Nirdosh Movie Review : निर्दाेष करतो घोर निराशा !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 09:33 AM2018-01-19T09:33:00+5:302023-08-08T19:16:16+5:30
‘तेरा इंतजार’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर तर आपटला पण, आता ‘निर्दाेष’ या सस्पेन्स, थ्रिलरपटाकडून त्याला प्रचंड अपेक्षा आहेत. बॉक्स आॅफिसवर चित्रपट हिट होणार का? हा उत्सुकतेचा प्रश्न आहे.
‘तेरा इंतजार’ नंतर अभिनेता अरबाज खान याचा ‘निर्दाेष’ हा एक चित्रपट रिलीज झाला आहे. सुब्रतो पॉल आणि प्रदिप रंगवानी दिग्दर्शित हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर आहे. या चित्रपटात अरबाजशिवाय मंजरी फडणीस, अश्मित पटेल, महक चहल, मुकुल देव हे सर्व स्टारकास्ट आहेत. ‘तेरा इंतजार’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर तर आपटला पण, आता ‘निर्दाेष’ या सस्पेन्स, थ्रिलरपटाकडून त्याला प्रचंड अपेक्षा आहेत. बॉक्स आॅफिसवर चित्रपट हिट होणार का? हा उत्सुकतेचा प्रश्न आहे.
मुंबईतील एका बिल्डिंगमध्ये झालेल्या खुनासह चित्रपटाच्या कथेला सुरूवात होते. या खुनाचा आरोप शिनाया ग्रोव्हर (मंजरी फडणीस) हिच्यावर होतो. ही केस हाय प्रोफाईल असल्याने केसची सर्व जबाबदारी क्राईम ब्रँच आॅफिसर लोखंडे (अरबाज खान) यांना देण्यात येते. गुन्हेगारांना कधीही न सोडणारा असा लोखंडे एक प्रामाणिक आॅफिसर असतो. त्याला ही केस तीन दिवसांच्या आत सोडवायची असते. चौकशीदरम्यान, अनेक नव्या गोष्टी बाहेर येतात. त्यामुळे खरा खुनी कोण? याचा पत्ता लागत नाही. संशय तर अनेकांवर येऊन थांबतो, कधी शिनाया तर कधी तिचा पती गौतम (अश्मित ग्रोव्हर) हे सर्व संशयाच्या जाळयात अडकतात. या केसमध्ये स्ट्रगलिंग मॉडेल आणि अभिनेत्री अदा सक्सेना (महक चहल) आणि राणा (मुकूल देव) हे देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. खुन कोण आणि कसा करतो हे थिएटरमध्ये जाऊन पाहणेच योग्य. नाही का?
चित्रपटाचे कथानक फार काही विशेष नसले तरीही क्राइम ब्रँच आॅफिसर लोखंडेची भूमिका साकारलेला अरबाज खानचा अभिनय चांगला आहे. शिनाया ग्रोव्हरची व्यक्तिरेखा मंजरी फडणीसने मोठ्या हिमतीने पेलली असून अश्मित पटेल, महक चहल आणि मुकूल देव यांचा अभिनय फार काही प्रभावी नव्हता. कोणत्याही सस्पेन्स थ्रिलरपटाचा हिरो कसा आहे? यावरच चित्रपटाचे खरे यश अवलंबून असते. क्रमाक्रमाने घडणाºया घटना फार काही अपेक्षित असा प्रभाव दाखवत नाहीत. त्यामुळे अखेरीस चित्रपट थोडा कंटाळवाणा होत जातो. तुम्ही जर सस्पेन्स आणि थ्रिलरपटांचे फॅन असाल तरच हा चित्रपट बघणे शहाणपणाचे ठरेल.