रितेश-जिनिलियाचा 'चिकनी चमेली' गाण्यावर लयभारी डान्स; मित्रमंडळींसोबत बेभान होऊन नाचले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 03:29 PM2024-10-19T15:29:33+5:302024-10-19T15:31:28+5:30

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया ही महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे.

riteish deshmukh and genelia dance video on katrina kaif chikni chameli song netizens react | रितेश-जिनिलियाचा 'चिकनी चमेली' गाण्यावर लयभारी डान्स; मित्रमंडळींसोबत बेभान होऊन नाचले 

रितेश-जिनिलियाचा 'चिकनी चमेली' गाण्यावर लयभारी डान्स; मित्रमंडळींसोबत बेभान होऊन नाचले 

Ritesh Deshmukh And Genelia Deshmukh Dance Video : अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया ही महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जोडी कायमच चर्चेत येत असते. रितेश-जिनिलिया देशमुख महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी आहेत. त्यांच्याकडे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणून पाहिलं जातं. दोघेही सोशल मीडियावरुन एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांच्या बॉंडिंगचे वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. दरम्यान  सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश आणि जिनिलिया त्यांच्या मित्रमंडळींसोबत बेभान होऊन डान्स करताना दिसत आहेत.


सोशल मीडियावर रितेश-जिनिलियाचा हा व्हिडिओ चर्चेत आला आहे. अभिनेत्री कतरिना कैफचं गाडलेलं गाणं म्हणजे चिकनी चमेलीवर ते दोघेही थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री जेनिफर विंगेट, कांची कौल, आशिष चौधरी, शब्बीर अहलूवालिया, मुश्ताक शेख तसेच समिता बांगर्गी ही सगळी कलाकार मंडळी रितेश-जिनिलीयासोबत धमाल करत असल्याचं पाहायला मिळतंय.

"Us & Us -forever" असं कॅप्शन जिनिलियाने या व्हिडीओला दिलं आहे. शिवाय #funnight असा टॅगही तिने मार्क केलाय. सोशल मीडियावर या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने अक्षरश धुमाकूळ घातला आहे. अवघ्या तासाभरात व्हिडीओला लाखोंहून अधिक व्ह्यूज मिळालेत. रितेश-जिनिलियाच्या चाहत्यांनी  कमेंटच्या माध्यमातून त्यांच्याविषयी कौतुकौद्गार काढले आहेत. 

Web Title: riteish deshmukh and genelia dance video on katrina kaif chikni chameli song netizens react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.