रॉक ऑन- 2
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2016 05:21 PM2016-10-17T17:21:10+5:302023-08-08T19:16:16+5:30
जान्हवी सामंत सन २००८ मध्ये फरहान अख्तरने त्याच्या प्रॉडक्शन बॅनरखाली ‘रॉक आॅन’ हा म्युझिकल ड्रामा साकारला होता. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘रॉक आॅन’ला समीक्षकांनी चांगली दाद दिली होती. प्रेक्षकांनाही हा चित्रपट भावला होता. हा चित्रपट त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता. एक फ्रेश म्युझिक कन्सेप्ट,एक आगळा-वेगळा म्युझिकल ड्रामा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बघायला मिळाला होता. तब्बल आठ वर्षांच्या अंतराने याच चित्रपटाचा सीक्वल ‘रॉक आॅन2’ आज चित्रपटगृहांमध्ये झळकला. त्याच ‘मॅझिक बँड’मधील सदस्यांसह काही नव्या पात्रांची एन्ट्री हे शुजात सौदागर दिग्दर्शित‘रॉक आॅन२’चे वैशिष्ट्य आहे.
रॉक द वॉक
सन २००८ मध्ये फरहान अख्तरने त्याच्या प्रॉडक्शन बॅनरखाली ‘रॉक आॅन’ हा म्युझिकल ड्रामा साकारला होता. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘रॉक आॅन’ला समीक्षकांनी चांगली दाद दिली होती. प्रेक्षकांनाही हा चित्रपट भावला होता. हा चित्रपट त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता. एक फ्रेश म्युझिक कन्सेप्ट,एक आगळा-वेगळा म्युझिकल ड्रामा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बघायला मिळाला होता. तब्बल आठ वर्षांच्या अंतराने याच चित्रपटाचा सीक्वल ‘रॉक आॅन2’ आज चित्रपटगृहांमध्ये झळकला. त्याच ‘मॅझिक बँड’मधील सदस्यांसह काही नव्या पात्रांची एन्ट्री हे शुजात सौदागर दिग्दर्शित‘रॉक आॅन२’चे वैशिष्ट्य आहे.
तसे पाहता,‘रॉक आॅन’ संपतो तिथूनच ‘रॉक आॅन2’ची कथा सुरु होते. आदित्य, जो आणि केडी हे तिघे आजही मित्र आहे. जो (अर्जून रामपाल) एका मोठ्या लोकप्रीय क्लबचा मालक आणि तितक्याच लोकप्रीय रिअॅलिटी शोचा जज आहे. केडी (पुरब कोहली) हा यशस्वी अॅड जिंगल्स कम्पोझजर असतो. आदित्य उर्फ आदी(फरहान अख्तर) मात्र रॉब (ल्यूक केनी)च्या मृत्यूनंतर मॅझिक बँड शिवाय पत्नी व मुलाला सोडून दूर मेघालयातील शेतकºयांसोबत आयुष्य जगतो आहे. आदीची पत्नी व मुलगा मुंबईत राहत असतात आणि त्याला अधूनमधून भेटत असतात. आदी, जो आणि केडी अद्यापही एकमेकांचे मित्र आहेत. त्यांच्याही भेटीगाठी होत राहतात. पण या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा संगीताचा एक धागा मात्र तुटलेला आहे. याच वळणावर जिया(श्रद्धा कपूर) ही एका बड्या शास्त्रीय गायकाची मुलगी,हिची चित्रपटात एन्ट्री होती. तिच्या वडिलांना तिने शास्त्रीय संगीतात करिअर बनवावे असे वाटते तर जियाला रॉक म्युझिकमध्ये रस असतो. वडिलांच्या दहशतीत वावरणाºया जियाची भेट एकेदिवशी उदय(शशांक अरोरा) या सरोद वादकाशी होते. या दोघांना जोच्या क्लबमध्ये परफॉर्मन्स करण्याची संधी मिळते. पण संधी मिळूनही जिया स्टेज परफॉर्मन्स करू शकत नाही. जियाच्या आयुष्याचा एक धागा आदित्यच्या भुतकाळाशी जुळलेला असतो. येथून ‘रॉक आॅन2’ची कथा खºया वळणावर येते.
चित्रपटाची सुरुवात संथ आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्र आआपल्या प्रपंचात गुंतलेले आहे. त्यांना एकत्र आणून कथा जुन्या प्लॉटवर आणली जाते. चित्रपटाचा पहिला भाग हा प्लॉट तयार करण्यातच जातो. यामुळे चित्रपट हळहळू पुढे सरकतो. दुसºया भागात चित्रपटाची कथा खºया अर्थाने आकार घेते. अर्थात तोपर्यंत यातील अनेक दृश्ये भावनिक व संवेदनशील असूनही काहीशी विसंगत वाटतात. चित्रपटातील पात्रेही अनेक ठिकाणी विसंगत जाणवतात. अनेक पात्रांना एका साखळीत आणण्याच्या प्रयत्नांत कथा काहीशी भरकटत जाते. कथेत काहीही नाविण्य जाणवत नाही.सतत अपयश आल्याने निराशा झालेला संगीतवेडा, शास्त्रीय विरूद्ध पाश्च्यात्य संगीतावरची चर्चा, पैसा विरूद्ध कला असे अनेक पारंपरिक विषय यात चर्चेत येतात. पण खूप काही दाखवण्याच्या हट्टापोटी दृश्यांमधील बारकावे आणि पात्रांमधील जवळीक पडद्यावर साकारताना दिग्दर्शक अपयशी ठरतो. केवळ आदित्यचे पात्र कथेशी सुसंगत वाटते. पण तेही काही दृश्यांपुरतेच. त्याचे वैवाहिक आयुष्यही कथेशी सुसंगत वाटत नाही. खरे तर त्याच्या वैवाहिक आयुष्यात मोठे वादळ येते. पण त्याचाही त्याच्यावर काहीच फरक पडताना दिसत नाही. चित्रपटात फरहान, श्रद्धा, अर्जून व पुरब आपआपली भूमिका बºयापैकी वठवलीयं. श्रद्धा यात कधीनव्हे इतकी फ्रेश वाटते. पण गाणी सोडली तर पडद्यावर या सर्वांची परस्परांसोबतची केमिस्ट्री मात्र कुठेच दिसत नाही. शंकर एकहसान लॉयचे संगीत ताजे आहे. काहीशी जुन्या ‘रॉक आॅन’च्या धर्तीची तर काहीशी नव्या चवीची. पण ‘रॉक आॅन’सोबत तुलना केली तर चित्रपट कुठेही छाप सोडत नाही. दिग्दर्शकाला ‘रॉक आॅन’इतका चांगला चित्रपट बनवता आला नाही, हेच चित्रपट पाहताना जाणवते पण तरीही तो एकदा पाहण्यास काहीच हरकत नाही.