Raabta Review : सुशांत, क्रितीच्या पुनर्जन्माला आॅक्सिजनची गरज!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2017 10:26 AM2017-06-09T10:26:28+5:302023-08-08T20:09:54+5:30

​‘कॉकटेल, लव्ह आजकल, फाइंडिंग फॅनी आणि बदलापूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये निर्माता म्हणून काम करणाºया दिनेश विजान यांनी ‘राब्ता’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. पुनर्जन्माचा जुनाच फॉर्म्युला घेऊन त्यांनी चित्रपटाला धार देण्याचा प्रयत्न केला.

Raabta Review: Sushant, Kidney Rejuvenation Need Oxygen! | Raabta Review : सुशांत, क्रितीच्या पुनर्जन्माला आॅक्सिजनची गरज!

Raabta Review : सुशांत, क्रितीच्या पुनर्जन्माला आॅक्सिजनची गरज!

Release Date: June 09,2017Language: हिंदी
Cast: सुशांत सिंग राजपूत, क्रिती सॅनन, जिम सरभ, राजकुमार राव, वरुण शर्मा
Producer: दिनेश विजन, भूषण कुमार, होमी अदाजनियाDirector: दिनेश विजन
Duration: वेळ : २ तास ३४ मि.Genre:
लोकमत रेटिंग्स
<
strong>सतीश डोंगरे


‘कॉकटेल, लव्ह आजकल, फाइंडिंग फॅनी आणि बदलापूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये निर्माता म्हणून काम करणाºया दिनेश विजान यांनी ‘राब्ता’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. पुनर्जन्माचा जुनाच फॉर्म्युला घेऊन त्यांनी चित्रपटाला धार देण्याचा प्रयत्न केला; मात्र यापूर्वी आलेल्या ‘करण-अर्जुन, कर्ज’, सूर्यवंशी आणि ओम शांती ओम’ या चित्रपटांसारखा ताळमेळ ‘राब्ता’मध्ये फारसा बघावयास मिळत नसल्याने कथा कमकुवत असल्याची क्षणाक्षणाला जाणीव होते. परंतु अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनन यांच्यातील रंगलेली केमिस्ट्री चित्रपटाला काहीसा आधार देते.

चित्रपटाची कथा एका पंजाबी दिल फेक तरुणाच्या एंट्रीने सुरू होते. शिव कक्कड (सुशांत सिंग राजपूत) नावाच्या या तरुणाला हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे बॅँकर म्हणून नोकरी मिळते. तिथे त्याची भेट शायरा (क्रिती सॅनन) नावाच्या तरुणीशी होते. शायराचे त्याठिकाणी चॉकलेट शॉप असते. पहिल्याच भेटीत शिव तिच्या प्रेमात पडतो. काही भेटीनंतर दोघांनाही एकमेकांची कंपनी आवडायला लागते. पुढे ते लग्न करण्याचा विचार करतात; मात्र या दोघांमध्ये खलनायक म्हणून जाकिर मर्चंटची (जिम सरभ) एंट्री होते. जाकिर हा मोठा व्यापारी असतो. त्याचदरम्यान शिवला बॅँकर्स कॉन्फरन्सनिमित्त सात दिवसांसाठी वियना येथे जावे लागते. ही संधी बघून जाकिर शायराशी जवळीकता साधतो. शायरालाही त्याची कंपनी आवडते. अशात तो तिचे अपहरण करतो. येथूनच पुनर्जन्माची कथा सुरू होते. 

वास्तविक शायराला सुरुवातीपासूनच एक स्वप्न अस्वस्थ करीत असते. त्या स्वप्नातील प्रश्नांची सर्व उत्तरे तिला जाकिरकडे मिळतात; मात्र शिव तिला शोधून काढतो, पुढे काय होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण बॉलिवूडमध्ये पुनर्जन्माचा फॉर्म्युला ठरलेला आहे. ‘गडद अंधार, अर्धवट चेहरे, आरडाओरड, रक्तपात’ असं स्वप्न यातही दाखविण्यात आल्याने कथेत नावीन्यता वाटत नाही. त्यामुळे चित्रपटाचा पहिला हाफ बघण्यातच काहीसे मन रमते. मध्यंतरानंतर मात्र पुनर्जन्माची कथा खूपच कंटाळवाणी वाटते. त्यातच क्रिती आणि सुशांतला महाराणी आणि योद्ध्याच्या भूमिकेत बघणेही जड होते. 

चित्रपटातील अभिनयाविषयी बोलायचे झाल्यास सुशांतने बाजी मारलेली दिसते. तर क्रिती भावनिक प्रसंग साकारताना कमजोर दिसते. जिम सरभविषयी न बोललेच बरे. एक खलनायक म्हणून त्याच्यात कुठलेच गुण दिसत नाही. तसेच त्याचा अभिनयही पोरकट वाटतो. दिग्दर्शकाने जिम सरभला या भूमिकेसाठी का निवडले असावे? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होतो. राजकुमार राव यालाही चित्रपटात फारसे स्थान दिले गेले नाही. खरं तर वयोवृद्ध व्यक्तीच्या मेकअपमध्ये त्याला प्रेक्षकांना ओळखणेच मुश्कील होते. 

चित्रपटाची आणखी एक कमकुवत बाजू म्हणजे ही एक प्रेम कथा आहे; मात्र त्यात भावनिक प्रसंगाचीच कमतरता असल्याने प्रेम कथेला फारसे महत्त्व उरत नाही. त्याचबरोबर पुनर्जन्माची कथा दाखविताना पात्रांमध्ये तो भारदस्तपणा अजिबात जाणवत नाही. तसेच टायटल सॉँगमध्ये झळकलेली बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण काही काळ प्रेक्षकांना सुखद धक्का देते. परंतु तिची पडद्यावरून एक्झिट कशी होते, हे कळतच नसल्याने दीपिकाच्या चाहत्यांची निराशा झाल्याशिवाय राहत नाही.  

चित्रपटाच्या जमेच्या बाजूचा विचार केल्यास लोकेशन्स आणि गाण्यांवर दिनेश विजान यांनी चांगली मेहनत घेतल्याचे दिसून येते. चित्रपटाचे म्युझिकही दमदार आहे. दोन्ही गाणी व टायटल सॉँगचे बोल प्रेक्षकांच्या ओठावर आपसुकच येतात. शिवाय सुशांत आणि क्रिती यांच्यातील संवाद आणि प्रेमळ क्षण प्रेक्षकांना खुर्चीवर बसवून ठेवण्यास भाग पाडतात. त्यामुळे तुम्ही जर या दोघांचे चाहते असाल तर हा चित्रपट बघायला हरकत नाही. परंतु सुशांत आणि क्रिती व्यतिरिक्त चित्रपटात आणखी काही असेल असा विचार कराल तर ती एक रिस्क असेल. 

Web Title: Raabta Review: Sushant, Kidney Rejuvenation Need Oxygen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.