आणि ‘डेल्ही बेली’ सारखे चित्रपट तुम्हाला आवडले असतील तर हा चित्रपट तुम्ही चुकवता कामा नये, इतके मात्र नक्की.

Web Title: Kaalakaandi Movie Review: An entertaining story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.