आव्हान नसतं ते अवाहन असते, रिंकू राजगुरु त्या व्हिडीओमुळे होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 03:42 PM2021-11-04T15:42:43+5:302021-11-04T15:48:47+5:30

रिंकू राजगुरु सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Rinku Rajguru Trolled For Speaking Wrong Marathi Language | आव्हान नसतं ते अवाहन असते, रिंकू राजगुरु त्या व्हिडीओमुळे होतेय ट्रोल

आव्हान नसतं ते अवाहन असते, रिंकू राजगुरु त्या व्हिडीओमुळे होतेय ट्रोल

googlenewsNext

सैराट सिनेमातून साऱ्या महाराष्ट्राला वेड लावणारी आर्ची. महाराष्ट्राच काय तर सारा देश आर्चीच्या प्रेमात पडला. तरुणाईला अक्षरक्षा आर्चीचे वेड लावलं. ही आर्ची म्हणजेच महाराष्ट्राची लाडकी मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु. सैराट सिनेमाने रिंकूला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं. रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच, शिवाय राष्ट्रीय पुरस्कारातही रिंकूनं बाजी मारली. आर्ची म्हणून रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवलं. मूळची अकलूजची असलेल्या रिंकूनं आपल्या अभिनयाने साऱ्यांनाच तोंडात बोटं घालायला लावली आहेत. असं असलं तरी आर्चीची एक अशी गोष्ट आहे जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कोरोना लस घेण्यासाठी ती आवाहन करताना दिसते. व्हिडीओत रिंकूने दिलेला संदेश जरी चांगला असला तरी मराठी भाषेत बोलताना काही शब्दांचे उच्चार चुकले आणि चाहत्यांनी तिचं गोष्ट पकडत तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली. 

तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते तिची प्रचंड खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत असल्याचे पाहायला मिळतंय.''चांगले पैसे मिळालेले दिसतायत'','तिसरी लाटेने फोन केला होता का येणार आहे म्हणून', 'चांगल पाठांतर केलंय बाई,थोडं नॅचरल बोलली असती तर, अधिक आव्हानात्मक वाटलं असत.

 

जनजागृती साठी संदेश चांगला आहे'.अशा कमेंट्स युजर्स देताना दिसत आहेत.याच व्हिडीओमुळे रिंकू सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. दिवेसंदिवस तिची लोकप्रियताही वाढत असल्याचे पाहायला मिळतंय. 

Web Title: Rinku Rajguru Trolled For Speaking Wrong Marathi Language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.