आलिया भटने लग्नाच्या अफवांवर दिले हे सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 12:41 PM2018-08-14T12:41:30+5:302018-08-14T12:42:31+5:30

आलिया आणि रणबीर पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा मीडियात गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. पण आलियाने नेहमीच मीडियात त्यांच्या नात्याविषयी बोलणे टाळले आहे.

The ridiculous reply to the wedding rumors | आलिया भटने लग्नाच्या अफवांवर दिले हे सडेतोड उत्तर

आलिया भटने लग्नाच्या अफवांवर दिले हे सडेतोड उत्तर

googlenewsNext

रणबीर कपूर आणि आलिया भटच्या प्रेमकथेची सध्या चांगलीच चर्चा आहे. ते सध्या दोघे सगळीकडे एकत्र दिसतात. सोनम कपूरच्या लग्नात त्या दोघांनी एकत्र हजेरी लावल्यानंतर त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. आलिया रणबीरच्या कुटुंबियांसोबत देखील वेळ घालवताना दिसली होती. सध्या ते दोघे ब्रम्हास्त्र या चित्रपटाचे चित्रीकरण बल्गेरिया येथे करत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढून ते दोघे एकमेकांसोबत चांगलाच वेळ घालवत आहेत.

जीक्यू या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने आलिया आणि त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. पण आलियाने नेहमीच मीडियात त्यांच्या नात्याविषयी बोलणे टाळले आहे. आलिया आणि रणबीर पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा मीडियात गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. याबाबत नुकतेच आलियाला एका कार्यक्रमाच्या दरम्यान विचारले असता ती सांगते, मी कधीच अफवांवर विश्वास ठेवत नाही. अफवांवर प्रतिक्रिया देण्यात काहीच अर्थ नसतो असे मला वाटते. जोपर्यंत मीडिया माझ्या बाथरूममध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत मला काहीही फरक पडत नाही. 

तुम्ही तुमच्या सहकलाकाराला डेट करत असाल तर तुमच्या अभिनयावर काही फरक पडतो का असे विचारले असता ती सांगते, तुम्ही अभिनेते असताना अभिनय करणे हे केवळ तुमचे काम असते. तुम्ही कॅमेरासमोर असताना तुम्ही कोणाला डेट करत आहात. तो जाडा आहे, बारीक आहे, उंच आहे, बुटका आहे, तुम्ही त्याच्यासोबत खूश आहात की नाही या कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. कधीकधी तुम्ही अतिशय दुःखी असता, पण तरीही तुम्हाला चित्रीकरणासाठी आनंदात नाचावे लागते. तुम्ही कलाकार असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींना सामोरे जावेच लागते. 

रणबीर कपूरच्या प्रेमात पडण्याआधी आलिया भट अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. दोघांना अनेक इव्हेंट्समध्ये एकत्र बघण्यात आले होते. पण दोघांनी कधीही आपलं नातं अधिकृतपणे जाहीर केलं नव्हतं. तर रणबीर कपूरचे नाव आजवर सोनम कपूर, दीपिका पादुकोण, कॅटरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले आहे. 

Web Title: The ridiculous reply to the wedding rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.