'तुझे मेरी कसम' थिएटमरमध्ये पुन्हा रिलीज; रितेश पोस्ट करत म्हणाला, "इथूनच सगळ्याची सुरुवात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 12:07 PM2024-09-04T12:07:00+5:302024-09-04T12:07:57+5:30

रितेश देशमुखने 'तुझे मेरी कसम'सिनेमाचा पोस्टर फोटो शेअर केला आहे. तो लिहितो...

Riteish Deshmukh post about Tujhe meri kasam movie re released in theatre | 'तुझे मेरी कसम' थिएटमरमध्ये पुन्हा रिलीज; रितेश पोस्ट करत म्हणाला, "इथूनच सगळ्याची सुरुवात..."

'तुझे मेरी कसम' थिएटमरमध्ये पुन्हा रिलीज; रितेश पोस्ट करत म्हणाला, "इथूनच सगळ्याची सुरुवात..."

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया (Genelia)  ही महाराष्ट्राची लाडकी जोडी. चाहते त्यांना आदराने दादा वहिनी म्हणतात. २००३ साली आलेल्या 'तुझे मेरी कसम' सिनेमाच्या सेटवर रितेश जिनिलियाची पहिल्यांदा ओळख झाली. नंतर ते प्रेमात पडले. ८ वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांची लव्हस्टोरी जिथून सुरु झाली तो 'तुझे मेरी कसम' सिनेमा कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाहीए. पण आता हा सिनेमा चाहत्यांना पाहता येणार आहे. ते कसं हे स्वत: रितेशनेच पोस्ट करुन सांगितलं आहे.

रितेश देशमुखने 'तुझे मेरी कसम'सिनेमाचा पोस्टर फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले, "इथूनच सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. 3 जानेवारी 2003 रोजी तुझे मेरी कसम हा आमचा पहिलाच सिनेमा रिलीज झाला. अनेक दशकांपासून तुम्ही या सिनेमावर आणि आमच्यावर भरभरुन प्रेम केलंत त्यासाठी मी आभारी आहे. अनेकदा आम्हाला  सोशल मीडियावर तुझे मेरी कसम सिनेमा कुठे पाहता येईल याचे अनेक मेसेज येत असतात. आज आमच्याकडे उत्तर आहे. तुझे मेरी कसम १३ सप्टेंबरला पुन्हा थिएटरमध्ये रिलीज होत आहे. जाऊन नक्की बघा."


रितेश आणि जिनिलिया यांच्या प्रेमाची साक्ष असणारा सिनेमा पुन्हा प्रदर्शित होत असल्याने चाहते खूश आहेत. हा सिनेमा इतर कोणत्याच ओटीटीवर उपलब्ध नसल्याने थिएटरमध्ये पाहण्यावाचून पर्याय नव्हताच. चाहत्यांना आता सिनेमा पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. 'कधीपासून वाट बघत होतो','नक्की पाहणार' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 
 

Web Title: Riteish Deshmukh post about Tujhe meri kasam movie re released in theatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.