Mohalla Assi Review: डोक्यात झिणझिण्या आणणारा ‘मोहल्ला अस्सी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 06:24 PM2018-11-15T18:24:41+5:302023-08-08T19:28:38+5:30

आज बाजारीकरणामुळे बनारस आपली ओळख गमवत आहे, मात्र काही लोक आतादेखील आपल्या संस्कृतीला वाचविण्यासाठी संघर्ष करत आहेत.  

Mohalla Assi Review | Mohalla Assi Review: डोक्यात झिणझिण्या आणणारा ‘मोहल्ला अस्सी’

Mohalla Assi Review: डोक्यात झिणझिण्या आणणारा ‘मोहल्ला अस्सी’

Release Date: November 16,2018Language: हिंदी
Cast: सनी देओल, साक्षी तंवर, रविकिशन, राजेंद्र गुप्ता, अखिलेंन्द्र मिश्रा, दयाशंकर पांडे
Producer: -Director: चंद्रप्रकाश द्विवेदी
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स

 जितेंद्र कुमार

बनारस म्हणजेच काशीची ओळख संपूर्ण जगात फक्त यासाठीच नाही की, तिथे घाट आहे, सुंदरता आहे. तर ही काशी हिंदूंच्या सनातन धर्माची ओळख आहे आणि येथे मोक्ष मिळते. याला या धरतीवरचे सर्वात जुने शहर म्हटले जाते. याठिकाणी दरवर्षी कोट्यवधी विदेशी भाविक येतात. याच काशीमध्ये एक अस्सी घाट आहे, ज्यावर दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदीने काशीनाथ सिंह यांची कादंबरी 'काशी का अस्सी' वर ‘मोहल्ला अस्सी’ चित्रपट बनविला आहे. आज बाजारीकरणामुळे बनारस आपली ओळख गमवत आहे, मात्र काही लोक आतादेखील आपल्या संस्कृतीला वाचविण्यासाठी संघर्ष करत आहेत.  

 धर्मनाथ पांडेय (सनी देओल) घाटवर पंडिताचे काम करतो. सोबतच तो संस्कृतचे अध्यापनाचेही काम करतो. शिवभक्तही आहे आणि आपल्या सिद्धांतानुसार जगतो. त्याच्यामुळेच त्यांचा तो परिसर विदेशी लोकांपासून वाचला आहे. मात्र काही दलाल नेहमी हा प्रयत्न करतात की, ब्राह्मणांच्या या परिसरात विदेशींना भाड्याचे घरं देऊन मोठी रक्कम कमवावी. पण धर्मनाथ त्यांचा प्रत्येक प्रयत्नांवर पाणी फेरतो. सोबतच पार्श्वभूमित १९८८ च्या दरम्यान राम मंदीर आंदोलन सुरू असते, त्यात कारसेवासाठीही तिथे जातो. जेव्हा पत्नी सांगते की, तुम्हीच हे सर्व करण्याचा ठेका घेतला आहे का? तेव्हा तो म्हणतो की, असे करणे त्याचा धर्म आहे, सर्वजण असाच विचार करुन जाणार नाहीत तर हे कोण करेल? यापद्धतीने राम मंदीर आंदोलनावरही पप्पूच्या दुकानावर सर्व आपापले मत मांडतात.  कारण समोर गंगा आहे आणि गाइड गिन्नी(रविकिशन)चा प्रयत्न हा आहे की, त्यांच्या ब्राह्मणांचा घरात ठेवण्यात यावे. कारण ते अस्सी घाटाच्या समोर राहून मजा लुटतील. मात्र धर्मनाथ म्हणतो की, ‘विदेशी बनारसला एक पिकनिक स्पॉटसारखे वापरतात, मात्र त्यांना गंगाला स्विमिंग पूल नाही बनवू देणार.’ मात्र परिस्थिती बदलताच आणि त्याला परिस्थितीशी तडजोड करावी लागते, त्याचे मन मानत नाही. मग परिसरातील बरेच लोक विदेशींच्या पैशांच्या लालसेपोटी लबाडी करतात, तेव्हा नेमके काय होते. का धर्मराज आपला प्रामाणिकपणा विकतो, काय गरजा आणि मजबूरी त्याच्या सिद्धांतांवर भारी पडतात आणि तो तडजोड करुन घेतो? हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला चित्रपट पाहावा लागेल.  

दिग्दर्शकाने बनारसचा आत्मा, तेथील सभ्यता, वाणी, आपलेपणा, धर्म, ओळख या गोष्टींना चांगल्या प्रकारे समजून घेऊन ज्याप्रकारे मांडणी करुन सादरीकरण केले आहे ते खूपच प्रभावी आहे. त्यांचा एक संवाद मनावर खूपच खोलवर शिरतो तो म्हणजे, ‘देश में सिर्फ दो जगह संसद चलती है एक दिल्ली और एक पप्पू की चाय की दुकान, इसमें राम मंदिर आंदोलन, कारसेवा, कारसेवकों पर गोली चलाने पर सभी अपना पक्ष रखते हैं...!’
धर्म, अध्यात्म, विचार, बदलणारे मुल्यांदरम्यान आपली संस्कृती वाचविण्यासाठी या सर्व बाबींची मांडणी उत्कृष्टपणे केली आहे. सनी देओलने दमदार अभिनयाने सर्वांचे मन जिंकले आहेत. याशिवाय साक्षी तंवरदेखील मनमोहक वाटली. रविकिशन, राजेंद्र गुप्तानेही चांगले काम केले आहे. मिथिलेश चतुर्वेदीने देखील प्रभावी काम केले आहे. जर आपण एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट पाहू इच्छित असाल तर हा चित्रपट पाहू शकता.  

Web Title: Mohalla Assi Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.