11 महिने 11 दिवस...! कॅन्सरला नमवत ऋषी कपूर यांची घरवापसी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 10:19 AM2019-09-10T10:19:35+5:302019-09-10T10:20:04+5:30
बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर अखेर मायदेशी परतले. ऋषी व नीतू सिंग दोघेही मुंबई एअरपोर्टवर उतरताच मीडियाचे कॅमेरे त्यांच्यावर रोखले गेलेत. यावेळी ऋषी कपूर यांच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता.
बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर अखेर मायदेशी परतले. गतवर्षी याच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले होते. आज पहाटे बरोबर ११ महिने ११ दिवसांनी ऋषी कपूर मायदेशी परतले. मायदेशी परतल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. ऋषी व नीतू सिंग दोघेही मुंबई एअरपोर्टवर उतरताच मीडियाचे कॅमेरे त्यांच्यावर रोखले गेलेत. यावेळी ऋषी कपूर यांच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता.
नीतू व ऋषी दोघांनीही हातात हात घालून कॅमेºयांना पोज दिली आणि यानंतर दोघेही आपल्या गाडीत बसून घराकडे रवाना झालेत.
व्हिडीओ जर्नलिस्ट विराल भयानी यांनी ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा एअरपोर्ट व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. घरी परतल्यावर ऋषी यांनी टिष्ट्वटरवरून सर्वांचे आभार मानलेत. घरी परतलो. ११ महिने ११ दिवस. तुम्हा सर्वांचे खूप आभार, असे त्यांनी लिहिले.
BACK HOME!!!!!! 11 Months 11days! Thank you all!
— Rishi Kapoor (@chintskap) September 9, 2019
ऋषी कपूर वर्षभरापासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरव उपचार घेत होते. बराच काल आपल्या घरापासून दूर असलेल्या ऋषी कपूर यांनी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या भावनांना वाट करुन दिली होती. याकाळात घरच्या आठवणीने ते अनेकदा हळवे झालेले दिसले.
अनेक ट्वीटमध्ये त्यांनी ही भावना बोलून दाखवली होती. याशिवाय आजारपणाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पत्नी नीतू यांच्याबद्दलही त्यांनी भरभरून लिहिले होते. ‘या कठीण काळात नीतू माझा आधार स्तंभ होती. मी तिचा खूप आभारी आहे,’ असे त्यांनी म्हटले होते. ऋषी कपूर न्यूयॉर्कला असताना त्यांच्या आई कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले होते. आजारपणामुळे ऋषी आपल्या आईच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहू शकले नव्हते.