ट्विटरवर ऋषी कपूर भिडले "त्या" पाक तरुणीशी
By Admin | Published: April 11, 2017 04:21 PM2017-04-11T16:21:07+5:302017-04-11T16:22:25+5:30
अभिनेते ऋषी कपूर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. ट्विटरवरुनदेखील त्यांनी केलेलं ट्विट अनेकदा वादाचा मुद्दा ठरला आहे
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - अभिनेते ऋषी कपूर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. ट्विटरवरुनदेखील त्यांनी केलेलं ट्विट अनेकदा वादाचा मुद्दा ठरला आहे. ट्विटरवर बेधडक आणि काहीशा वादग्रस्त पोस्ट आणि कॉमेंट्स करण्यात ते पटाईत असतात. यावेळी ते एका पाकिस्तानी महिलेशी भिडले आहेत. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक ट्विट केले होते, त्यावर पाकिस्तानी नागरिकांचे कॉमेंट येत असतानाच एका महिलेने चक्क शिवीगाळ केली. यानंतर ऋषी कपूर आणि संबंधित महिलेमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली.
पाकिस्तानात भारतीय नौदल अधिकारी (माजी) कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर ट्वीट करत ऋषी कपूर म्हणाले की भारताला दुःख आहे की अभिनेते, चित्रपट आणि स्पोर्ट्स दोन्ही देशांमध्ये शांततेचा प्रयत्न पुन्हा अपयशी ठरला. पाकिस्तानला केवळ तिरस्कार हवा.पाकिस्तानला तणाव आवडत असेल तर ठीक आहे. कारण, टाळी एका हाताने वाजत नाही असेही ते म्हणाले.
पाकिस्तानकडून यावर अनेक कॉमेंट्स करण्यात आल्या. यात एका महिलेने तर चक्क शिवीगाळ केली. त्यावर ऋषी कपूर भडकले. आपल्या भाषेवर लक्ष्य दे, तुमच्या आई-वडिलांनी नक्कीच तुम्हाला असे बोलालयला शिकविले नसेल.