Street Dancer 3D Movie Review : कलेची नवी परिभाषा शिकवणारा

By गीतांजली | Published: January 24, 2020 03:11 PM2020-01-24T15:11:19+5:302023-08-08T19:47:32+5:30

प्रभूदेवा आणि नोराचा डान्स टाळ्या आणि शिट्ट्या घेऊन जातात.

Street Dancer 3D Movie Review | Street Dancer 3D Movie Review : कलेची नवी परिभाषा शिकवणारा

Street Dancer 3D Movie Review : कलेची नवी परिभाषा शिकवणारा

Release Date: January 24,2020Language: हिंदी
Cast: वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा, नोरा फतेही
Producer: टी-सीरिजDirector: रेमो डिसूजा
Duration: 2 तास 30 मनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

गीतांजली आंब्रे

स्वत:साठी तर इथं प्रत्येकजण जगतो पण हे जगणं जेव्हा दुसऱ्यासाठी असते त्यावेळी आयुष्य जगण्याची मजा आणि व्याख्या दोनही बदलेल्या असतात. याच आशयावर आधारित वरुण धवन आणि श्रद्धा कपूरचास्ट्रिट डान्सर 3 डी’ सिनेमा आहे. एक कला, दोन टीम आणि ज्या तिसऱ्याच्या आनंदासाठी ही स्पर्धा जिंकण्याचा निर्धार करतात, मग सुरु होतो तो डान्सचा मुकाबला.     


ही गोष्ट आहे लंडनमध्ये राहणाऱ्या पंजाबी कुटुंबातील सहेज (वरुण धवन) आणि इनायतची (श्रद्धा कपूर). दोघांचा धर्म आणि देश वेगवेगळा असतो त्यामुळे दोघे एकमेकांचे कट्टर वैरी असतात. दोघे एकमेकांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र दोघांची पॅशन एकच असते ती म्हणजे डान्स. सहेज (स्ट्रिट डान्सर) आणि इनायत (रुल ब्रेकर्स) लंडनमध्ये दोन लोकल डान्सचे ग्रुप चालवतात. त्याच दरम्यान लंडनमध्ये 'ग्राऊंड झीरो' ही डान्स कॉम्पिटीशन जाहीर होते. दोन्ही टीमला ही स्पर्धा जिंकायची असते. मात्र दोन्ही टीमचा स्पर्धा जिंकण्याचा हेतू वेगळाअसतो. याच दरम्यान एंट्री होते अण्णाची (प्रभू देवाची). प्रभू देवाच्या एंट्रीनंतर गोष्टीत अनेक ट्विस्ट आणि टर्नस येतात आणि या स्पर्धेकडे बघण्याचा दोन्ही टीमचा दृष्टीकोनचं बदलून जातो. 


सिनेमाचा पहिला भाग गरजेपेक्षा जास्त लांबवल्यासारखा वाटतो. मध्यांतरनंतर सिनेमा आपली पकड घेतो. स्क्रिनप्लेला हा सिनेमा कमी पडला आहे. सिनेमाची कथा नेहमीच असली तरी डान्स आणि ड्रामाच्या जोरावर तिची सुरेखपणे मांडणी केली आहे. हा सिनेमा म्हणजे डान्स, जुनून आणि एक जंग आहे. 'जुडवा2', 'बद्रीनाथ की दुल्हनिया, ऑक्टोबर, सुई-धागा सारख्या सिनेमांमध्ये वरुणने चांगला अभिनय केला आहे. मात्र या सिनेमात त्याच्या अभिनयापेक्षा त्याचा डान्स जास्त भाव खाऊन गेला आहे. वरुण आणि श्रद्धाने त्याच्या डान्स मुव्ह्जने खूप इंप्रेस केले आहे. पण इमोशनल सीन्समध्ये वरुण आणि श्रद्धाचा अभिनय कमी पडला आहे. नोरा फतेही या सिनेमात एक सरप्राईज पॅकेज म्हणून समोर आली आहे. पुनीत पाठक धर्मेश आणि सलमान युसूफने त्यांच्या वाटेला आलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. प्रभूदेवाला मोठ्या स्क्रिनवर बघण्याची मजाच काही वेगळी आहे. प्रभूदेवा आणि नोराचा डान्स टाळ्या आणि शिट्ट्या घेऊन जातात. कोरियोग्राफर ते दिग्दर्शक असा रेमो डिसूजाचा प्रवास चांगला आहे. ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’मधील गाणी रिलीज आधीच हिट झाली आहेत. एकूणच हा सिनेमा एण्टरटेन्मेंटच कप्लीट पॅकेज आहे. 

 
 

Web Title: Street Dancer 3D Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.