Saavat Marathi Movie Review : चित्तथरारक 'सावट'

By अजय परचुरे | Published: April 4, 2019 03:12 PM2019-04-04T15:12:11+5:302023-08-08T19:47:32+5:30

आपला देश सध्या इंडिया आणि भारत अशा दोन हिस्स्यात दुभंगला गेलाय. एकीकडे आपल्या देशातल्या महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावताना आपण पाहतो, तर दुसरीकडे सोवळं-ओवळ्याला ही आपण खूप जास्त महत्व देतो.

Saavat Marathi Movie Review | Saavat Marathi Movie Review : चित्तथरारक 'सावट'

Saavat Marathi Movie Review : चित्तथरारक 'सावट'

Release Date: April 05,2019Language: मराठी
Cast: स्मिता तांबे, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव,श्वेतांबरी घुटे शीतांशु शरद
Producer: हितेशा देशपांडे, स्मिता तांबे, शोभिता मांगलिकDirector: सौरभ सिन्हा
Duration: २ तासGenre:
लोकमत रेटिंग्स

- अजय परचुरे

 

आपला देश सध्या इंडिया आणि भारत अशा दोन हिस्स्यात दुभंगला गेलाय. एकीकडे आपल्या देशातल्या महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावताना आपण पाहतो, तर दुसरीकडे सोवळं-ओवळ्याला ही आपण खूप जास्त महत्व देतो. मोबाईल आज गावागावात पोहोचला आहे पण भूत-प्रेत,जादूटोणा,चेटूक ह्यामुळे आजही आपण अंधश्रध्देच्या कचाट्यातून बाहेर पडलेलो नाही ही सद्याची खरंच परिस्थिती आहे. या सर्वांवर नेमकं बोट ठेवणारा सावट हा सिनेमा. 
    मराठीत एक म्हण  प्रचलित आहे, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तसेच काहीसे सावट सिनेमाबाबतही आहे.. सत्य-असत्याच्या रेषेवरचे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांचे सावट बºयाचदा माणसाच्या मनावर असते. आणि मग तो उगीच घाबरून श्रद्धा-अंधश्रद्धेच्या कचाट्यात सापडत असतो. हा चित्रपट  एक थरारनाट्य आहे. संहितेच्या बळावर हा सिनेमा एकदा नक्कीच पाहण्यासारखा आहे. कलाकार नवखे असले तरी दिग्दर्शकाने यातील थरारकता कुठेही ढळू दिली नाहीये. तांत्रिकदृष्टया जरी हा सिनेमा फारसा उजवा नसला तरी यातील वेगळ््या कथानकामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे शेवटपर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवण्याची किमया या सिनेमाने केली आहे. 
    सिनेमाचं कथानक थोडंसं वेगळ््या वळणावरचं आहे. एका गावात सात वर्षात सात आत्महत्या होतात. आणि ह्या सगळ्या आत्महत्या श्रावण महिन्यातच होतात. विशेष म्हणजे त्यातल्या प्रत्येक आत्महत्येचा एक साक्षीदार आहे. ह्या प्रत्येकानेच कोणाला तरी पाहिलंय. आणि या प्रत्येकाकडे या आत्महत्येविषयी एकाचप्रकारची माहिती आहे. प्रचंड गुंतागुंत असलेल्या या केसला सोडवण्यासाठी मुंबई पोलिस दलातील अत्यंत धडाडीची अधिकारी आदिती देशमुखला या गावात ही केस सोडवण्यासाठी धाडलं जातं. प्रत्येक आत्महत्या झालेल्या जागेचा व्यवस्थित तपास करून आदिती आणि टीमच्या हाती कोणतं असं सत्य बाहेर पडतं ही सावटच्या सिनेमाची कथा. 
    सावट सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन सौरभ सिन्हा यांनी केलं आहे. सौरभ सिन्हा यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. सौरभ यांनी मांडलेलं कथानक नवं आहे . तांत्रिकदृष्ट्या जरी हा सिनेमा फार सफाईदार नसला तरी कथानक आणि कलाकारांच्या अभिनयाने हा सिनेमा  थरार स्पष्ट करतो. सौरभ सिन्हाचं दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा जरी असला तरी त्यांच्या दिग्दर्शनात कोणत्याही प्रकारचं नवखेपण दिसत नाही. 
    कलाकारांच्या आघाडीवर या सिनेमात प्रभावी भूमिका साकारलीय अभिनेत्री स्मिता तांबेने ..सिनेमात ओळखीचा असा चेहरा म्हणजे स्मिता तांबे . स्मिताने आपली भूमिका अतिशय चोख केली आहे. आदिती देशमुख या 
इन्वेस्टिगेटिव्ह पोलिस अधिकाºयाची भूमिका स्मिताने उत्तमरित्या वठवली आहे. तपास करताना केसमध्ये काही नवीन घडामोडी घडल्या तर त्या घडामोडी पेनाने हातावर लिहायची तिने आणलेली नवीन पध्दत जरा हटके आहे. स्मिताबरोबरच या सिनेमातून  नवीन पण आश्वासक असे चेहरे मराठी सिनेमाला मिळणार आहे. श्वेतांबरी घुटे ह्या अभिनेत्रीने आपल्या पहिल्याच सिनेमात अतिशय उत्तम भूमिका केली आहे. त्याचबरोबर मिलिंद शिरोळे, शीतांशु शरद या अभिनेत्यांनीही आपल्या पहिल्याच सिनेमात चमक दाखवली आहे. अनेकवर्ष रंगभूमी,सिनेमात कार्यरत असणाºया संजीवनी जाधव यांनी ही सरपंचाच्या पत्नीची भूमिका उत्तम केली आहे. मूळात हा सिनेमा एकदा पाहायला काहीच हरकत नाही. मराठीत मूळातच फार कमी थरार सिनेमे येतात. त्यातील एक वेगळं कथानक असलेल्या या सिनेमाच्या सावटाखाली जायला काहीच हरकत नाही. 

Web Title: Saavat Marathi Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.