Ludo Movie Review: चार कथांना सहज बांधून ठेवणारा 'लूडो'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 05:12 PM2020-11-14T17:12:03+5:302023-08-08T19:47:32+5:30

अभिषेक बच्चन, आदित्य रॉय कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांचा लूडो चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जाणून घ्या सिनेमाबद्दल

Ludo Movie Review: A Ludo that easily binds four stories | Ludo Movie Review: चार कथांना सहज बांधून ठेवणारा 'लूडो'

Ludo Movie Review: चार कथांना सहज बांधून ठेवणारा 'लूडो'

Release Date: November 12,2020Language: हिंदी
Cast: अभिषेक बच्चन, आदित्य रॉय कपूर, राजकुमार राव, रोहित सराफ, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, पर्ल मैनी, इनायत वर्मा आणि पंकज त्रिपाठी
Producer: अनुराग बसू, भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, क्रिष्णन कुमार Director: अनुराग बसू
Duration: २ तास ३० मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

लेखक-दिग्दर्शक अनुराग बसूचा लूडो चित्रपट सुंदर कोलाज आहे. ज्यात प्रेम, दांंपत्य, सेक्स, हत्या, छळ, खोटे बोलणे आणि फसवणूकची काळे जग आहे. लूडो चित्रपटाची सुरूवात कुख्यात गुंड सत्तू भाई (पंकज त्रिपाठी)द्वारे बिल्डर भिंडरच्या मर्डरने सुरूवात होते.चित्रपटात चार वेगवेगळ्या कथा एकाच वळणावर येऊन पोहचतात. 


भिंडरच्या हत्येच्या ठिकाणी एक तरूण सत्तू भाईच्या हाती लागतो. तर सत्तू भाईचा एक मित्र आपल्या सुंदर पत्नीला सोडून परस्त्री सोबत रात्र व्यतित करण्यासाठी जातो. एक महत्त्वकांक्षी मुलीची श्रीमंत घरात लग्न होत असते आणि अचानक एक्स बॉयफ्रेंडसोबत तिचा बनलेला सेक्स व्हिडीओ पॉर्नसाइटवर अपलोड होऊन व्हायरल होतो. बॉयफ्रेंडची इच्छा असते की मुलीने पोलिसात तक्रार दाखल करावी आणि लपून छपून व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा व्हावी. एक अपराधी सहा वर्षांची शिक्षा भोगून परततो तेव्हा त्याच्याच पत्नीने त्याच्याच बेस्ट फ्रेंडसोबत लग्न केलेले असते. एक लहान मुलगी आपल्या आई वडिलांनी वेळ न दिल्यामुळे नाराज होऊन स्वतःचे अपरहरण करण्याचे नाटक रचते. हे सर्व पात्र आणि त्यांच्या जीवनातील घटना एकमेकांच्या मार्गांनी जात शेवटी एकाच वळणावर येऊन पोहचतात आणि पुन्हा त्यांचे जीवन नव्याने वेगवेगळे मार्गावर सुरू होतात.


लुडो मनोरंजक आणि वेगळा सिनेमा आहे. अनुराग बसूने याची कथा लिहिली आहे आणि रुपेरी पडद्यावर चित्रपट रेखाटण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचे पहायला मिळते. नात्यातील सुखदुःखाच्या धाग्यांनी या कथांना बांधून ठेवण्यात अनुराग बसू यशस्वी ठरला आहे. विशेष करून राजकुमार राव-फातिमा सना शेख आणि आदित्य रॉय कपूर-सान्या मल्होत्राची कथा कधी हो कधी नाही या अंदाजात मनोरंजन करते. या चारही कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.


अभिनेता पंकज त्रिपाठी नेहमीप्रमाणे या चित्रपटातही भाव खावून गेला आहे. या सर्व कलाकारांनामध्ये अभिषेक बच्चनच्या कथेला फारसा दम नाही. मात्र त्याने देखील आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप सोडण्यात यशस्वी झाला आहे. इतर कलाकारांनीदेखील चांगला अभिनय केला आहे.


दिग्दर्शक अनुराग बसूने नवीन अंदाजात चित्रपट सादर करण्यात यशस्वी ठरला आहे. स्वतः अनुराग बसू देखील पडद्यावर पहायला मिळतो. हा चित्रपट लहान मुलांचा खेळ लुडोवर आधारीत असला तरी हा चित्रपट लहान मुलांसाठी नाही. अपराधावर आधारीत कथा असतानाही अनुरागने विनोदी टच दिला आहे. त्यामुळे कथा हलकीफुलकी झाली आहे आणि तुम्ही सहज त्याच्यामध्ये गुंतून जाता. चित्रपटातील गाणी, संगीत कथेला साजेसे आहे. हा चित्रपट ज्यांना डार्क कॉमेडी पहायला आवडतो त्या प्रेक्षकांना नक्कीच भावेल.

Web Title: Ludo Movie Review: A Ludo that easily binds four stories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.