ऋषी कपूर यांच्या मुलीने त्यांच्यासाठी केली ही भावुक पोस्ट, वाचून तुमच्या डोळ्यांत देखील येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 02:34 PM2020-04-30T14:34:54+5:302020-04-30T14:37:49+5:30

ऋषी यांची मुलगी रिधीमाने सोशल मीडियाद्वारे तिच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

RIP my strongest warrior: Riddhima Kapoor's post for dad Rishi Kapoor PSC | ऋषी कपूर यांच्या मुलीने त्यांच्यासाठी केली ही भावुक पोस्ट, वाचून तुमच्या डोळ्यांत देखील येईल पाणी

ऋषी कपूर यांच्या मुलीने त्यांच्यासाठी केली ही भावुक पोस्ट, वाचून तुमच्या डोळ्यांत देखील येईल पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देऋषी कपूर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत रिधीमाने लिहिले आहे की, पापा आय लव्ह यू.... आणि मी नेहमीच तुमच्यावर प्रेम करणार.... तुमच्या आत्म्यास शांती लाभो... तुम्ही लढवय्या होता... तुम्हाला नेहमीच मी मिस करणार... तुमचे दररोजचे फेसटाईमचे कॉल मिस करणार..

काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने ऋषी कपूर यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.

ऋषी कपूर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांची मुलगी रिधीमा त्यांची प्रचंड लाडकी असून अनेक मुलाखतींमध्ये देखील त्यांनी तिचा उल्लेख केला आहे. त्यांची काल तब्येत बिघडल्यानंतर काल रात्रीपासून रुग्णालयात त्यांची पत्नी नितू सिंग आणि रणबीर कपूर उपस्थित आहेत. पण त्यांची मुलगी रिधीमा कपूर सध्या दिल्लीत आहे. पण तिला प्रवास करण्याचा पास मिळाला असून ती कारने मुंबईला येण्यासाठी निघाली आहे. 

रिधीमाने तिच्या लाडक्या व़डिलांच्या निधनानंतर आता इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने ऋषी कपूर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, पापा आय लव्ह यू.... आणि मी नेहमीच तुमच्यावर प्रेम करणार.... तुमच्या आत्म्यास शांती लाभो... तुम्ही लढवय्या होता... तुम्हाला नेहमीच मी मिस करणार... तुमचे दररोजचे फेसटाईमचे कॉल मिस करणार... तुम्हाला मी पुन्हा भेटणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला मिस करणार... पापा आय लव्ह यू... 

सकाळी रिधिमाला प्रवास करण्याचा पास मिळाला असून पाच जणांना मुंबई-दिल्ली प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रिधीमाला दिल्ली-मुंबई असा १४०० किमीचा प्रवास करायला १८ तास लागणार आहेत. सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने देशभरातील विमान, रेल्वे सेवा बंद आहेत.

ऋषी कपूर गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी लढत होते. काल रात्री उशिरा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांची त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेत. पण हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत. 2018 मध्ये ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. तेथे 11 महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते.

Web Title: RIP my strongest warrior: Riddhima Kapoor's post for dad Rishi Kapoor PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.