रिंकू राजगुरूचे मनाला भुरळ घालणारे फोटो व्हायरल, हटणार नाही तुमचीही नजर
By सुवर्णा जैन | Published: September 22, 2020 12:53 PM2020-09-22T12:53:44+5:302020-09-22T12:54:23+5:30
याआधीही रिंकूचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.रिंकूच्या या फोटोतील स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.
रिंकू सध्या सोशल मीडियावर रोज तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. तिचे हे फोटो पाहून चाहतेही कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात. सोशल मीडियावर चित्रपटसृष्टीतील सगळेच कलाकार खूप अॅक्टीव्ह असतात. रिंकूही सतत सोशल मीडियावर तिच्या नवनवीन अपडेट शेअर करत असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच निळ्या रंगातील लॉँग गाऊन पॅटर्नच्या ड्रेसमध्ये रिंकूने फोटो शेअर केला आहे. फोटोला समर्पक अशी कॅप्शनही दिल्याचे पाहायला मिळतंय. याआधीही रिंकूचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.
रिंकूच्या या फोटोतील स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. ट्रेडिशनल अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाचा इंडो-वेस्टर्नकिंवा मग वेस्टर्न ड्रेसिंगमधील अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. त्यामुळेच या फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय असं म्हणणं चुकीचे ठरणार नाही.
रिंकूची एक झलक पाहण्यासाठी झाली होती गर्दी, चित्रीकरण रद्द करण्याची आली होती वेळ
रिंकूची एक झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची गर्दी ही होतेच. असाच काहीसा अनुभव सिनेमाच्या शूटिंगवेळी रिंकूला आला होता. पुण्यातील खराडी गावामध्ये सिनेमाचे शूटिंग सुरु होणार होते. रिंकू गावात येणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अख्खं गाव रिंकूला बघण्यासाठी चित्रीकरण स्थळी पोहोचले. या जमावामुळे चित्रीकरणात इतक्या अडचणी येत होत्या की चित्रीकरण अक्षरशः रद्द करण्याची वेळ आली होती.
रिंकूसोबत फोटो काढण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरु होती. त्यामुळे चित्रीकरण सुरू झालंच नाही, पण लोकांनी आपल्या फोनवर रिंकूचं चित्रीकरण मात्र केलं. एकंदरच सगळा गोंधळ सुरु होता. सिनेमाच्या टीमचा गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु होता, मात्र तो अयशस्वी ठरत होता. अखेर शूटिंग रद्द करून रिंकूला हॉटेलवर नेण्याचा निर्णय घेतला. तर तिथेही काही वेगळी परिस्थिती नव्हती.
आजपर्यंत एकही नाटक रिकूने पाहिले नाही, नाटकांपासून आजवर दूरच
'सैराट' सिनेमाने रिंकूला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं. रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच, शिवाय राष्ट्रीय पुरस्कारातही रिंकूनं बाजी मारली. मूळची अकलूजची असलेल्या रिंकूनं आपल्या अभिनयाने साऱ्यांनाच तोंडात बोटं घालायला लावली आहेत. असं असलं तरी आर्चीची एक अशी गोष्ट आहे जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. बालपणी अकलूजमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये रिंकूने सहभाग घेतला.
यांत गाणी किंवा नृत्याच्या कार्यक्रमाचा समावेश होता. मात्र आजवर रिंकूने कोणतंही नाटक पाहिलेलं नाही. अकलूजमध्ये कोणत्याही नाटकाच्या स्पर्धा किंवा नाटकांचं आयोजन करण्यात आलं नसल्याने ती नाटकांपासून आजवर दूरच आहे. त्यामुळेच की काय तिने नाटकात कधी सहभाग घेतला नाही किंवा नाटक पाहिलंही नाही.