'तुझेही चित्रपट आता Boycott', 'लाल सिंग चड्ढा' पाहायला पोहोचलेली रिंकू राजगुरू ट्रोलर्सच्या निशाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 11:25 AM2022-08-12T11:25:22+5:302022-08-12T11:26:07+5:30
Rinku Rajguru : ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्यानंतर रिंकू राजगुरूने सोशल मीडियावरील 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) संदर्भातील पोस्ट डिलिट केली आहे.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचालाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी सोशल मीडियावर #BoycottLaalSinghChaddha ट्रेंड होत आहे. अजूनही हा ट्रेंड सुरू असला तर अनेक चाहते या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग नुकतंच पार पडले. त्याला बऱ्याच सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यानंतर या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चित्रपटांची प्रशंसा करताना दिसत आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू(Rinku Rajguru)नं सोशल मीडियावर लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यानचे फोटो शेअर करून पोस्ट लिहिली आहे. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरूने 'लाल सिंग चड्ढा'साठी स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी तिला या चित्रपटाचे प्रमोशन न करण्याचा सल्ला दिला आहे. या चित्रपटाचे प्रमोशन तिला महागात पडू शकते असेही युजर्सचं म्हणणे आहे. अभिनेत्रीने आमिर खान नागा चैतन्य या दोघांसह फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, 'लाल सिंग चड्ढाच्या स्क्रिनिंगदरम्यान... नक्की बघावा असा चित्रपट. आमिर खान प्रोडक्शन आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा'.
रिंकूची ही पोस्ट पाहून तिचे चाहते नाराज झाले आहेत. काहींनी कमेंटमध्ये लिहिले की आता यानंतर तुझेही चित्रपट Boycott केले जातील. 'तुला अनफॉलो करतोय', 'असं नको करू, नाहीतर तु देखील बॉयकॉट', 'सॉरी रिंकू हा सिनेमा प्रमोट करू नको. तु कुठे होतीस जेव्हा आमिर हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवत होता?', अशा अनेक कमेंट्स तिच्या पोस्टवर केल्या जात आहेत. आणखी एकाने म्हटले की, 'लोक तुझे पिक्चर बघणं सोडून देतील रिंकू... विचार करून प्रमोशन कर आमिरच्या पिक्चरचं'. याशिवाय इतर मराठी चित्रपटांचं प्रमोशन का करत नाही असा प्रश्नही काही चाहत्यांनी तिला विचारला आहे. मात्र आता रिंकूने ट्रोल झाल्यानंतर आता ती पोस्ट डिलिट केल्याचं पाहायला मिळते आहे.