ऋषी कपूर यांनी 'मुल्क'साठी केवळ 15 मिनिटांत दिला होता होकार,अनुभव सिन्हाने जागवल्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 02:02 PM2020-08-07T14:02:13+5:302020-08-07T14:11:59+5:30
दिवंगत दिग्गज अभिनेता ऋषी कपूर, तापसी पन्नू आणि रजत कपूर अभिनीत अनुभव सिन्हा यांच्या 'मुल्क' सिनेमाला दोन वर्षे पूर्ण झाली.
दिवंगत दिग्गज अभिनेता ऋषी कपूर, तापसी पन्नू आणि रजत कपूर अभिनीत अनुभव सिन्हा यांच्या 'मुल्क' सिनेमाला दोन वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाचे कथानक आजही सर्वाधिक चर्चित आणि आजच्या परिस्थितीत महत्वपूर्ण असून जे आजच्या घडीला सादर करणे अत्यावश्यक असल्याचे मानले जाते. आता हे सांगण्याची आवश्यकता नाहीये की 'मुल्क' चित्रपटाने या बाबतच्या प्रासंगिक चर्चेला सुरुवात केली होती.
समीक्षकांनी गौरवलेल्या या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक अनुभव सिन्हांनी चित्रपट दोन वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने ऋषी कपूर यांच्यासोबत काम करतानाच्या आपल्या अनुभवाच्या आठवणींना उजाळा दिला. सिन्हा म्हणाले की,"चिंटूजींनी 15 मिनिटांच्या नरेशनमध्येच या चित्रपटासाठी होकार दिला होता. चिंटूजी नेहमीच शॉटच्या आधी त्यांना ते दृश्य समजवायला सांगत आणि मी बोलत असताना ते माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असत. मला काय हवे आहे हे व्यवस्थितपणे समजून घेत."
महत्त्वाची गोष्ट ही आहे की, चित्रपटाला केवळ 27 दिवसांमध्ये चित्रित करण्यात आले होते आणि ऋषी कपूर यांच्यासाठी ही आश्चर्याची गोष्ट होती. "चिंटूजींचा विश्वासच बसत नव्हता की चित्रीकरण पूर्ण झाले आहे."
स्क्रीनिंगच्या दरम्यान, चिंटूजींना खूप टेंशन आले होते, प्रत्येक अपडेटसाठी ते प्रत्येक अर्ध्या मिनिटाला फोन करत होते कारण 'मुल्क' बैन होईल अशी भीती त्यांना वाटत होती. 90 मिनिटांच्या चर्चेनंतर, जेव्हा मी U/A प्रमाणपत्रासोबत बाहेर आलो तेव्हा ते अविश्वासाने म्हणाले होते, 'म्हणजे पिक्चर रिलीज होईल!"