Welcome To New York Movie Review: ​ ‘नुसती चमक, नो धमक’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 09:43 AM2018-02-23T09:43:38+5:302023-08-08T20:27:58+5:30

‘वेलकम टू न्यूयॉर्क’ हा सोनाक्षी सिन्हाचा चित्रपट आज शुक्रवारी रिलीज झाला. सोनाक्षीला या चित्रपटाकडून ब-याच अपेक्षा आहे. पण पे्रक्षकांच्या कसोटीवर हा चित्रपट किती खरा उतरला, ते जाणून घेऊ या....

Welcome to New York Movie Review: 'Nothing glow, no threat' | Welcome To New York Movie Review: ​ ‘नुसती चमक, नो धमक’

Welcome To New York Movie Review: ​ ‘नुसती चमक, नो धमक’

Release Date: February 23,2018Language: हिंदी
Cast: सोनाक्षी सिन्हा, दिलजीत दोसांज, लारा दत्ता, बोमन इराणी , करण जोहर कॉमेडी
Producer: जॅकी भगनानी, वाशु भगनानी, सबबास जोसेफ, आंद्रे टिमिन्सDirector: चकरी टोलेटी
Duration: २ तास ३ मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>-जान्हवी सामंत

‘वेलकम टू न्यूयॉर्क’ हा सोनाक्षी सिन्हाचा चित्रपट आज शुक्रवारी रिलीज झाला. सोनाक्षीला या चित्रपटाकडून बºयाच अपेक्षा आहे. पण पे्रक्षकांच्या कसोटीवर हा चित्रपट किती खरा उतरला, ते जाणून घेऊ या....

‘वेलकम टू न्यूयॉर्क’ हा चित्रपट बघिल्यावर एक प्रश्न सर्वप्रथम पडतो. तो म्हणजे, हा चित्रपट का बनवला असेल? ८० या दशकात कादर खान आणि शक्ती कपूर जसे टुकार चित्रपट काढायचे अगदी तितकाच टुकार चित्रपट, हिरोईनची तितकीच ओव्हर अ‍ॅक्टिंग आणि कंटाळा येईल इथपर्यंत ताणून धरलेले फालतू विनोद, हे हा प्रश्न पडण्यामागचे कारण. 
 ‘ओम शांती ओम’मधील ‘ओम शांती ओम’ हे गाणे किंवा ‘नशीब’चे ‘जॉन जानी जनार्दन’ हे गाणे तीन तासांच्या चित्रपटात बदलले तर कसे वाटेल? ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ नेमका असाच ‘नुसती चमक, नो धमक’ चित्रपट आहे.  सलमान खान, सोहेल खान, अरबाज खान, कॅटरिना कैफ, आलिया भट्ट, वरूण धवन,रितेश देशमुख, सुशांत सिंग राजपूत  असे अनेक बडे स्टार या चित्रपटात कॅमिओ करताना दिसतात. (कदाचित पुढच्या वर्षी आयफा अवार्ड मिळेल, याच अपेक्षेने असावे.) पण इतक्या स्टार्सच्या डेट्स मिळवण्याचा खटाटोपा करण्यापेक्षा दिग्दर्शकाने स्क्रिप्टवर लक्ष केंद्रीत केले असते तर ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ कदाचित ब-यापैकी सुसह्य होऊ शकला असता. अनेकांचा कॅमिओ असल्यामुळे सर्वप्रथम या चित्रपटाची खरी स्टारकास्ट सांगणे गरजेचे आहे. सोनाक्षी सिन्हा, दिलजीत दोसांज, लारा दत्ता, बोमन इराणी आणि करण जोहर(डबलरोल) अशी भलीमोठी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली आहे. सोफिया (लारा दत्ता) ही गॅरी (बोमन इराणी) नेतृत्व करीत असलेल्या आयफा अवार्ड्ससाठी अनेक वर्षांपासून प्रामाणिक काम करत असते. या अख्ख्या सोहळ्याचा भार एकटी सोफिया सांभाळत असते, असे म्हटले तरी चालेल. पण त्यामोबदल्यात सोफिया प्रमोशन मागायला गॅरीकडे जाते तेव्हा गॅरी तिचा जिव्हारी लागणारा अपमान करतो. याचक्षणी आयफा अवार्ड फ्लॉप करून गॅरीच्या डोक्यात गेलेली सगळी नशा उतरवायची, असे सोफिया ठरवते. यासाठी आयफाच्या टॅलेन्ट कॉन्टेस्टमधल्या सगळ्या प्रतिभावानांना बाजूला सारून सोफिया मुद्दाम सुमार कलाकारांची निवड करते. हे कलाकार कोण तर फॅशन डिझाईनर जीनल (सोनाक्षी सिन्हा) आणि नवोदित अभिनेता तेजी सिंह (दिलजीत दोसांज). दोघेही मूर्खांच्या नंदनवनात नांदणारे असल्यामुळे जीनल कॉस्च्युम डिझाईनर असून दिग्दर्शकासोबत वाद घालताना दिसते. तेजी सिंगवर अभिनयाचे असे काही भूत चढलेले असते की, तो कुठेही डायलॉगबाजी सुरू करतो. आयफासाठी न्यूयॉर्कला रवाना होत  असताना विमानात जीनल व तेजीची भेट होते आणि इथून दोघांची भांडणे सुरू होतात. न्यूयॉर्कला पोहोचल्यावर सोफिया तेजी सिंगच्या कामात बरेच अडथळे आणण्याचा प्रयत्न करते. पण अनेक दिग्गजांच्या गर्दीत हे अगदी नवेकोरे चेहरे आयफाचा स्टेज गाजवतात. कसे? ते मात्र विचारू नका. कारण या प्रश्नाचे उत्तर खुद्द दिग्दर्शकाकडेही नाही. जीनल आणि तेजीच्या याच कथेसोबत करण जोहरचा एक पैलूही चित्रपटात दिसतो. करण आयफा होस्ट करायला आलेला असतो. पण हुबेहुब करण सारखा दिसणारा न्यूयॉर्कचा अर्जुन नामक  गँगस्टर  करणला शो नाईटच्यादिवशी किडनॅप करण्याचा प्रयत्न करतो. आयफा नाईटचे हसू व्हावे, म्हणून सोफियाच करणच्या अपहरणाची योजना आखते. (अर्थात करणच्या या अपहरणनाट्याचा आणि तेजी व जीनलच्या कथेचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. केवळ दोन्ही कथा समांतर सुरू असतात, म्हणून  ते पाहणे भाग आहे.)  एकंदर काय तर चित्रपटाला ना ‘लॉजिक’ असल्याचे जाणवत, ना ‘सेन्स’. त्यामुळे आधीचे दृश्य , नंतरचे दृश्य असा ताळमेळही कुठेच दिसत नाही.  साहजिकच कुणीही यावे, काहीही बोलावे असा हा चित्रपट मध्यंतरापूर्वीच लय गमावून बसतो. खरे तर आयफा किंवा बॉलिवूड अवार्ड नाईट्स या विषयावर अतिशय मार्मिक , मनोरंजक व विनोदी चित्रपट होऊ शकला असता. पण दुदैवाने ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ यापैकी काहीही दिसत नाही.

गुजराती मुलगी बनलेल्या सोनाक्षीचा अभिनय अतिशय उथळ आणि वैताग आणणारा आहे. दिलजीतचा अभिनय बरा आहे पण त्याच्या वाट्याला करण्यासारखे काहीच नसल्याने त्यालाही मर्यादा आहे. केवळ करण जोहरचा डबलरोल ही या चित्रपटाची एकमेव सुसह्य गोष्ट आहे, असे म्हटले तरी चालेल. It's so bad, that it's actually good’, अशी इंग्रजीत एक म्हण आहे. त्यानुरूप, लेडी रॉबिनहूड, रामगड के शोले असे चित्रपट किमान विनोदी म्हणून आपण पाहतो. पण ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ तर बंडल पिक्चर म्हणून  पाहावा, या लायकीचाही नाही. त्यामुळे हा चित्रपट टाळलेलाच बरा.
 
 
 

 

Web Title: Welcome to New York Movie Review: 'Nothing glow, no threat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.