ऋषी कपूरच्या या अभिनेत्रीने खाल्ली तुरुंगाची हवा; 'या' एका आर्थिक घोटाळ्यामुळे बर्बाद झालं करिअर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 04:23 PM2023-05-09T16:23:59+5:302023-05-09T16:24:56+5:30
Radhika sarathkumar: एकेकाळी अभिनयामुळे चर्चेत आलेली राधिका २०१४ मध्ये एका घोटाळ्यामुळे चर्चेत आली.
जवळपास 38 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला नसीब अपना अपना हा चित्रपट बऱ्याच जणांच्या लक्षात असेल. ऋषी कपूर (rishi kapoor), फराह नाझ आणि राधिका सरथकुमार ( radhika sarathkumar) यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. मात्र, त्यातील राधिका सरथकुमार चांगलीच प्रकाशझोतात आली. या सिनेमातील तिच्या लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. या सिनेमानंतर तिने अन्य काही सिनेमांमध्येही काम केलं. त्यामुळे ती बऱ्याचदा चर्चेत आली. मात्र, फिल्मी लाइफसोबतच तिची प्रोफेशनल लाइफही तितकीच चर्चेत राहिली.
राधिकाने २००१ मध्ये अभिनेता सरथकुमार याच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर काही काळासाठी कमी झाला. विशेष म्हणजे, एकेकाळी अभिनयामुळे चर्चेत आलेली राधिका २०१४ मध्ये एका घोटाळ्यामुळे चर्चेत आली. राधिकाची मॅजिक फ्रेम्स कंपनी असून या कंपनीने रेडियंस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून काही पैसे घेतले होते. जे तिने चेकद्वारे परत केले. 2017 मध्ये तिने दिलेले चेक बाऊन्स झाले. त्यानंतर तिच्यावर करोडोंचे कर्ज घेतल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने राधिकाला तिच्या पतीसह एक वर्षाची शिक्षा सुनावली होती.
नसीब अपना अपना:विचित्र हेअर स्टाइल करणारी चंदू आठवते का? खऱ्या आयुष्यात आहे कमालीची ग्लॅमरस
दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर राधिकाने पुन्हा एकदा कलाविश्वात तिचा जम बसण्यास सुरुवात केली. अभिनयासह तिने निर्मिती क्षेत्रातही पाय ठेवला. तिने अनेक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यासाठी तिला पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. राधिका सरथकुमारने 'नसीब अपना अपना'शिवाय 'पराया', 'अस्ली नक्की', 'आज का अर्जुन', 'लाल बादशाह', 'जीन्स', 'रंगा', 'मारी', 'सिंघम 3' आणि 'जेल' या सिनेमांमध्ये काम केलं आहे.