The Matrix Resurrections movie Review : दमदार 'मॅट्रिक्स रेसरेक्शन्स'- नाताळची भेट
By संदीप आडनाईक | Published: December 25, 2021 10:46 AM2021-12-25T10:46:47+5:302023-08-08T20:09:54+5:30
The Matrix Resurrections Movie Review : दिग्दर्शक लाना वाचोव्हस्कीने थॉमस, नियो यांना पुन्हा एकदा एका रोमांचक सफरीवर पाठविलेले आहे.
३१ मार्च १९९९ या दिवशी प्रदर्शित झालेल्या मॅट्रिक्स या हॉलीवूडचा सिनेमा सर्वांना आठवत असेल. जो वाचोव्स्कीस यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला काल्पनिक विज्ञानकथा असलेला हा देमारपट साहसी चित्रपट होता. या केनू रीव्हज, लॉरेन्स फिशबर्न, कॅरी-अॅन मॉस, ह्यूगो विव्हिंग आणि जो पँटोलियानो यांनी अभिनय केला होता. वास्तविक या सिनेमाचा हा चौथा भाग आहे. पहिल्या सायन्स फिक्शन सिनेमाने एक नवा इतिहास रचला होता. या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला होता. अमेरिकेत हा सिनेमा एकाचदिवशी थिएटर आणि ओटीटी फ्लॅटफॉर्म एचबीओ मॅक्सवर रिलीज झाला आहे. हा सिनेमा जरी हॉलीवूडचा असला तरी भारतीयांसाठीही लक्ष वेधणारा आहे, कारण यात सध्या चर्चेत असलेली भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्राची तसेच पूरब कोहली यांच्याही भूमिका आहेत.
कथानक - या सिनेमाची कहाणी आजच्या काळातील दमदार आहे. दिग्दर्शक लाना वाचोव्हस्कीने थॉमस, नियो यांना पुन्हा एकदा एका रोमांचक सफरीवर पाठविलेले आहे. स्व चा शोध घेण्यासाठी त्यांना वास्तव जगापासून दूर जावे लागते.
दिग्दर्शन- दोन दशकाहून अधिक काळ उलटला तरी दिग्दर्शकाने मानव आणि कृत्रीम बुद्धी असलेल्या व्यक्तीमधील संघर्ष तितक्याच ताकदीने दाखविलेला आहे. वास्तविक आणि आभासी जगतातील पेच त्यांनी मांडलेला आहे. या सिनेमातील ऍक्शन्समात्र सुमार आहेत.
अभिनय - या सिनेमात कियानू रिव्ह्ज याने मुख्य भूमिकेत चांगला अभिनय केला आहे. वीस वर्षांनंतरही कॅरीने उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. आपले देशी गर्ल प्रियंका चोप्राची या सिनेमातील सतीची भूमिका अगदी छोटी आहे, परंतु आपल्या दमदार अभिनयाची झलक तिने या भूमिकेत दाखवून हॉलीवूडच्या स्टार्सपेक्षा आपण काही कमी नाही हे दाखवून दिले आहे.
मॅट्रिक्स रेसरेक्शन्स पाहण्यापूर्वी याआधीचे तिन्ही सिनेमे पाहिल्यास नवा सिनेमा खूप एन्जॉय करता येईल. पहिल्या भागाची सिनेमाची आठवण करून देणारे अनेक दृश्य यात आहेत. भाषा आणि हिंसा याचा पुरेपूर वापर यात केलेला आहे. नव्याने पाहणाऱ्यांसाठी हा सिनेमा आवडेलच याची खात्री देता येणार नाही. It's been another life, beyond the one अशी टॅगलाईन असलेला सिनेमा खिळवून ठेवतो हे नक्की. भारतीय कलाकारांच्या भूमिका असलेल्या या हॉलीवूडच्या सिनेमाशिवाय विश्वचषकाचा रोमांचकारी अनुभव पडद्यावर पाहण्यासाठी '८३' सिनेमाही नाताळच्या सुट्टीत थिएटरमध्ये मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.