Short Film Review Pani :धगधगतं वास्तव मांडणारी कहाणी

By अजय परचुरे | Published: July 10, 2020 04:20 PM2020-07-10T16:20:05+5:302023-08-08T19:47:32+5:30

महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न पूर्वापार चालत आला आहे. या धगधगत्या वास्तवावर प्रकाश टाकणारी पाणी ही अजिंक्यतेज भालेरावची शॉर्टफिल्म आहे.

Short Film Review Pani | Short Film Review Pani :धगधगतं वास्तव मांडणारी कहाणी

Short Film Review Pani :धगधगतं वास्तव मांडणारी कहाणी

ठळक मुद्देपाणी ही शॉर्टफिल्म दिग्दर्शक अजिंक्यतेज भालेराव या उमद्या तरूणाने जगासमोर शुध्द देसी मराठीच्या प्लॅटफॉर्मवरून आणली आहे
Release Date: July 10,2020Language: मराठी
Cast: अथर्व खरे,समीर मणेर,जयवंत जाधव
Producer: मृणाल Director: अजिंक्यतेज भालेराव
Duration: १६ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न पूर्वापार चालत आला आहे. या धगधगत्या वास्तवावर प्रकाश टाकण्साठी आत्तापर्यंत सिनेमा या माध्यमातून अनेक मेकर्सनी  निरनिराळ््या प्रकारचे सिनेमे तयार केले. हे वास्तव इतकं गहिरं आहे की यावर जितकं दाखवलं जाईल तितकं कमीच आहे. मात्र आजही दुष्काळी भागातील परिस्थिती जैसै थे आहे. थेंबाथेंबासाठी झगडणाºया सामान्य नागरिकांचा प्रश्न आजही सुटलेला नाही. पाण्यासाठी रानोमाळ भटकणाºया बायाबापड्या यांचा संघर्ष आजही थांबलेला नाही. यावर भाष्य करणारी पाणी ही शॉर्टफिल्म दिग्दर्शक अजिंक्यतेज भालेराव या उमद्या तरूणाने जगासमोर शुध्द देसी मराठीच्या प्लॅटफॉर्मवरून आणली आहे आणि या प्रश्नाला वाचा फोडली आहे याबद्दल त्याचं विशेष अभिनंदन.

याची कहाणी अंगावर शहारा आणणारी आहे.महाराष्ट्रातील एका दुष्काळी गावाचं वास्तव यात मांडण्यात आलंय. शिकून सवरून मोठं होण्याची स्वप्नं पाहणारा गावातील एक शाळकरी मुलगा. घरात दारिद्र्य आणि गावात पाण्याचा तुटवडा याच्या कात्रीत सापडलेला. शाळेत जाऊन शिकण्याची प्रचंड आवड असणारा हा विद्यार्थी घरात पाण्याचा थेंब नसल्याने आईच्या आज्ञेवरून गावातील विहीरींमध्ये जाऊन पाणी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. या प्रयत्नात त्याची आवडती शाळा मात्र दिवसेंदिवस बुडतेय. मात्र घरात पाण्याचा एक थेंब नसल्याने आपल्या आईसोबत दिवसभर एका विहीरीवरून दुसºया विहीरीवर पाणी मिळवण्याचा एक निष्फळ प्रयत्न ही मायलेकाची जोडी करत असतात. दुसरीकडे शहरातून गाडीने आलेला तरूण मिनरल वॉटरचा वापर तोंड धुण्यासाठी करतोय आणि पाण्याचा अपव्यय करतोय अशीही बाजू मांडण्यात आलीय. एकीकडे देश आंतरराष्ट्रीय स्तरावर नवनवीन झेप घेत असताना दुसरीकडे मात्र गावागावातील पाण्याचा प्रश्न मात्र कोणालाच सोडवता आला नाही हे वास्तव आहे. या मायलेकांचं पाण्याशिवाय पुढे काय होतं. हे पाहण्यासाठी तुम्हांला ही फिल्म जरूर पाहावी लागेल.

पाणी ही अजिंक्यतेज भालेरावची शॉर्टफिल्म आहे. त्याने यातील मांडलेल्या प्रत्येक प्रसंगाचा अगदी बारकाईने अभ्यास केला आहे. हे या सिनेमाच्या प्रत्येक फ्रेमवरून आपल्याला जाणवतं. त्याने या शॉर्टफिल्मसाठी घेतलेली मेहनत निश्चितच लाजवाब आहे. या फिल्मसाठी त्याने निवडलेले लोकेशन्स आणि प्रत्येक भूमिकेसाठी त्याने निवडलेले अस्सल कलाकार यासाठी त्याला पैकीच्या पैकी मार्क द्यायला हवेत. सर्व कलाकारांनी नवीन असूनसुध्दा या सिनेमात अगदी समरसून काम केलं आहे. यातील अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या शॉर्टफिल्मसाठी वापरण्यात आलेलं पार्श्वसंगीत . प्रत्येक फ्रेमला तंतोतंत जुळेल असं संगीत यामध्ये देण्यात आलं आहे. त्यामुळेच वास्तवला सत्यात उतरवणारी ही शॉर्टफिल्म एकदा तरी नक्कीच पाहायला हवी.

Web Title: Short Film Review Pani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.