नीतू सिंगनंतर ऋषी कपूर यांनी दिल्या रणबीर कपूरला त्याच्या यशासाठी शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 03:31 PM2019-03-26T15:31:07+5:302019-03-26T15:34:07+5:30

नीतू सिंग कपूर इतकेच रणबीरचे वडील म्हणजेच अभिनेते ऋषी कपूर देखील रणबीर कपूरला मिळालेल्या पुरस्कारासाठी प्रचंड खूश आहेत.

Rishi Kapoor congratulates son Ranbir Kapoor for his Filmfare win | नीतू सिंगनंतर ऋषी कपूर यांनी दिल्या रणबीर कपूरला त्याच्या यशासाठी शुभेच्छा

नीतू सिंगनंतर ऋषी कपूर यांनी दिल्या रणबीर कपूरला त्याच्या यशासाठी शुभेच्छा

googlenewsNext
ठळक मुद्देरणबीरने त्याच्या साडे अकरा वर्षांच्या कारकिर्दीत महत्त्वाचे सहा पुरस्कार पटकावले आहेत. त्यामुळे आई-वडील म्हणून नितू आणि मला त्याचा प्रचंड अभिमान आहे असे त्यांनी म्हटले आहे. 

फिल्मफेअर पुरस्काराची वाट बॉलिवूडमधील मंडळी आणि प्रेक्षक वर्षभर पाहात असतात. हा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईतील जिओ गार्डन येथे रंगला. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. तसेच जान्हवी कपूर, रणवीर सिंग, विकी कौशल यांसारख्या कलाकारांनी त्यांचे दमदार परफॉर्मन्स सादर करत या सोहळ्याला चार चाँद लावले. या पुरस्कार सोहळ्यात कलाकार, तंत्रज्ञ यांना त्यांच्या कामगिरीसाठी गौरवण्यात आले. रणबीर कपूर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार आलिया भटने पटकावला. रणबीर आणि आलिया हे गेल्या काही महिन्यांपासून नात्यात असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या रिअल लाइफ कपलला हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे चाहते चांगलेच खूश आहेत.

रणबीर आणि आलियाला पुरस्कार मिळाल्यानंतर रणबीरची आई अभिनेत्री नितू सिंग कपूर यांनी सोशल मीडियाद्वारे त्या दोघांचेही कौतुक केले. नितू यांनी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर रणबीर आणि आलियाचा फिल्मफेअर पुरस्कार हातात असल्याचा फोटो पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, अशाप्रकारचे क्षण तुमचा सगळा त्राण विसरायला लावतात. तुम्हाला दोघांना शुभेच्छा. मी खूप खूश आहे. तुमचा मला अभिमान वाटतोय.

नीतू सिंग कपूर इतकेच रणबीरचे वडील म्हणजेच अभिनेते ऋषी कपूर देखील खूश आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रणबीरने त्याच्या साडे अकरा वर्षांच्या कारकिर्दीत महत्त्वाचे सहा पुरस्कार पटकावले आहेत. त्यामुळे आई-वडील म्हणून नितू आणि मला त्याचा प्रचंड अभिमान आहे असे त्यांनी म्हटले आहे. 

रणबीर कपूरने संजू या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची भूमिका साकारली होती. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यात आलेले चढ-उतार प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. संजय दत्तची भूमिका रणबीरने अक्षरशः जगली होती असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण या चित्रपटात रणबीरचे हावभाव, देहबोली संजय दत्त सारखीच होती. रणबीरने या चित्रपटासाठी त्याच्या आवाजावर देखील प्रचंड मेहनत घेतली होती. याच चित्रपटातील भूमिकासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

 

Web Title: Rishi Kapoor congratulates son Ranbir Kapoor for his Filmfare win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.