Shaadi Mein Zaroor Aana Movie Review : राजकुमारसाठी पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 05:30 AM2017-11-10T05:30:19+5:302023-08-08T19:16:16+5:30

‘बरेली की बर्फी’ प्रमाणेच ‘शादी मे जरूर आना’ हा चित्रपटही एका छोट्याशा गावात बहणारी प्रेमकथा आहे. अभिनेता राजकुमार राव याने या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.

Shaadi Mein Zaroor Aana Movie Review: Look for Prince! | Shaadi Mein Zaroor Aana Movie Review : राजकुमारसाठी पाहाच!

Shaadi Mein Zaroor Aana Movie Review : राजकुमारसाठी पाहाच!

Release Date: November 10,2017Language: हिंदी
Cast: राजकुमार राव, कृति खरबंदा
Producer: विनोद बच्चन, मंजू बच्चन, कलीम खानDirector: रत्ना सिन्हा
Duration: २ तास १७ मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>- जान्हवी सामंत

‘बरेली की बर्फी’ प्रमाणेच ‘शादी मे जरूर आना’ हा चित्रपटही एका छोट्याशा गावात बहणारी प्रेमकथा आहे. अभिनेता राजकुमार राव याने या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. अलीकडे आलेले राजकुमारचे सर्व चित्रपट बघता, प्रेक्षकांच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या आहेत. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर याही वेळी राजकुमार राव प्रेक्षकांच्या अपेक्षेवर अगदी तंतोतंत खरा उतरता आहे. पहिल्या भागातील साधासरळ, प्रेमळ विवाहेच्छूक मुलगा आणि दुसºया भागात सूडाच्या भावनेने पेटलेला एक अँग्रीमॅन या दोन्ही भूमिका राजकुमारने  तेवढ्याच ताकदीने साकारल्या आहेत.

‘शादी मे जरूर आना’ हा ‘अरेंज मॅरेज’ची एक सुंदर प्रेमकथा आहे. कानपूरमधून चित्रपटाची कथा सुरू होते. एका सेवानिवृत्त प्रोफेसरचा एकुलता एक मुलगा सतेन्द्र मिश्रा उर्फ सत्तु(राजकुमार राव) आणि एका पारंपरावादी सरकारी कर्मचाºयाची मुलगी आरती शुक्ला(कृति खरबंदा) यांच्या लग्नाची ही गोष्ट. शासकीय कार्यालयात बाबू असलेल्या सत्येन्द्रला त्याचे मामा आरतीचा फोटो दाखवतात. फोटो पाहताच सत्तुच्या कुटुबांला आरती पसंत पडले. पण लग्नापूर्वी आरतीने मुलाला भेटावे, त्याला समजून घ्यावे, असे तिच्या आईचे मत असते.  आरतीचे विचाराल तर तिला मुळातच लग्नाला विरोध असतो. शिकून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे तिचे स्वप्न असते. पण तिच्या परंपरावादी वडिलांना मात्र लवकरात लवकर आरतीचे लग्न उरकायचे असते. वडिलांच्या आग्रहाखातर आरती कशीबशी या लग्नासाठी तयार होते. यानंतर सत्येन्द्र व आरतीची भेट घडवून आणली जाते. या पहिल्याच भेटीत आरतीला सत्तू आवडतो. लग्नानंतर मी नोकरी करणार, ही आरतीची अटही सत्तू मानतो.सत्तू  व आरती एकमेकांना आवडते असतानाच, सत्तुचे कुटुंब हुंड्यांची मागणी पुढे करते. नाईलाजास्तव आरतीचे वडिलही ही मागणी मान्य करतात आणि लग्नाची तारीख ठरते. दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारीत लागली असतानाच आपली सासू लग्नानंतर आपल्याला नोकरी करू देणार नाही, हे आरतीला कळून चुकते. लग्नाच्या एक दिवसाआधी पीसीएस परिक्षा उत्तीर्ण झाल्याचेही आरतीला कळते. आणि इथेच लग्न की करिअर असे दोन मार्ग आरतीपुढे उभे ठाकतात. महत्त्वाकांक्षी आरती अखेर करिअरची निवड करते. चित्रपटाचा पहिला भाग इथेच संपतो. मध्यांतरानंतर चित्रपट सुरु होतो तोच एका अनपेक्षित वळणाने. चित्रपटाची  कथा अचानक एका गंभीर वळणावर पोहोचल्याचे आपल्याला यादरम्यान पाहायला मिळते. एका बिल्डरकडून लाच घेतल्याच्या आरोपाखाली आरती शुक्ला चौकशी समितीपुढे उभी आहे, हे मध्यांतरानंतरचे पहिलेच दृश्य धक्का देते. विभागीय दंडाधिकारी सत्येन्द्र मिश्रा याच्या नेतृत्वाखाली ही चौकशी सुरू असते आणि या चौकशीसोबत चित्रपट पुढे एकापाठोपाठ एक असे अनेक धक्के देतो. लग्नाच्या एक दिवसआधी पळून जात आरतीने आपल्याला धोका दिला, असे सत्येन्द्रचे ठाम मत असते आणि याचाच बदला त्याला घ्यायचा असतो. मध्यांतरानंतर रंगणाºया   या सूडकथेत एका पाठोपाठ एक अनेक टिष्ट्वस्ट येतात आणि चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो. 

चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम काम केले आहे. आरतीच्या भूमिकेत असलेल्या कृति खरबदांने आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण खरे सांगायचे तर राजकुमार राव हाच या चित्रपटाचा आत्मा आहे.  अख्खा चित्रपट राजकुमारने एकट्याने आपल्या खांद्यावर पेलला आहे.  सत्तुच्या भूमिकेतील त्याच्या अभिनयाला तोड नाही. दोन वेगवेगळ्या छटेच्या भूमिका त्याने लीलया पेलल्या आहेत आणि त्यामुळेच राजकुमार राव या कथेचा आत्मा आहे. राजकुमारच्या अप्रतिम अभिनयाशिवाय चित्रपटाचा प्लॉटही वास्तवाच्या जवळ जाणारा असल्याने मनाला पटणारा आहे. भारतीय प्रेमीयुगुलांच्या वास्तववादी प्रेमकथेतील अनेक पैलंू यात दिसतात. भारतीय विवाहसंस्थेबद्दल एक सुंदर संदेश हा चित्रपट सरतेशेवटी देतो. हुंडा, माणसाचा हुद्दा, सरकारी कार्यालयातील एका बाबूकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणि अरेंज मॅरेजची एकूण संकल्पना या मुद्यांवरही  प्रकाश टाकतो. एक सुंदर प्रेमकथा सोबतच वास्तवाच्या जवळ जाणारा चित्रपट असे या चित्रपटाचे वर्णन केले तर ते खोटे ठरणार नाही. एकंदर काय तर एक इंटरेस्टिंग चित्रपट असल्याने तुम्ही तो पाहू शकता.

Web Title: Shaadi Mein Zaroor Aana Movie Review: Look for Prince!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.