Kedarnath Movie Review : हृदयस्पर्शी प्रेमकथा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 02:07 PM2018-12-07T14:07:00+5:302023-08-08T19:28:38+5:30

थोडक्यात सांगायचे तर ‘केदारनाथ’ हा चित्रपट आॅल टाईम ब्लॉकबस्टर ‘टायटॅनिक’चा हिंदी रिमेक आहे. जहाज बुडण्याऐवजी महापूर इतका बदल सोडला तर ‘टायटॅनिक’ व ‘केदारनाथ’ बरेच साधर्म्य आहे.

Kedarnath Movie Review : | Kedarnath Movie Review : हृदयस्पर्शी प्रेमकथा!!

Kedarnath Movie Review : हृदयस्पर्शी प्रेमकथा!!

Release Date: December 07,2018Language: हिंदी
Cast: सुशांत सिंग राजपूत,सारा अली खान, पूजा गौर, नितीश भारद्वाज
Producer: अभिषेक कपूर,रोनी स्क्रूवाला Director: अभिषेक कपूर
Duration: २ तास २५ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

-जान्हवी सामंत


सैफ अली खान व अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खान हिचा पहिला-वहिला ‘केदारनाथ’ हा चित्रपट आज शुक्रवारी चित्रपटगृहांत झळकला आहे. साराचा पहिला चित्रपट असल्याने सगळ्यांनाच या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. तेव्हा जाणून घेऊ यात, कसा आहे हा चित्रपट...

थोडक्यात सांगायचे तर ‘केदारनाथ’ हा चित्रपट आॅल टाईम ब्लॉकबस्टर ‘टायटॅनिक’चा हिंदी रिमेक आहे. जहाज बुडण्याऐवजी महापूर इतका बदल सोडला तर ‘टायटॅनिक’ व ‘केदारनाथ’ बरेच साधर्म्य आहे. गरीब मदतीला धावून येणारा गोड हिरो, सुंदर देखणी श्रीमंत हिरोईन, तिचा तापट गर्विष्ट मंगेतर आणि एक खूप मोठा माणुसकीचे दर्शन घडवणारा जीव-घेणा थरार असे सगळे काही या चित्रपटात आहे.  ट्रेलरमध्ये थोडा ‘रडका’ वाटलेला ‘केदारनाथ’ एका चांगला मनोरंजक चित्रपट ठरतो, याचे मुख्य कारण म्हणजे  मन्सूर (सुशांत सिंग राजपूत) व मुक्कू (सारा अली खान) या दोघांची गोड, निरागस जोडी. मन्सूर हा मुस्लिम तरूण उपजिविकेसाठी केदारनाथमध्ये पिठ्ठचेू (पर्यटकांना पाठीवर वाहून नेणारा) काम करत असतो. तर काहीशी हट्टी, बंडखोर मुक्कू आपल्या वडिलांचे दुकान आणि त्यांचे काम सांभाळत असते. तिचे वडिल (नितीश भारद्वाज) केदारनाथमध्ये आपले दुकान सांभाळून पुजाºयाचे काम करत असतात. आईवडिलांनी मनाविरूद्ध एका स्वजातीच्या मुलाशी लग्न ठरवल्यामुळे  मुक्कूच्या मनात कुटुंबाबद्दल प्रचंड राग असतो. तिचा हा राग बंडखोरीत बदलतो. याचदरम्यान क्रिकेटच्या कारणाने मन्सूरसोबत तिची ओळख होते आणि दोघांचीही मैत्री बहरते.  एका हिंदू मुलीसोबतचे आपले नाते फार पुढे जाणार नाही, हे मन्सूरला कळून चुकते. पण तोपर्यंत मुक्कू व मन्सूर एकमेकांत आकंठ बुडतात. दोघांच्याही नात्याला कुटुंबाकडून विरोध होतोच, पण या प्रेम प्रकरणामुळे गावातील जातीय तेढही वाढते. हा विरोध टोकाला पोहोचतो आणि केदारनाथमध्ये महाप्रलय येतो. या प्रलयात मुक्कू व मन्सूरचे प्रेम कसे तग धरते, कुठल्या मुक्कामाला पोहोचते, हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटचं बघावा लागेल.
२०१३ मध्ये केदारनाथमध्ये आलेल्या विनाशकारी महाप्रलयात ४३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागते. ७0 हजार लोक बेपत्ता झालेत. या महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवरउभा केलेला ‘केदारनाथ’ एक संवेदनशील चित्रपट आहे. ग्लोबल वॉर्मिंग, वाढत्या प्रदूषणाचे धोके, हिंदू-मुस्लिम समाजाचे एक नाजूक नाते, या नात्याचा राजकीय प्रभाव आणि या सगळयात एक नि:स्वार्थ प्रेमकथा हे सगळे धागे दिग्दर्शक अभिषेक कपूरने अतिशय बेमालूमपणे एकमेकांत गुंफले आहेत. चित्रपटाची सिनेमेटोग्राफीही तितकीच हृयस्पर्शी आहे. याला जोडीस जोड म्हणजे सुशांत व साराचा अभिनयही अफलातून आहे. मानवी स्वभाव आणि निसर्ग या दोन्ही शक्तीचा स्वार्थ, परमार्थ व क्रोध याचे अनेक पैलू चित्रपट उलगडून दाखवतो आणि म्हणूनच मनाला भावतो.
 
 

Web Title: Kedarnath Movie Review :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.