Sacred Games 2 Review : थ्रिलर आणि अफलातून परफॉर्मन्सचा डबल डोज 'सेक्रेड गेम्स २'!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 02:08 PM2019-08-15T14:08:16+5:302023-08-08T20:09:54+5:30

सेक्रेड गेम्सचा पहिला सीझन येऊन गेल्यावर तब्बल एका वर्षापेक्षा अधिक काळ वाट पाहिल्यानंतर सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन आला आहे.

Sacred Games 2 Review : Saif Ali Khan, Nawazuddin Siddiqui and Pankaj Tripathi starrer second season is more interesting than first | Sacred Games 2 Review : थ्रिलर आणि अफलातून परफॉर्मन्सचा डबल डोज 'सेक्रेड गेम्स २'!

Sacred Games 2 Review : थ्रिलर आणि अफलातून परफॉर्मन्सचा डबल डोज 'सेक्रेड गेम्स २'!

Release Date: August 15,2019Language: हिंदी
Cast:
Producer: Director:
Duration: Genre: थ्रिलर
लोकमत रेटिंग्स

सेक्रेड गेम्सचा पहिला सीझन येऊन गेल्यावर तब्बल एका वर्षापेक्षा अधिक काळ वाट पाहिल्यानंतर सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. त्यांना उत्सुकता लागली होती की, पुढे काय होणार. आधीच्या सीझनप्रमाणेच उत्सुकता वाढणारा आणि गुंतवूण ठेवणारा हा दुसरा सीझन आहे. या सीझनमध्ये गायतोंडे परदेशात असूनही लपलेला आहे. तर नोकरीहून सस्पेंड सरताज सिंग या सीझनमध्ये ऑफिशिअली चौकशी करतोय. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये केवळ ५ सेकंदासाठी दिसलेली जोजो मॅस्करॅन्हस या सीझनमध्ये गणेश गायतोंडेच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे.

(All Image Credit : Netflix)

विक्रम चंद्राची कादंबरी सेक्रेड गेम्सवर आधारित या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचं दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि नीरज घेवान यांनी मिळून केलं आहे. पहिल्या सीझनमध्ये आपण गणेश गायतोंडेच्या नजरेतून मुंबई शहर पाहिलं आणि त्यासोबतच गणेश गायतोंडे कसा मोठा झाला हेही पाहिलं. आता दुसरा सीझन हा गणेश गायतोंडेच्या पतनावर आहे. तेच दुसरीकडे चांगला मित्र असलेल्या हवालदार काटेकरच्या मृत्युने दु:खी सरताज सिंगचं जगणंही दाखवलं आहे. तो अजूनही गायतोंडेच्या मिस्ट्रीमध्ये अडकलेला आहे.

हे तुम्हाला माहीत असावं....

सर्वातआधी तुम्ही बघाल ते हे की, पहिल्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये सरताज सिंग ज्या अंडरग्राऊंड बंकरजवळ पोहोचला होता, तिथे मिळालेल्या सर्वच पुराव्यांची तो चौकशी करणार. तेच दुसरीकडे गायतोंडे आपल्या देशातून फार दूर आहे. आता गायतोंडे एक अंडरकव्हर एजंट झाला आहे. तो केनिया आणि साऊथ आफ्रिकेत आहे. काहीच पर्याय नसल्याने गायतोंडे काहीच करू शकत नाहीये. त्यामुळेच तो एका अनोळखी अंडरवर्ल्ड दुनियेत एका बाहुल्याप्रमाणे काम करत आहे. गायतोंडेचे स्वत:चे गोल आता बदलले आहेत, जसं मुंबई शहर बदललं आहे.

यादरम्यान सरताज सिंग त्याच्या गर्लफ्रेन्डला भेटण्याचा प्रयत्न करतो आणि गायतोंडेचा तिसरा बाप 'गुरूजी' यालाही शोधतो. नंतर सरताज सिंग न्यूक्लिअर अटॅकचा धोका असताना शाहिद खानच्या शोधात फिरतो. शाहिद हा एक दहशतवादी संघटना चालवतो.

या सीझनमधील नवे चेहरे

या सीझनमध्ये तीन नवीन चेहरे बघायला मिळतात. रणवीर शौरी. हा एका दहशतवाद्याची भूमिका करतो. कल्कि कोचलिन गुरूजींची शिष्या आहे. तिच गुरूजींनंतर त्यांची गादी सांभाळणार आहे. अमृता सुभाष गुप्तहेर खात्यातील ऑफिसरची भूमिका साकारत आहे.
पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीझनमध्येही प्रेक्षक प्रत्येक एपिसोडच्या कथेत गुंततात. पण पहिल्या सीझनमध्ये जो एक स्पीड होता तो आता जरी कमी झाल्यासारखं वाटतं.

काय आहे या सीझनमध्ये खास

या सीझनमध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्या बदलल्या नाहीत. जसे की, गायतोंडेचे सर्वच मोनोलॉग(स्वगतं), फ्लॅशबॅक, मायथॉलॉजीतून घेतलेले संदर्भ अजूनही भरपूर आहेत. पहिल्या आणि तिसऱ्या एपिसोडमध्ये हिंदू धर्मातील अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. तेच दुसऱ्या एपिसोडमध्ये गिल्गामेशचे अनेक संदर्भ आहेत.

पहिल्या सीझनचा प्रेक्षकांवर खोलवर प्रभाव झाला होता. पण प्रश्न हा आहे की, काय पहिल्या सीझनप्रमाणे दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरणार? मात्र, एवढं नक्की की, पहिले तीन एपिसोड फारच भन्नाट आहेत.

Web Title: Sacred Games 2 Review : Saif Ali Khan, Nawazuddin Siddiqui and Pankaj Tripathi starrer second season is more interesting than first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.