‘फक्त हिंदू सण दिसतो का ज्ञान वाटायला...’, Riteish Deshmukhने सांगितले लाडू, जिलेबीचे भाव; झाला ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 14:14 IST2021-10-24T14:11:59+5:302021-10-24T14:14:12+5:30
Riteish Deshmukhची एक पोस्ट व्हायरल होतेय अन् त्यावरून तो जबरदस्त ट्रोल होतोय.

‘फक्त हिंदू सण दिसतो का ज्ञान वाटायला...’, Riteish Deshmukhने सांगितले लाडू, जिलेबीचे भाव; झाला ट्रोल
रितेश देशमुख म्हणजे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असलेला अभिनेता. मग ते ट्विट म्हणा, रिल म्हणा, फोटो म्हणा. त्याच्या पोस्ट सतत व्हायरल होत असतात. तूर्तास रितेशची अशीच एक पोस्ट व्हायरल होतेय अन् त्यावरून तो जबरदस्त ट्रोल होतोय.
दिवाळीच्या मुहूर्तावर रितेशने एक पोस्ट शेअर केली आहे. यात मिठाईच्या वाढलेल्या किमती आणि या मिठाईमुळे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी येणारा खर्च याची तुलना रितेशने केली आहे.
पोस्टमध्ये रितेशने लाडू, जिलेबी, काजू बर्फी आणि चॉकलेटचे भाव सांगतले आहेत आणि शेवटी यामुळे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी येणारा खर्चही दिला आहे.
I thought I should warn you !!!! pic.twitter.com/ptbJtYHAvC
— Riteish Deshmukh (@Riteishd) October 21, 2021
‘मला वाटलं म्हणून मी तुम्हाला सावध करतोय,’ असे कॅप्शन देत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. लड्डू 400 रूपये किलो, जलेबी 600 रूपये किलो, काजू बर्फी 800 रूपये किलो, चॉकलेट 1000 रूपये किलो आणि वजन कमी करणं 15000 रूपये किलो ..’, असे त्याने पोस्टमध्ये लिहिले. मात्र, रितेशची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच, अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.
Sorry sir - मैं Vegan हूँ । दही नहीं खाता। https://t.co/v3wPJiea30
— Riteish Deshmukh (@Riteishd) October 21, 2021
‘फक्त हिंदू सण दिसतो का तुम्हाला ज्ञान वाटायला,’ अशी कमेंट त्याच्या या पोस्टवर एका युजरने केली. ‘ हे जेनेलिया डिसुझा यांनी ट्विट करायला सांगितले का ? हिंदु सण असताना बाकी पिज्झा बर्गर यांनी काहीच होत नाही का?’, अशी जळजळीत प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.
‘खरचं एवढं महत्वाचं ज्ञान ख्रिसमस आणि ईद च्या वेळी का नाही वाटत? मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांवर तुझं प्रेम नाही का? हिंदूंची एवढी काळजी घेतो तशी इतर धमीर्यांची का नाही?,’अशी कमेंट एकाने केली.
युजर्सच्या केलेल्या या कॉमेन्टवर रितेशने मजेशीर उत्तर लिहिले आहे .‘सॉरी सर, मी विगन आहे, मी दही खात नाही...’असे उत्तर रितेशचे दिलं आहे.