ऋषी कपूर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज; तर होता न्युमोनियाचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 11:25 AM2020-02-04T11:25:52+5:302020-02-04T11:28:40+5:30

Rishi Kapoor's Health : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

rishi kapoor discharged from hospital delhi pollution reason behind | ऋषी कपूर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज; तर होता न्युमोनियाचा धोका!

ऋषी कपूर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज; तर होता न्युमोनियाचा धोका!

googlenewsNext
ठळक मुद्देतब्येत बिघडल्यामुळे भाचा अरमान जैनच्या लग्नाला ऋषी कपूर उपस्थित राहू शकले नव्हते.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ऋषी कपूर यांनी खुद्द ट्वीट करून ही माहिती दिली. सोबत आपल्या चाहत्यांचे, मित्रांचे व कुटुंबीयांचे आभार मानलेत.
‘माझ्या प्रिय कुटुंबीय, मित्रांनो व चाहत्यांनो माझ्या प्रकृतीबद्दल तुम्ही दाखवलेली चिंता, प्रेम पाहून सुखावलोय. आभार. मी गेल्या 18 दिवसांपासून दिल्लीत शूटींग करत होतो. दिल्लीतील प्रदूषणामुळे मला इनफेक्शन झाले. कारण माझे न्युट्रोफिल काऊंट कमी आहे. यामुळे मला रूग्णालयात भरती व्हावे लागले. मला ताप होता. तपासणीदरम्यान डॉक्टरांना एक पॅच आढळला. यामुळे मला न्युमोनिया होऊ शकला असता. आता डॉक्टरांनी तो पॅच काढून टाकला आहे,’ असे त्यांनी सांगितले.


आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी पुढे लिहिले की, ‘लोकांनी काही वेगळाच तर्क काढला होता. मी त्या सर्व तर्कांना दूर सारत पुढे जात आहे. जेणेकरून तुमचे मनोरंजन करू शकेल. मी सध्या मुंबईत आहे.’


तब्येत बिघडल्यामुळे भाचा अरमान जैनच्या लग्नाला ऋषी कपूर उपस्थित राहू शकले नव्हते.   ऋषी कपूर गेल्या वर्षी कर्करोगावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. येथे सुमारे ११ महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते. न्यूयॉर्कमधून उपचार घेऊन परतल्यानंतर ऋषी कपूर यांनी ‘द बॉडी’ या चित्रपटाद्वारे कमबॅक केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. लवकरच ऋषी कपूर दीपिका पादुकोणसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती.  हॉलिवूडमध्ये गाजलेल्या ‘द इंटर्न’ या चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये दीपिका व ऋषी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

  ‘द इंटर्न’हा हॉलिवूड सिनेमा 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. रॉबर्ट डीनिरो आणि अ‍ॅन हाथवे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या हलक्या फुलक्या चित्रपटाने हॉलिवूडमध्ये सगळ्यांनाच वेड लावले होते. हा चित्रपट एका 70 वर्षांच्या पात्राभोवती फिरतो. निवृत्तीनंतर आॅनलाईन फॅशन वेबसाईटमध्ये इंटर्न म्हणून तो दाखल होतो. ही भूमिका ऋषी कपूर साकारणार आहेत. तर  दीपिका त्यांच्या बॉसच्या भूमिकेत दिसेल.  2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: rishi kapoor discharged from hospital delhi pollution reason behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.